माळशिरस विधानसभा मतदारसंघ

माळशिरस विधानसभा मतदारसंघ - २५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, माळशिरस मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहीगांव, नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, अकलूज, वेळापूर आणि पिलीव ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे राम विठ्ठल सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पक्ष
२०१४ हनुमंत जगन्नाथ डोळस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ हनुमंत जगन्नाथ डोळस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन