खंडेराव चिंतामण मेहेंदळे

खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ ह्या संस्थेचे एक संस्थापक.


खं.चिं.मेहेंदळे
जन्म नाव खंडेराव चिंतामण मेहेंदळे
टोपणनाव तात्यासाहेब
जन्म ५ डिसेंबर , इ.स. १८६९
पुणे
मृत्यू ९ जून , इ.स.१९३४
पुणे
शिक्षण बी.ए.
वडील चिंतामण मेहेंदळे


खं.चि.मेहेंदळे ह्यांचा जन्म पुणे येथे झाला. पेशव्यांचे सरदार अप्पा बळवंत मेहेंदळे ह्यांचे हे वंशज. खं.चि.मेहेंदळे ह्यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश शिक्षक , पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेज पुणे येथून १८९२ साली त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली. वि.का.राजवाडे हे डेक्कन कॉलेज मधे त्यांच्या सोबत शिकत होते.
खंडेराव मेहेंदळे यांचा मराठी, संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचा मोठा संग्रह होता. त्यांचे वाचन अफाट होते व व्युत्पत्ती, इतिहास , तत्त्वज्ञान ह्या विषयात त्यांना विशेष रस होता. मेहेंदळेंच्या अफाट ज्ञानाचे वि.का.राजवाडे यांना खुप कौतूक वाटे.
७ जुलै १९१० रोजी राजवाडे व मेहेंदळे यांनी मेहेंदळेंच्या शनिवार पेठेतील राहत्या वाड्यात भारत इतिहास संशोधक मंडळांची स्थापना केली. पुढिल नऊ वर्षे मेहेंदळे वाडा हेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे कार्यालय होते. नंतर मंडळ सध्याच्या सदाशिव पेठेतील वास्तू मधे हलवण्यात आले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापने नंतर काही वर्षांनी राजवाडे मंडळ सोडून गेले , तेव्हा मंडळाची जबाबदारी पूर्णपणे खं.चि.मेहेंदळेंनी सांभाळली. ते बरेच काळ मंडळाचे चिटणीस व शेवटपर्यंत उपाध्यक्ष होते. मेहेंदळेंनी मंडळाचे अहवाल , इतिवृत्त, संमेलनवृत्त यांमधून निरनिराळ्या संशोधकाचे लेखन प्रकाशित करण्यास सुरुवात केली. मंडळाच्या सुरुवातीच्या अहवाल व संमेलन वृत्तांचे संपादन व त्यांमधे काही निबंधाचे लेखन मेहेंदळेंनी केले.

खं.चिं.मेहेंदळें यांचे ग्रंथ संपादन करा

 • भारत इतिहास संशोधक मंडळ - अहवाल शके १८३२ , १९११
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - अहवाल शके १८३३ ,
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - अहवाल शके १८३४ ,
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - षाण्मासिक वृत्त शके १८३४
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - प्रथम संमेलन वृत्त
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - वार्षिक इतिवृत्त शके १८३५
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - द्वितीय संमेलन वृत्त शके १८३५
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - वार्षिक इतिवृत्त शके १८३६
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - वार्षिक इतिवृत्त शके १८३७ (सहसंपादक - द.वा.पोतदार)
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - तृतीय संमेलन वृत्त शके १८३७ (सहसंपादक - द.वा.पोतदार)
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - वार्षिक इतिवृत्त शके १८३८ (सहसंपादक - द.वा.पोतदार)
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - चतुर्थ संमेलन वृत्त शके १८३८ (सहसंपादक - द.वा.पोतदार)
 • भारत इतिहास संशोधक मंडळ - पंचम संमेलन वृत्त शके १८३९ (सहसंपादक - द.वा.पोतदार)
 • महाराष्ट्र सारस्वत ४ स्फुट प्रकरणे भाग २ , १९१५
 • भारतीय आर्यवंश , १९३५