पिंपळखुंटे

  ?पिंपळखुंटे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर माढा
जिल्हा सोलापूर जिल्हा
लोकसंख्या
शहर
लिंग गुणोत्तर
• पुरूष
• स्त्री
२,५७९censusindia.gov.in २०११ () (२०११)
• १०
१.०७ /
• ८१.७५ %
• ६३.९४ %
भाषा मराठी
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३२०८
• +०२१८३
• एम् एच् ४५
लक्ष्मी नृसिंह मंदिर पिंपळखुंटे

पिंपळखुंटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे.

लक्ष्मीनृसिंह मंदिर पिंपळखुंटे
लक्ष्मीनृसिंह मंदिर पिंपळखुंटे

भौगोलिक स्थान

संपादन

पिंपळखुंटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातले एक गाव आहे.पिंपळखुंटे जिल्हा मुख्यालय सोलापूरपासून ९२ किमीवर, तर माढा या तालुका ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे.राजधानी मुंबई पासून ते ३२८ किलोमीटर अंतरावर आहे पिंपळखुंटेचा पिन कोड ४१३२०८ आहे. त्याच पोस्टल मुख्य कार्यालय कुर्डुवाडी आहे.मराठी येथे स्थानिक भाषा आहे.

जवळपासची गावे

संपादन

पिंपळखुंटे जवळील गावे :चोभे पिंपरी (५ किमी), निमगाव टेंभुर्णी, बादलेवाडी (६ किमी), शेडशिंगे (६ किमी), कुर्डू (६ किमी), अंबड (४ किमी.)

लोकजीवन

संपादन

येथील लोकजीवन सर्व सामान्य असून ९०% लोक शेतीवर अवलंबून आहे , १०% लोक नोकरीसाठी बाहेर जातात.

शेती : मुख्य काम शेती आहे ,विविध प्रकारची फुलबाग ,फळबाग , नगदी पिके ,दूध अशा प्रकारचे व्यवसाय आहेत.शेतीसाठी पाणी नसून पूर्ण पावसावर अवलंबून आहे.शासनाकडे पाण्याची मागणी प्रलंबीत आहे

पशुपालन : गावामध्ये  पशुपालन केले जाते त्यामध्ये दूध देणारे पशु जास्त प्रमाणात आहे .

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

मंदिर

संपादन

हे मंदिर पुरातन असून पवित्र स्थान आहे.

साधारणतः ४० वर्ष जुने आहे व गावचे हे ग्राम दैवत असून याची दररोज पूजा व आरती सकाळी व संध्याकाळी केली आहे.

नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य:

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.

नृसिंह नवरात्र: नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते.

वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.

नागरी सुविधा

संपादन

पिंपळखुंटे कसे पोहोचाल?

रेल्वे:

संपादन

पिंपळखुंटे पासून जवळच्या रेल्वे स्थानके: धवलस रेल्वे स्थानक ३ किलोमीटर आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानक १३ किलोमीटर आहे.

सोलापूर प्रमुख रेल्वे जंक्शन पिंपळखुंटे पासून ८५ किमी आहे

पिंपळखुंटे-कुर्डुवाडी १३ किलोमीटर आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची दररोज बस आहे.

बस वेळापत्रकः कुर्डुवाडी-पिंपळखुंटे

सकाळी ०७:००,०९:३०, दुपारी १२:००, संध्याकाळी ०५:३०

शिक्षण  :

संपादन

पिंपळखुंटे जवळील महाविद्यालये: विठ्ठलराव शिंदे कॉलेज, अंबड; के एन भिसे कॉलेज, कुर्डुवाडी

पिंपळखुंटे जवळील विद्यालय :न्यू इंग्लिश स्कूल,पिंपळखुंटे, सुशिलाबाई पाटील् इंग्लिश स्कूल,पिंपळखुंटे

हवामान

संपादन

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate