पुणे उपनगरी रेल्वे ही भारत देशाच्या पुणे शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. ही रेल्वे पुणे शहर व पुणे जिल्ह्यामधील नजीकच्या काही ठिकाणांना सेवा पुरवते.

पुणे उपनगरी रेल्वे
Lonavla EMU at Pune platform 6.jpg
मालकी हक्क मध्य रेल्वे
स्थान भारत पुणे, महाराष्ट्र
वाहतूक प्रकार उपनगरी रेल्वे
मार्ग
मार्ग लांबी ६३ कि.मी.
एकुण स्थानके ३९
पुणे – लोणावळा
पुणे उपनगरी रेल्वे

पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बऱ्याच फेऱ्या करतात. पुणे उपनगरी रेल्वेचा विस्तार दौंड आणि बारामतीपर्यंत केला जाणार आह तसेच पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर उत्तरेकडे जुन्नरपर्यंत आणि दक्षिणेकडे सातार्यापर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे पुण्याच्या चारही दिशेला उपनगरी रेल्वेचे जाळे तयार होईल व पुर्ण पुणे जिल्ह्यात रेल्वे वाहतुकीचा सक्षम पर्याय निर्माण होईल. ह्या सुधारित उपनगरी रेल्वेसाठी शिवाजीनगर(पुणे पश्चिम),हडपसर(पुणे पूर्व),भोसरी(पुणे उत्तर) आणि कात्रज(पुणे दक्षिण) ह्याप्रमाणे उपनगरी रेल्वे टर्मिनस प्रस्तावित आहेत. मुंबई दिशेला लोणावळा पर्यंत आणि सोलापुर दिशेला दौंड पर्यंत चौपदरी लोहमार्ग झाल्यावर मुंबई उपनगरी रेल्वे च्या धरतीवर जलद उपनगरी गाड्या सुरु करता येतील आणि इतर एक्सप्रेस गाडयांकरिता विशेष मार्ग मिळेल. [१]

स्थानकेसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  1. ^ "सकाळ बातमी". दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी. pp. १. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)