अनुराधा कुलकर्णी
डॉ. अनुराधा गोविंद कुलकर्णी या मराठी इतिहास अभ्यासक आहेत. पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या त्या सदस्य असून संस्थेच्या माध्यमातून इतिहास विषयक अभ्यास व संशोधन करतात.
डॉ. अनुराधा कुलकर्णी | |
---|---|
जन्म नाव | अनुराधा गोविंद कुलकर्णी |
शिक्षण | एम.ए., एम.फील., पीएच.डी. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास |
विषय | शिवकाळ, ऐतिहासिक कागदपत्रे |
प्रसिद्ध साहित्यकृती | शिवछत्रपतींची पत्रे |
मराठा कालखंडातील विशेषतः शिवछत्रपतींची कालखंडातील ऐतिहासिक कागदपत्रे व त्याअनुषंगाने समोर येणारा इतिहास प्रसिद्ध करण्याचे कार्य सतत ३० वर्षे करत आहेत. विविध ग्रंथस्वरुपात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्राचे लिप्यांतर व संपादन करून प्रसिद्ध केले आहेत. यासह भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. विविध वर्तमानपत्रात त्यांचे लेखमाला व इतर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
शिक्षण
संपादनअनुराधा कुलकर्णी यांनी १९९४ साली डॉ.रेखा रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विषयातील एम.फील. ची पदवी 'पेशवेकालीन पुणे : सामाजिक अभ्यास' हा लघुप्रबंध सादर करून मिळवली. 'ज्ञानप्रकाश वृत्तपत्राची कामगिरी इ.स. १८४९ ते १९०४' या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली.
ग्रंथ संपदा
संपादन- लेखनप्रशस्ती
- ज्ञानप्रकाश १८४९ ते १९५० - महाराष्ट्राच्या जडण-घडणीचा साक्षीदार , सकाळ प्रकाशन, पुणे
- शिवछत्रपतींची पत्रे खंड १ , परममित्र पब्लिकेशन्स
- शिवछत्रपतींची पत्रे खंड २ , परममित्र पब्लिकेशन्स
- शिवचरित्र साहित्य खंड १५ (सहसंपादक - अजित पटवर्धन) , डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
- शिवचरित्र साहित्य खंड १६ (सहसंपादक - अजित पटवर्धन) , भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
- श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे (सहसंपादक - अजित पटवर्धन)
- महजर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज इ.स.१५०० ते १८०० , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२२
- महजर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार इ.स १४०० ते १८००, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२*
- श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे , श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळे
- अप्रकाशित महजर इ.स.१५५६ ते १७९० , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे, २०२*
- ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १८ मराठी कागदपत्रांचे नमुने, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०२४
- ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १९, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, २०२४