पांडुरंग नरसिंह पटवर्धन
पांडुरंग नरसिंह पटवर्धन (जन्म : ५ जानेवारी १८८६; - ६ जुलै १९२१) हे इतिहास संशोधक होते. पटवर्धनांचे वडील नरसोपंत हे विंचूर, कळवण येथे शाळा मास्तर होते. पांडुरंग पटवर्धन यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ त्यांनी सरकारी नोकरी केली. नंतर पुण्यात त्यांचे चुलते रावबहादुर सीतारामपंत पटवर्धन ह्यांच्याकडे ते काम करू लागले. राष्ट्रहितैषी नावाचे साप्ताहिक त्यांनी काही महिने चालवले.
पां.न. पटवर्धन | |
---|---|
जन्म नाव | पांडुरंग नरसिंह पटवर्धन |
टोपणनाव | पांडोबा |
जन्म | ५ जानेवारी १८८६ |
मृत्यू | ६ जुलै १९२१ |
कार्यक्षेत्र | इतिहास संशोधन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास |
वडील | नरसोपंत पटवर्धन |
पां.न. पटवर्धन हे पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ ह्या संस्थेचे सभासद होते. मंडळाच्या वृत्तांत व त्रैमासिकांमधून इतिहास विषयक त्यांचे अनेक लेख प्रकाशित होत असत. राष्ट्रकुटांचा पुणे ताम्रपट त्यांनीच प्रकाशित केला. भीमसेन सक्सेना लिखित तारीखे दिल्कुशा ह्या फारसी हस्तलिखिताचे इंग्रजी भाषांतर कॅप्टन जोनाथन स्काॅट ह्याने १८७४ साली केले. त्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद पटवर्धनांनी बुंदेल्याची बखर ह्या नावाने केला. व हे पुस्तक १९२० साली स्वतः प्रकाशित केले.