माढा

माढा तालुक्यातील सिना नदीला मिळणारा आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा कव्हे या गावात मिळतो.
  ?माढा
माढ
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

१८° ०१′ ००.१२″ N, ७५° ३१′ ००.१२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
मोठे शहर कूर्डुवाडी
जवळचे शहर ‌ बार्शी, पंढरपूर
प्रांत माढा
विभाग पुणे
जिल्हा सोलापूर
लोकसंख्या २८,००० (२०११)
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ माढा
विधानसभा मतदारसंघ माढा
तहसील तहसील कार्यालय, माढा
पंचायत समिती पंचायत समिती, कूर्डुवाडी

पार्श्वभूमी

संपादन

माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते.

उजनी धरण

संपादन

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी (१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हणले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

माढा तालुक्यात टेंभुर्णी​ जवळील भीमानगर या गावाजवळ,सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी ठरलेले भीमा नदीवरचे उजनी​ हे एक मोठे धरण आहे.याचे पाणी पुढे नीरा-नरसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला'यशवंतसागर'असेही संबोधले जाते.

क्षमता -

या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (Gigalitres) एवढी प्रचंड आहे.११७ टि.एम.सी (१००%) क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोहचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात.फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो.

प्राचीन भुईकोट किल्ला -

माढ्यामध्ये प्राचीन भुईकोट किल्ला आहे. याची निर्मिती राव रंभाजी निंबाळकर राजे यांनी केली. माढा शहराची लोकसंख्या जवळपास ३०,००० आहे. माढ्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली अाहे. किल्ल्याची पडझड झाली आहे.पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे.

तालुक्यातील गावे

संपादन
  1. आढेगाव
  2. आहेरगाव
  3. अकोलेबुद्रुक
  4. अकोलेखुर्द
  5. आकुळगाव
  6. आकुंभे
  7. आळेगाव बुद्रुक
  8. आळेगाव खुर्द
  9. अंबड (माढा)
  10. आंजणगाव खुर्द
  11. आंजणगाव उमटे
  12. आरण
  13. बादलेवाडी
  14. बैरागवाडी
  15. बारलोणी
  16. बावी (माढा)
  17. बेंबळे
  18. भेंड (माढा)
  19. भोगेवाडी
  20. भोसरे
  21. भुईंजे
  22. भुताष्टे
  23. बितेरगाव
  24. बुद्रुकवाडी
  25. चांदज
  26. चव्हाणवाडी (माढा)
  27. चिंचगाव (माढा)
  28. चिंचोळी (माढा)
  29. चोभेपिंपरी
  30. दहिवली (माढा)
  31. दर्फळ
  32. धानोरे (माढा)
  33. ढवळस (माढा)
  34. फूटजावालगाव
  35. गारअकोले
  36. गवळेवाडी
  37. घाटणे
  38. घोटी
  39. हाटकरवाडी
  40. होळेखुर्द
  41. जाधववाडी (माढा)
  42. जाखळे
  43. जामगाव (माढा)
  44. कान्हेरगाव (माढा)
  45. कापसेवाडी
  46. कुर्डुवाडी
  47. कव्हे (माढा)
  48. केवाड
  49. खैराव
  50. खैरेवाडी (माढा)
  51. कुंभेज
  52. कुर्डु
  53. लहु
  54. लऊळ
  55. लोंढेवाडी
  56. लोणी (माढा)
  57. माढा
  58. महादेववाडी (माढा)
  59. महातपूर
  60. मालेगाव (माढा)
  61. माणेगाव (माढा)
  62. म्हैसगाव
  63. मिटकळवाडी
  64. मोडनिंब
  65. मुंगाशी (माढा)
  66. नाडी
  67. नागोर्ली
  68. निमगाव (माढा)
  69. निमगाव टेंभुर्णी
  70. पडसाळी (माढा)
  71. पालवण (माढा)
  72. पांचफुलवाडी
  73. पपनस (माढा)
  74. परिते (माढा)
  75. परितेवाडी
  76. पिंपळखुंटे
  77. पिंपळनेर (माढा)
  78. रणदिवेवाडी
  79. रांझणी (माढा)
  80. रिढोरे
  81. रोपाळे कव्हे
  82. रोपाळे खुर्द
  83. रूई (माढा)
  84. सापटणे
  85. सापटणे टेंभुर्णी
  86. शेडशिंगे
  87. शेवरे (माढा)
  88. शिंदेवाडी (माढा)
  89. शिंगेवाडी
  90. शिराळमाढा
  91. शिराळटेंभुर्णी
  92. सोळणकरवाडी
  93. सुलतानपूर (माढा)
  94. सुरळी
  95. ताडवळे
  96. टाकळीटेंभुर्णी
  97. तांबावे
  98. तांदुळवाडी (माढा)
  99. टेंभुर्णी
  100. तुळशी (माढा)
  101. उजनीमाढा
  102. उजनीटेंभुर्णी
  103. उंदरगाव (माढा)
  104. उपळाई बुद्रुक
  105. उपळाई खुर्द
  106. उपळवटे
  107. वेणेगाव
  108. विठ्ठलवाडी (माढा)
  109. वडाचीवाडी
  110. वाडोळी (माढा)
  111. वडशिंगे
  112. वाकव
  113. वरवडे (माढा)
  114. वेताळवाडी (माढा)

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate