मंगळवेढा
?मंगळवेढा महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सोलापूर |
विभाग | पुणे |
भाषा | मराठी |
आमदार | समाधान आवताडे |
पंचायत समिती सभापती | दादासाहेब इंगळे |
संसदीय मतदारसंघ | सोलापूर |
तहसील | मंगळवेढा |
पंचायत समिती | मंगळवेढा |
कोड • पिन कोड |
• 413305 |
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
पार्श्वभूमी
संपादनमंगळवेढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक प्रसिद्ध तालुका आहे. मंगळवेढे गावची ऎतिहासिक परंपरा अतिशय मोठी असून, अशी परंपरा लाभलेली गावे फारच कमी आहेत. मंगळवेढा हे गांव कधी काळी वसले याबद्दल निश्चित पुरावा नाही. परंतु फार प्राचीन काळी शालिवाहन शकाच्या सुरुवातीला मंगळवेढा हे शहर मंगल राजचे अधिपत्याखाली होते. या गावची बाजारपेठ त्यावेळी अतिशय भरभराटीत चालू होती. मंगल राजाच्या आधी हे गांव जीवनपूरी असे म्हणून प्रसिद्ध होते.[ संदर्भ हवा ] सध्याच्या मंगळवेढ्याच्या पश्चिम दिशेस जमिनीचे उत्खनन करताना सोन्या, चांदीचे दागिने, जून्या विठा, मातीची नक्षीदार सुंदर असलेली फुटलेले दगडी शिल्प अशा विविध वस्तू सापडत होत्या. परंतु कालांतराने जीवनपूरी या गावची वाताहत झाली. जीवनपूरीच्या पूर्वेस त्यावेळी निबीड असे अरण्य होते. त्यामुळे महाभयानक अशा अरण्यात मनुष्यवस्ती आजिबात नव्हती.
दक्षिणगंगा भीमा नदीच्या पश्चिमेकडील सपाट जमिन पाहून बरेच काफीले येथे येऊन राहू लागले. सपाट व सुपीक काळ्याभोर जमिनीत कष्ट करून भरपूर उत्पन्न निघू लागले. त्यामुळे हळूहळू याठिकाणची लोकवस्ती वाढू लागली. लोक या ठिकाणी घरे बांधून गुण्या गोविदांने जीवन कंठू लागले. मोठमोठे वाडे, सुंदर महाल व गावाकडेने मजबुत अशी तटबंदी बांधून परचक्र व चोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून तटबंदीच्या बाहेरील बाजूनी खोल असा खंदक खणून शत्रू सैन्यास सहजासहजी गांवात प्रवेश मिळू नये म्हणून संरक्षण केले. शत्रू टेहाळणीसाठी गावच्या चारी दिशेस उंच असे बुरुज बांधले गेले. जसजसा कालखंड जाईल तशी या गावची बाजारपेठ भरभराटीस येऊन व्यापार वाढून या गावची किर्ती दुरवर पसरली. लांबलांबचे व्यापारी या गावाशी संबंध जोडून मोठ मोठी सोन्या चांदीची दुकाने थाटून गावाच्या वैभवात आणखी भर टाकली. दिवसेंदिवस या शहराचे वैभव वाढू लागले. त्यावेळचा नक्की कालखंड कोणता होता याचा पुरावा लागत नाही. परंतु या शहराचे वैभव व भरभराटीचा काळ हा शालीवाहन शकाचे आधीचा असावा. एवढे वैभवशाली सुंदर व भरभराटीचे आलेले सुखी, संपन्न शहर आपले आधिपत्याखाली असावे, या शहराचा सम्राट आपण व्हावे, यावर आपली सत्ता असावी म्हणून मंगल नावाच्या राजाने या शहरास आपल्या सैन्यानीशी चोहोबाजूनी वेढा दिला. परंतु मजबूत तटबंदी असल्यामुळे मंगलराजाचा काही इलाज चालेना, तरीपण मंगल राजाने आपल्या सैन्याचा वेढा बराच काळ उटविला नाही. सरते शॆवटी गावाची रशिद बंद पडली. तेथील अंमलदार अखेर राजास शरण येऊन ते शहर मंगल राजाचे अदिपत्याखाली आले. मंगल राजाने सैन्यानीशी वेढा देऊन हे शहर जिंकून घेतले. तेंव्हापासून या शहराचे नाव मंगळवेढा असे पडले, अशी लोक अख्यायिका आहे.[ संदर्भ हवा ] शालीवाहन १० वे शतकात या मंदिराचे जिर्णोद्धार, भारद्वास गोत्रातील धनाची हिप्परगी यांनी केला. असा शिलालेखाचा उल्लेख आहे. श्री काशिविश्वेश्वर मंदिराचे बांधकाम शालिवाहन ७ व्या शतकात झाले असावे. मंदिरावरील दगडी देव देवतांचे शिल्प फारचे पुरातन काळातील आहेत.[ संदर्भ हवा ]
मंदिराजवळील विहीर त्याच वेळी बांधली असावी. कारण शिलालेखात मंगळवेढे यांच्या स्थळी- मुन्मु करता वेळे कसबेच्या जोगी बावी सान्निध्याने जुने देऊळ पडले असा उल्लेख आहे. विहिरीचे बांधकाम सुद्धा अतिशय पुरातन काळातील आहे. विहीरीतीळ देव देवतांच्या मुर्ती जीर्ण झालेल्या आहेत. जगातील बह्मदेवाच्या तीन मुर्तीपैकी एक ब्रह्मदेवाची मुर्ती विहीरीतील कमानीत पूर्वाभिमुख बसविली आहे.[ संदर्भ हवा ] यावरून मंगळवेढ्याची एतिहासिक परंपरा फार प्राचीन काळातील असावी. ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे. हा तलाव कोणी खोदला याचा पुरावा सापडत नाही. परंतु तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाचे पुरातन असे सुंदर मंदिर बांधले होते. विहीरीतील भुयारी मार्ग या गोपाळ कृष्णाच्या मंदिरापर्यंत आहे. अशी लोक अख्यायिका आहे. ही अख्यायिका सत्य असावी. कारण महाराष्ट्र शासनाने १९७२ साली जो दुष्काळ पडला त्यावेळी कृष्ण तलावाचे उत्खनन केले. त्यावेळी तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाच्या मंदिराचे जुने अवशॆष मोठमोठ्या शिळा भंगलेले दगडी शिल्प, मंदिराचा चबुतरा पडीक अवस्थेत आहे. अजून त्या ठिकाणी मंदिराचे जुने पडीक बांधकाम पाहवयास मिळते.[ संदर्भ हवा ] मंगळवेढ्याच्या ऎतिहासिक परंपरेचा अतिशय जुना इतिहास म्हणजे दक्षिणेस १ कि.मी. अंतरावर माळावर एकविरा देवीची फार प्राचिन काळी बांधलेले जुने मंदिर आहे. मंदिरासमोर उंच दिपमाळ बांधलेली असून भग्न अवस्थेतील दगडी हत्ती व दैत्याची मूर्ती आहे. हे मंदिर कोणी बांधले व केंव्हा बांधले याचा नक्की पुरावा सापडत नाही. देवीची मुर्ती (मुखवटा) भव्य असून रागीट भाव चेह-यावर आहेत. देवी अत्यंत जागृत असून मुर्तीसमोर शकून पाहण्याचे दोन गोल असे दगड आहेत. मंदिराच्या बांधकामाचे बाहेरील बाजूच्या दगडावर पुसट असा शालीवाहन सात असा मजकूर होता. परंतु तो दगडही ऊन, पावसाळ्यामुळे खराब होऊन जीर्ण झाला आहे. यावरून हे मंदिर १५०० वर्षापूर्वी बांधलेले असावे.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात एकविरा देवीची मंदिरे फार थोडी आहेत. या मंदिराचे बांधकाम मोठ मोठ्या शिळाचे, दगडाने बारीक घडई करून मजबूत बांधले आहे. मंदिरावर घुमटया आकाराचे शिखर आहे. एकविरा मंदिराच्या आसपास आता देव देवतांची बरीच मंदिरे बांधली आहेत. देवीच्या मंदिराच्या दक्षिणेला द-याबाचे मंदिर आहे. उत्तरेकडील बाजूस यल्लमा देवीची नवीन तीन मंदिरे बांधली आहेत. दक्षिणकेदार जोतिर्लिंगाचे सुशोभित भव्य असे मंदिर असून समोर उंच अशी दिपमाळ दिमाखात उभी आहे. जोतिबाच्या मंदिराचे उत्तर दिशेस काळभैरवनाथाचे मंदिर आहे. दरवर्षी या देव देवतांचे भव्य अशा मंदिर परीसरासमोर चैत्र महिन्यापासून नवरात्र महोत्सवापर्यंत भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात नऊ दिवस याठिकाणी भाविक येतात. दस-यादिवशी शिमोलंगनासाठी भाविक भक्तांची अलोट अशी गर्दी असते. त्यादिवशी एकविरादेवीचा माळ भाविक भक्तांचे जयघोषाने दुमदुमुन गेलेला असतो. संताच्या पदस्पर्शाने व देवदेवतांचे वास्तव्याने पुनित झालेल्या मंगळवेढे नगरीचा एतिहासिक परंपरेचा ठेवा अगदी थोडक्यात काही लोक अख्यायिकाच्या आधारे व पौराणिक माहीतीच्या आधारे दिला आहे. मंगळवेढा गावाची एतिहासिक परंपरा फार मोठी आहे. अशी परंपरा असलेली गावे फारच क्वचित आढळतात. हे गाव कधी वसले याबद्द्ल निश्चित माहीती मिळत नाही. पूर्वीच्या शिलालेखावरून एक हजार वर्षांपूर्वी हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल होता. इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. श्री बसवेश्वर (लिंगायत धर्माचे मूळ संस्थापक) हे त्या विज्जल राजाचे प्रधान होते. त्या बिज्जलचा आजोबा कलचूर्य घराण्यांतील जगत व पेरमाडी यांनी या ठिकाणी महामंडलेश्वर म्हणून राज्य केले आहे. तेंव्हा या शहराचे वैभव फार मोठे होते. वैदिक, जैन, शैव, वैष्णव वगैरे अनेक पंथांचे व संस्कृतीचे हे संगमस्थान होते. त्यावेळी येथे व्यापारी पेठ होती. त्या वेळची येथील लोकसंख्या हजारापेक्षा जास्त होती. गावात सुंदर देवळे होती. देवगिरीचे यादव पन्नास वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे येथील कलचुरी घराण्याच शेवटचा राजा बिल्हण याचा इ. सन ११९१ मध्ये नाश केला.[ संदर्भ हवा ]
तालुक्यातील गावे
संपादन- अकोले (मंगळवेढा)
- आंधळगाव (मंगळवेढा)
- गणेशवाडी
- आरळी (मंगळवेढा)
- आसबेवाडी
- बाठण
- बावची (मंगळवेढा)
- भालेवाडी (मंगळवेढा)
- भाळवणी (मंगळवेढा)
- भोसे (मंगळवेढा)
- बोराळे (मंगळवेढा)
- ब्रम्हपुरी (मंगळवेढा)
चिखलगी देगाव (मंगळवेढा) धरमगाव (मंगळवेढा) ढवळस डिकसाळ दोणाज डोंगरगाव (मंगळवेढा) फाटेवाडी
घारनिकी गोणेवाडी गुंजेगाव (मंगळवेढा) हाजापूर हिवरगाव हुळजंटी हुन्नर जाळीहळ जांगळगी जिट्टी जुनोणी (मंगळवेढा) कचरेवाडी कागाष्ट कर्जळ कात्रळ खडकी (मंगळवेढा) खवे खोमनाळ खुपसांगी लामणतांडा लावंगी (मंगळवेढा) लक्ष्मीदहिवाडी लेंडावेचिचाळे लोणार (मंगळवेढा) माचानूर महमदाबाद माळेवाडी मल्लेवाडी (मंगळवेढा) माणेवाडी मंगळवेढा मारापूर मारवडे मारोळी मेटकरवाडी मुढवी मुंढेवाडी (मंगळवेढा) नांदेश्वर नांदुर (मंगळवेढा) निंबोणी पाडोळकरवाडी पाटखळ पौत रद्दे रहाटेवाडी रेवेवाडी साळागर बुद्रुक साळागर खुर्द
शिराशी शिरनादगी शिवांगी सिद्दपूर सिद्धणकेरी सोद्दी तळसंगी तामदरदी तांदोर उचेठाण येडरव येळगी
सामाजिक संस्था
संपादनसप्तर्षी शैक्षणिक व सामाजिक संस्था संपूर्ण राज्यभरात सामाजिक कार्यासाठी कार्यक्षेत्र असणारी सामाजिक संस्था म्हणून उदयास येत आहे. पंढरपूर मंगळवेढा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांना मदत करते या संस्थे अंतर्गत विविध विकास कामे लोकां पर्यंत पोहचली आहेत
स्थान
संपादनमंगळवेढे हे गाव सोलापूरपासून ५४ किलोमीटर तर पंढरपूरपासून २३ किलोमीटर अंतरावर आहे. दूरवर पसरलेली काळी जमीन ही मंगळवेढ्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून हीच मंगळवेढे नगरी प्रसिद्ध आहे.
लोकसंख्या
संपादन२००१ च्या जनगणनेनुसार मंगळवेढा गावाची लोकसंख्या सुमारे २१,६९४ एवढी आहे. त्यामध्ये ५२ टक्के पुरूष तर ४८ टक्के महिला आहेत. मंगळवेढ्याचा साक्षरता दर ६८ टक्के एवढा आहे, आणि सुमारे १३ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे ६ च्या आतील आहे.
भाषा
संपादनमंगळवेढा तालुक्याची प्रमुख भाषा मराठी असून तालुक्यातील दक्षिणेकडे कन्नड व मराठी या भाषा बोलल्या जातात.
भौगोलिक विविधता
संपादनमंगळवेढ्याला सतत दुष्काळाचे चटके सहन करायला लागले आहेत. मंगळवेढ्याची जमीन ही बहुतेक करून जिराईत आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर या ठिकाणी पिके घेतली जातात.
मंगळवेढ्याची मालदांडी ज्वारी
संपादनमंगळवेढा तालुका ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीस जी.आय. मानांकनही प्राप्त झाले आहे.[ संदर्भ हवा ]
पिके
संपादनप्रामुख्याने ज्वारी, बाजरी, करडई, हरभरा, सूर्यफूल, ऊस ही पिके घेतली जातात.ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
हिंदू-मुस्लिम ऐक्य
संपादनमंगळवेढ्यात सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मारोळी या गावामधील गैबीपीरच्या दर्ग्याला मुस्लिमांबरोबरच हिंदू भाविक ही जातात.डोंगरगाव गावांमध्ये पंचबेबी दर्गा हिंदू मुस्लिम यांचे देवस्थान आहे या देवाचा उरूस आषाढ महिन्यात असतो तसेच हिंदूच्या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधव आनंदाने सहभाग घेतात. नवरात्र महोत्सव मंगळवेढ्यात अतिशय आनंदाने साजरा केला जातो. जवळ जवळ २५ नवरात्र मंडळे या गावात आहेत. डेकोरेशन, हालते देखावे, सजीव देखावे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतात. या तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी या गावामधे सर्वधर्मीय दुर्गामाता नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आहे. या मंडळात सर्व समाजाचे (मुसलमान, धनगर, वडार, कैकाडी, महार, मांग, चाभार, कुंभार, गोंधळी, सुतार, लोहार, पारधी, लिगायत, वाणी) लोक एकत्रितपणे सर्व सण साजरे करतात. संत दामाजीपंत हे या गावचे रहिवासी होते.[ संदर्भ हवा ]
शैक्षणिक, सामाजिक आणि प्रकाशन संस्था
संपादनमंगळवेढ्यात इंग्लिश स्कूल, दामाजी हायस्कूल, जवाहरलाल हायस्कूल, ताराबाई गर्ल्स हायस्कूल, नूतन विद्यालय इत्यादी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, तर दामाजी महाविद्यालय, दलित मित्र कदम गुरुजी ही महाविद्यालये आहेत. या मंगळवेढे नगरीने अनेक गुणवंत विद्यार्थी दिले आहेत.त्यांतील अनेक विद्यार्थी विदेशात वास्तव्य करीत आहेत. मंगळवेढ्यात सन २०११पासून सप्तर्षी प्रकाशन संस्था कार्यरत आहे. ही संस्था अनेक विषयांवरील मराठी, हिंदी तसेच इंग्रजी पुस्तके प्रकाशित करत आली आहे.सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मंगळवेढा ती सामाजिक संस्था अनेक शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवून मंगळवेढ्याचा सामाजिक वारसा प्राधान्याने जपत आहे.ज्ञानदीप प्राथमिक, माध्यमिक विद्यालय (स्थापना २००६)
प्रशासन
संपादनमंगळवेढा हे जरी निमशहर असले तरी फार पूर्वीपासूनच हे एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे मंगळवेढ्याला नगरपरिषद आहे. शहराप्रमाणेच या तालुक्यातील खोमनाळ, माचणूर,सिद्धनकेरी, हुलजंती, मारोळी, लक्ष्मी-दहिवडी या ठिकाणांना सुद्धा धार्मिक महत्त्व आहे. मंगळवेढा तालुक्यात पंचायत समिती, कृषी उत्त्पन बाजार समिती, नगरपरिषद कार्यालय आहेत.
संत भूमी मंगळवेढे ==
मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असून मंगळवेध्याच नाव चालुक्य सम्राट मंगलेशाच्या नावावरुनच पडल असावं असा संदर्भ आहे. मंगलेशाचा इथं तळ होत भिवघाटच्या एका कन्नड शिलालेखात तिथे मंगळवाड असा उल्लेख सापडतो.मंगलेशबीडू म्हणजे मंगलेशाचा तळ तेच आजचे मंगळवेढे कन्नड मध्ये बीडू या शब्दाचा अर तळ मुक्काम असा होतो. राजांच्या आश्रयामुळे कला आणि शिल्प यांचा येथे विकास झाला . शिल्पशास्त्र , मंदिरांची उभारणी , पाण्याच्या बारवा , रम्य प्रासाद ,किल्ला आणि त्यासभोवतालचा खंदक ,किल्ल्याचा तट या सगळ्या गोष्टींनी नटलेले हे वैभवशाली ठिकाण ! काळाच्या ओघात यातील बहुतांश खुणा नष्ट झाल्या असल्या तरीही काही मोजक्या खाणाखुणा आज दिसून येतात . यावरून या बिज्जल राजांच्या राजधानीच्या ठिकाणाचे तत्कालीन प्राचीन भव्य रूप नजरेत भरल्याशिवाय राहत नाही . विविध ठिकाणी विखरून पडलेले दगडी शिल्पखांब ,प्राचीन भव्य मूर्ती , मंदिरांचे खांब शिलालेख , वीरगळ अशांनी खचाखच समृद्ध असलेली ही भूमी!संत दामाजी पंतांच्या कालखंडात दुर्गादेवीचा भीषण दुष्काळ या पंचक्रोशीत पडला आणि अवघ्या मुलुखाची वाताहत केली .उपाशी जनतेसाठी सरकारी ज्वारीची आणि धान्याची कोठारे संत दामाजीपंतांनी रीती करून जनतेला जगवले.त्याची रशीद बिदरच्या बादशहाकडे विठू महाराने पोहोच केली . या घटनेने मंगळवेढा नगरी आणि श्री संत दामाजी पंत साऱ्या मराठी मुलुखात प्रसिद्ध पावले . " पहा मंगळवेढा हा दामाजीचा " किंवा " झाला महार पंढरीनाथ " अशी कवने लिहिले गेली आणि मंगळवेढ्याचे गायक प्रल्हाद शिंदे यांच्या मधुर आवाजात आजही गीते प्रभात समयी कानी पडतात.संत चोखामेळा , त्याची पत्नी सोयरा ,पुत्र कर्ममेळा , मेहुणा बंका , संत कान्होपात्रा,सीताराम महाराज अशा संतांची मांदियाळी येथेच भक्तीचा मळा फुलवत निजधामास प्राप्त झाली . महात्मा बसवेश्वर यांचे वास्तव्य येथेच होते . मधवाचार्य द्वाइत सांप्रदायाचे अर्धर्वयु श्री जयतीर्थ टिकाचार्य त्यांची गादी चालवणारे थोर व्यक्तिमत्व ! जयतीर्थांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि मोठा लौकिक मिळवला .
महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! सन १६६५ मध्ये त्यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पावन झाली . त्यांचा मुक्काम मंगळवेढ्याच्या किल्ल्यामध्ये होता . भोसले राजघराण्यातील मुधोजी राजे , शहाजी राजे , छत्रपती संभाजी राजे ,छत्रपती व्यंकोजी राजे , महाराणी येसूबाई , सातारचे छत्रपती रामराजे , शेवटचे छत्रपती आप्पासाहेब उर्फ शहाजी महाराज यांचे सानिध्याने लागले .छत्रपतींच्या घराण्यातील अनेकांनी भेट दिलेली संत भूमी म्हणजे मंगळवेढा नगरी ! औरंगजेबबादशहा दख्खनच्या मोहिमेवर असताना सुमारे साडेचार वर्षे मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी ( माचनूर- बेगमपूर ) येथेच तळ ठोकून होता . जणू काय ती त्याची तात्पुरती राजधानीच होती . दर शुक्रवारी मंगळवेढ्यास जुम्मा मशिदीमध्ये तो नमाज पडण्यासाठी येत असे . पेशवाई काळात पटवर्धन घराण्यास मंगळवेढा येथील मामलत मिळाली . या घराण्यात अनेक पराक्रमी आणि मुत्सद्दी पुरुष निर्माण झाले . त्यांनी मराठी दौलतीची सेवा केली . मंगळवेढा हे आदिलशाही राजवटीचे जणू प्रवेशद्वार होते .आदिलशहावर कोणालाही आक्रमण करावयाचे झाले तर त्याला मंगळवेढ्याच्या किल्ला प्रथमतः ताब्यात घ्यावा लागत असे . त्यामुळे या भुईकोट किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते . मराठी सत्तेसोबत आदिलशाही गिळंकृत करण्याचा भरपूर प्रयत्न औरंगजेबाने केला . छत्रपती संभाजी राजांनी मंगळवेढा किल्ला ताब्यात घेऊन बादशहाची दक्षिण मोहीम धोक्यात आणली . मराठ्यांच्या इतिहासाचा मानबिंदू ठरावा असा राजकीय पेच त्यांनी बदशहापुढे उभा केला , तोही इथूनच ! प्राचीन इतिहास पाहताना मंगळवेढा नगरी म्हणजे चालुक्य राजघराण्याची एक राजधानी होती . त्याकाळी ही नगरी वैभवशाली होती ,गजबजलेली होती . मंगळवेढ्यातील अति प्राचीन हेमाडपंथी काशीविश्वेश्वराच्या देवळाची निर्मिती शके १४९४ च्या पूर्वी काही दशके झाली असावी , असे अनुमान इतिहासाचार्य राजवाडे यांनी काढले आहे . या अत्यंत देखण्या आणि कलाकुसरीने नटलेल्या , शिलालेखांनी भरलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार मंगळवेढ्याच्या मुजुमदाराने केला . हा मुजुमदार दामाजीपंतांची चहाडी ज्या मुजुमदाराने पातशहाकडे केली त्याचाच वंशज होता असे म्हणतात .श्री संत दामाजी पंतांचे वंशज सध्या गुलबर्ग्यामध्ये आहेत , असे समजते . इतिहासकार राजवाडे यांनी दामाजीपंतांबद्दल सांगितलेली कथा अशी -- खूप भीषण दुष्काळ पडला , ओळीने चारपाच वर्षे काहीच पाऊस पडला नाही .लोक अन्नाविना मरू लागले . संत प्रवृत्तीच्या दामाजीपंतांना ते सहन झाले नाही . ते बादशहाचे कुलकर्णी म्हणून काम करत . त्यांनी सरकारी धान्यकोठारातील ज्वारी सगळ्या लोकांना वाटून टाकली . धान्य देऊन टाकल्यानंतर राशिदेचे पैसे बादशहास देणे दामाजीपंतांना श्यक्य न्हवते . राशिदीकरता बादशहाचे धरणे दमाजीपंतांवर येऊन बसले .द्रव्य कोठून आणावे अशा विवंचनेत दामाजीपंत पडले .अन्यथा काळकोठडी अटळ होती .या संकटाचा साक्षीदार विठू महार होता . त्याच्याकडे वडिलोपार्जित पुरलेले धन होते . राशिदीची रक्कम पूर्णपणे फेडण्यास ते पुरेसे होते . हे द्रव्य बिदराला सरकारात भरण्याची प्रेरणा त्याला झाली कारण तो विठ्ठलभक्त वारकरी होता . विठू महाराने ही रक्कम बिदरला जाऊन सरकारजमा केली , रशीद दामाजीपंतांना दिली आणि दामाजीपंतांची सुखरूप सुटका झाली.अशी आख्यायिका आहे.मंगळवेढेकरांना अभिमान आहे तो मंगळवेढ्याचा काळया कसदार मातीतील संतांचा , नररत्नांचा...(संदर्भ संत भूमी मंगळवेढे संपादन सिद्धेश्वर घुले कुमुदिनी घुले सप्तर्षी प्रकाशन)
संत दामाजी, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा, बाळकृष्ण महाराज संत कर्ममेळा, संत निर्मळा, संत सोयराबाई, संत गोपाबाई, स्वामी समर्थ, संत बसवेश्वर महाराज, बाबा महाराज आर्वीकर, संत बागडे महाराज मारोळी, माचणूर सिताराम महाराज खर्डीकर असे अनेक थोर संत येथे होऊन गेले. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचेसुद्धा चरणस्पर्श या संत भूमीला लाभले आहेत. शिवाजी महाराजांनी मंगळवेढ्यात चार दिवस मुक्काम केला होता.[ संदर्भ हवा ]
मंगळवेढ्यातील महत्त्वाच्या बँका आणि पतसंस्था
संपादन१. स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा
२ धनश्री महिला पतसंस्था मंगळवेढा
३. बँक ऑफ इंडिया
४. बँक ऑफ महाराष्ट्र
५.राजमाता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
६.रतनचंद शहा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
७.पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्हh बँक शाखा मंगळवेढा
८.धनश्री मल्टि-स्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड
९. बळीराजा पतसंस्था
१०. जिजामाता महिला पतसंस्था
११.मंगळवेढा लोकमंगल सहकारी पतसंस्था मंगळवेढा
संदर्भ
संपादन- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |