हेलन ॲन रिचर्डसन - खान (जन्म:२१ नोव्हेंबर १९३८), हेलन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या, भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत. त्यांनी ७००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.[] त्या हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ट कलाकार आहेत. सत्तर वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना सहाय्यक, पात्र भूमिका आणि पाहुण्या भूमिकांसाठी ओळखले जाते.

हेलन
जन्म हेलन सलीम खान
(हेलन रिचर्डसन)

२१ नोव्हेंबर, १९३९ (1939-11-21) (वय: ८४)
बर्मा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बॉलीवुड
कारकीर्दीचा काळ इ.स. १९५१ - चालू
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट हावरा ब्रिज
शोले
कारवाँ
डॉन
पगला कहीं का
लहु के दो रंग
पुरस्कार पद्मश्री
पती
प्रेम नारायण अरोरा
(ल. १९५७; घ. १९४७)
सलिम खान (ल. १९८१)

हेलन यांना दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत, आणि त्यांना अनेकदा त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय नॉच डान्सर म्हणले जाते.[] 2009 मध्ये, हेलन यांना भारत सरकारकडून पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.[] चार चित्रपट आणि एका पुस्तकासाठी त्या प्रेरणा आहेत.[]

बालपण व पार्श्वभूमी

संपादन

भारतीय दांपत्याच्या पोटी बर्मामध्ये जन्मलेल्या हेलनला रॉजर नावाचा एक भाऊ व जेनिफर नावाची एक बहीण आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान तिच्या वडिलांचे निधन झाले. सन १९४३ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईस स्थलांतरित झाले. तिची आई परिचारिकेचे काम करीत होती. आईच्या तुटपुंज्या पगारात भागत नसल्यामुळे हेलनला नाईलाजाने शाळा बंद करून कुटुंबासाठी अर्थार्जन करणे भाग पडले.[]

कारकीर्द

संपादन

कुक्कू नावाची एक अभिनेत्री हेलनच्या कुटुंबाची मैत्रीण होती; तिच्यामुळे हेलनचे चित्रपटाच्या प्रांतात पदार्पण झाले. तिने हेलनला शबिस्तानआवारा या चित्रपटात इ.स. १९५१ मध्ये, समूहनृत्यात एक काम मिळवून दिले. पुढे हेलनला अनेक भूमिका मिळाल्या. अलिफ लैला (१९५२), हूर-ई-अरब"(१९५३) इत्यादी चित्रपटांमध्ये हेलनला एकल नृत्याचे काम मिळाले. बारिश या हिंदी चित्रपटातही तिला एक नृत्य मिळाले. इ.स. १९५८मध्ये तिने मेरा नाम चिं चिं चु या हावरा ब्रिज मधील गीता दत्तने गायलेल्या गाण्यावर एक नृत्य केले. हेलनच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गीता दत्तने तिच्यासाठी अनेक गीते गायली.[] इ.स.१९६० च्या दशकात१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस आशा भोसलेने यांनीदेखील तिच्यासाठी अनेक गीते गायली. इ.स. १९६५मध्ये गुमनाम या चित्रपटातील भूमिकेसाठी हेलनला फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. पगला कहीं का या चित्रपटात(१९७०) हेलनने अप्रतिम अभिनय केला आहे. सलिम खान या लेखकाने तिला ईमान धरम, डॉन, दोस्तानाशोलेसारख्या चित्रपटांमध्ये काम मिळवून दिले. लहु के दो रंग या चित्रपटातील अभिनयासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला. अनेक वर्षापूर्वी हेलनने चित्रपट-निवृत्ती पत्करली, पण अनेक चित्रपटांत सन १९९९ व २००० मध्ये तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. मोहब्बतें या चित्रपटात तिने एका मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेची भूमिका केली. या चित्रपटाच्या कथानकात मुख्याध्यापिकेला नृत्याच्या रंगमंचावर खेचले जाते व ती सर्वांना आपल्या नृत्याने अचंबित करते. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात तिने विशेष पाहुणी कलाकार म्हणून सलमान खानच्या आईची भूमिका केली. तिला इ.स. २००९मध्ये पद्मश्री पुरस्काराने, ऐश्वर्या राय व अक्षय कुमार या कलाकारांसमवेत सन्मानित केले गेले.

अभिनयापलीकडची कारकीर्द

संपादन

हेलनने लंडन, पॅरिसहाँग काँग येथे नृत्याचे अनेक कार्यक्रम केले आहेत. १९७३ मध्ये हेलनवर ३० मिनिटांचा एक माहितीपट तयार करण्यात आला. जेरी पिंटो यांनी हेलनवर एक पुस्तकही लिहिले आहे. या इंग्रजी पुस्तकाचे नाव हेलन : दी लाइफ अँड टाइम्स ऑफ एच बॉम्ब असे आहे.[][] या पुस्तकास सन २००७ मध्ये "चित्रपटावरील सर्वात चांगल्या पुस्तकासाठीचा पुरस्कार" देण्यात आला.

वैयक्तिक जीवन

संपादन

सन १९८० मध्ये हेलनचा सलिम खानशी विवाह झाला व ती त्याची दुसरी पत्नी बनली. त्यांनी 'अर्पिता' नावाची एक मुलगी दत्तक घेतली.

निवडक चित्रपट

संपादन

पुरस्कार व नामनिर्देशने

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Pinto, Jerry (2006). Helen: The Life and Times of an H-bomb (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-303124-6.
  2. ^ "toi". 2012-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Helen, Ash, Akshay named for Padma Shri". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2009-01-26. 2022-01-10 रोजी पाहिले.
  4. ^ "ol".
  5. ^ "हेलनचे मनोगत". 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-03-28 रोजी पाहिले.
  6. ^ हेलनसाठी गीता दत्तची गाणी
  7. ^ "'हेलन : दी लाइफ अँड टाइम्स ऑफ एच बॉम्ब' हेलनवर लिहिलेले एक पुस्तक". 2008-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-03-28 रोजी पाहिले.
  8. ^ रेडिफवर जेरी पिंटोची मुलाखात
  9. ^ "पहिले फिल्मफेअर अवार्ड १९५३" (PDF). 2009-06-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-03-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन