पंढरपूर विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ - २५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पंढरपूर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगांव, पंढरपूर ही महसूल मंडळे आणि पंढरपूर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पंढरपूर हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे समाधान महादेव आवताडे हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०२१ (पोटनिवडणूक)[५] | समाधान महादेव आवताडे | भारतीय जनता पक्ष | |
२०१९ | भारत तुकाराम भालके | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | भारत तुकाराम भालके | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | भारत तुकाराम भालके | स्वाभिमानी पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पंढरपूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
भारत तुकाराम भालके | स्वाप | १,०६,१४१ |
विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील | राष्ट्रवादी | ६८,७७८ |
येतला नारायण भगत | शिवसेना | ३,३३० |
दिलीप काशीनाथ धोत्रे | मनसे | १,९९८ |
सोमनाथ तथा राजू मनोहर पाटील | अपक्ष | १,८७७ |
अभंगराव हेमंत भागवत | अपक्ष | १,८७३ |
सूर्यकांत ज्ञानोबा थेंगिल | जसुश | १,६१९ |
विजयसिंह सर्जेराव पाटील | अपक्ष | १,४१२ |
भालचंद्र यल्लप्पा कांबळे | बसपा | ९६० |
ऍड. डॉ. राजाराम भगवतराव पवार | अपक्ष | ७३७ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
- ^ Marathi, TV9 (2021-05-02). "Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक निकाल". TV9 Marathi. 2023-01-06 रोजी पाहिले.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |