"रविकिरण जाधव २२:३९, १३ मार्च २०१८ (IST)"

अर्धवट वाक्ये

संपादन

खालील अर्धवट, तुटक वाक्ये प्रसिद्ध व्यक्ती या विभागात हलवावी.

अभय नातू (चर्चा) २०:०४, ८ जून २०१५ (IST)Reply

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे सोलापूरचे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नाट्य अभिनेत्री फय्याज याही सोलापूरच्या. अभिनेते अतुल कुलकर्णी यांचे बालपण व शिक्षण सोलापूर मध्ये झाले आहे. डॉ. वामन देगावकर, वामनराव सायखेडकर, लक्ष्मीनारायण बोल्ली, सुहास वर्तक, हेमंत वर्तक, शशिकांत लावणीस, गुरूराज अवधानी, आनंद किरपेकर, संजीवनी काळे, नामदेव वठारे, निशिकांत ठकार, प्रशांत देशपांडे, मंदार काळे, रजनीश जोशी, शोभा बोल्ली, सुनीता तारापूरे, प्रदीप कुलकर्णी, गुरू वठारे अशी ही नामावळी खूप मोठी आहे.

"रविकिरण जाधव १८:३३, १ मार्च २०१८ (IST)" "रविकिरण जाधव २२:०८, ४ मार्च २०१८ (IST)"

ही वाक्ये डबल आली आहे-

सोलापूर उच्चार (सहाय्य·माहिती) शहर हे दक्षिणी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापूर चादरी' प्रसिद्ध आहेत

-सौदामिनी

इतरत्र सापडलेला मजकूर

संपादन

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य सुधारणा करुन येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) २१:५९, १६ मार्च २०१८ (IST)Reply


सोलापूरच्या तीन वतनदारांपैकी एक असलेले शेटे यांच्या कुटुंबाला अनेक वर्षाचा इतिहास आहे. बहमनी साम्राज्य आणि आदिलशाही च्या काळातदेखील शेटे कुटुंबातील प्रमुख गुरूसिद्धप्पा शेटे यांच्या नावे या राजवटीचे फर्मान येत असत.त्या फर्मानाची अंमलबजावणी शेटे करीत असत.आदिलशाहीच्या काळात सोलापूर केवळ चार वेशी त मर्यादित होते. विजापूरवेस,कुंभारवेस,तुळजापूरवेस व बाळीवेस. मंगळवार बाजार वसल्यानंतर शेटे यांनी पूर्वीच्या दगड मातीच्या वाड्याचे रूपांतर भव्य सव्वा एकर परिसरात असलेल्या वाड्यात केले. तेथे शेटे मार्केटची स्थापना केली.याच मोठ्या भव्य वाड्यातून शेटे मंगळवारपेठ व परिसराचा कारभार पाहत असत.

इतरत्र सापडलेला मजकूर (२)

संपादन
सोलापूर जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
 
सोलापूर चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश   भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव पुणे विभाग
मुख्यालय सोलापूर
तालुके १. उत्तर सोलापूर, २. दक्षिण सोलापूर, ३. अक्कलकोट, ४. बार्शी, ५. मंगळवेढा, ६. पंढरपूर, ७. सांगोला, ८. माळशिरस, ९. मोहोळ, १०. माढा, ११. करमाळा
 
साेलापूर जिल्ह्यातील तालुके
 - एकूण रुपांतरण त्रूटी: मूल्य "{{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}}" अंकातच आवश्यक आहे
प्रशासन
-जिल्हाधिकारी डॉ.श्री.राजेंद्र भोसले
-लोकसभा मतदारसंघ सोलापूर, माढा, उस्मानाबाद (काही भाग)
-विधानसभा मतदारसंघ १. सोलापूर शहर उत्तर, २. सोलापूर शहर मध्य, ३. सोलापूर दक्षिण, ४. बार्शी, ५. मोहोळ, ६. माळशिरस, ७. माढा, ८. सांगोला, ९. पंढरपूर, १०. करमाळा, ११. अक्कलकोट
-खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी़ - सोलापूर, रणजितसिंह नाईक निंबाळकर - माढा
संकेतस्थळ


साेलापूर

संपादन

साेलापूर जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण पूर्वेकडील काठावर वसलेला आहे. मुख्यत: भीमा व सीना अश्या नद्या साेलापूर जिल्ह्यातून वाहतात. २०११ च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४३,१७,७५६ इतकी नाेंदवली गेली हाेती.[] त्यातील पुरुष आणि महिलांची संख्या अनुक्रमे २२,२७,८५२ व २०,८९,९०४ इतकी हाेती.

क्षेत्रफळ

संपादन

भौगोलिकदृष्ट्या सोलापूर हे १७.१० ते १८.३२ अंश उत्तर अक्षांश आणि ७४.४२ ते ७६.१५ अंश पूर्व रेखांश दरम्यान स्थित आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण-पूर्व सीमेवर वसलेला आहे आणि संपूर्णपणे भीमा व सीना खोर्यात आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हे, पूर्वेस उस्मानाबाद व गुलबर्गा (कर्नाटक राज्य) जिल्हे, दक्षिणेस सांगली व विजापूर (कर्नाटक राज्य) आणि पश्चिमेस सातारा व पुणे जिल्हे वसलेले आहेत. जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रफळ १४८४४.६ चौ.कि.मी. आहे. जे महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्राच्या ४.८२% आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३३८.८ चौ.कि.मी. (२.२८%) शहरी क्षेत्र आहे तर उर्वरित १४५०५.८ चौ.कि.मी. (९७.५%) ग्रामीण क्षेत्र आहे.[]

ऐतिहासिक महत्व

संपादन

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवेब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. सोलापूर हे नाव सोळा म्हणजे सोळा व पूर म्हणजे गाव असे तयार झाले ही धारणा आहे. सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, चपळदेव, फतेपूर, जामदारवाडी, काळजापूर, खादरपूर, खांडेकरवाडी, महमदपूर, राणापूर, संदलपूर, शेखपूर, सोलापूर, सोन्नलगी, सोनपूर व वैदकवाडी या सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनले आहे. अशी धारणा आहे. पण नवीन अध्ययनानुसार सोलापूर हे नाव सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनलेले नाही. शिवयोगी श्री सिद्धेश्वर लिखित शिलालेखानुसार सोन्नलगे असे संबोधले जायचे. कालांतराने सोन्नलगे चे सोन्नलगी असे रूपांतर झाले. आणि यादव वंशापर्यंत सोलापूरचे संबोधन सोन्नलगी असे होते. मोहोळ तालुक्यातील कामती येथे सापडलेल्या शके १२३८ च्या संस्कृत शिलालेखानुसार सोलापूर नगरीला सोनलपूर असे संबोधले जातात. सोलापूर भुईकोट किल्ल्यात सापडलेल्या एका शिलालेखानुसार सोनलपूर असा उल्लेख होतो. तर त्याच किल्ल्यातील दुसर्‍या भिंतीवर सापडलेल्या शिलालेखानुसार या नगरीचा उल्लेख मोगल राजवटीत यास संदलपूर असे केलेले आहे. काळाच्या ओघात सोनलपूर मधील ‘न’ गाळला जाऊन सोलपूर नंतर सोलापूर असे नाव प्रचलित झाले असावे. त्यानंतर ब्रिटिश शासनांनी सोलापूर ऐवजी शोलापूर असे उच्च्यार कायम केले.

सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेची प्रेरणा घेवून सोलापूरमधील स्वातंत्र सैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे जेष्ठ स्वातंत्रसैनिक श्री. अण्णासाहेब भोपटकर यांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. स्वातंत्र्यापूर्वीच इ स वी सन १९३० मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती व संपूर्ण देशभरात ही पहिली व एकमेव घटना होती. या घटनेने संतापून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडाजगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन केसरी मध्ये आढळतात.

  1. ^ https://www.census2011.co.in/census/district/364-solapur.html
  2. ^ https://solapur.gov.in/en/geography/
"सोलापूर" पानाकडे परत चला.