आवारा
आवारा हा १९५१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वतः राज कपूर व नर्गिस ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. १९५१ सालामधील सर्वात यशस्वी ठरलेल्या आवारा मधील मुकेशने गायलेले आवारा हूॅं हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.
आवारा | |
---|---|
दिग्दर्शन | राज कपूर |
निर्मिती | राज कपूर |
कथा | ख्वाजा अहमद अब्बास |
प्रमुख कलाकार |
पृथ्वीराज कपूर राज कपूर नर्गिस लीला चिटणीस शशी कपूर |
गीते | शैलेंद्र |
संगीत | शंकर जयकिशन |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९५१ |
अवधी | १९३ मिनिटे |
भारताव्यतिरिक्त आवारा सोव्हिएत संघ, चीन,अफगाणिस्तान, तुर्कस्तान रोमेनिया इत्यादी देशांमध्ये देखील यशस्वीपणे चालला.
बाह्य दुवे
संपादन- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील आवारा चे पान (इंग्लिश मजकूर)