आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्था (इंग्लिशः The International Atomic Energy Agency -IAEA): अणुउर्जेचा वापर शांततामय कारणांसाठी वाढावा आणि लष्करी कारणांसाठी वापर टाळावा यासाठी प्रयत्न करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रांनी तिची स्थापना त्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय करारान्वये स्थापना केली असली तरी आयएईए ही संस्था आमसभा आणि सुरक्षा परिषद यांच्याकडे आपले निवेदन सादर करते.

आयएईएचे मुख्यालय ऑस्ट्रीया देशात व्हिएन्ना येथे आहे.त्याशिवाय टोरॅंटो, कॅनडा आणि टोक्यो, जपान येथे तिची दोन विभागीय सुरक्षारक्षक कार्यालये आहेत. याशिवाय न्यू यॉर्क अमेरिका आणि जीनिव्हा, स्वीत्झर्लंड येथे तिची दोन कायार्लये आहेत. ऑस्ट्रियात सिबर्सडॉर्फ आणि व्हिएन्ना येथे तसेच इटलीत मोनॅको आणि ट्राईस्ट येथे तिच्या प्रयोगशाळा आहेत.

आयएईएची स्थापना एक स्वायत्त संस्था म्हणून २९ जुलै , १९५७ मध्ये झाली. त्यापूर्वी, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेपुढे बोलताना सन १९५३ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ड्वीट डी एसेनहोवर यांनी तिची कल्पना मांडली होती. ७ ऑक्टोबर २००५ रोजी ही संघटना आणि तिचे महासंचालक महंमद अल् बारदेई यांना संयुक्तपणे शांततेचे नोबेल पारितोषक जाहीर करण्यात आली.