इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (आय.आय.एम) या भारतातील अग्रगण्य मॅनेजमेन्ट संस्था आहेत.या संस्थांमध्ये मॅनेजमेन्टवर दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला कॅट (कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट) या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेतून आणि त्यानंतर मुलाखतींमधून जावे लागते.

देशातील सर्वात पहिले आय.आय.एम कलकत्ता येथे १९५९ मध्ये स्थापन झाले. त्यानंतर अहमदाबाद येथे १९६१ मध्ये, बंगलोर येथे १९७३ मध्ये, लखनौ येथे १९८४ मध्ये, कालिकत (कोझिकोडे-कोळ्हिकोड) आणि इंदूर येथे १९९६ मध्ये, शिलॉंग येथे २००७ मध्ये, रोहतक, रांची आणि रायपूर येथे २०१० मध्ये तर त्रिचनापल्ली, उदयपूर आणि काशीपूर येथे २०११ मध्ये आय.आय.एम ची स्थापना झाली. २०१४ च्या अर्थसंकल्पात सरकारने पंजाब (बहुधा अमृतसर येथे), महाराष्ट्र (बहुधा नागपूर येथे), बिहार (बहुधा गया येथे), हिमाचल प्रदेश (बहुधा सिरमौर येथे) आणि ओरिसा (बहुधा भुवनेश्वर येथे) या राज्यांमध्ये नव्या आय.आय.एम ची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली.