जुलै २२
दिनांक
(२२ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०३ वा किंवा लीप वर्षात २०४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी संपादन करा
अठरावे शतक संपादन करा
- १७९३ - अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
एकोणिसावे शतक संपादन करा
- १८१२ - सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्यूक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
विसावे शतक संपादन करा
- १९१६ - सान फ्रांसिस्कोमध्ये ध्वजसंचलनाचे वेळी बॉम्बस्फोट. १० ठार, ४० जखमी.
- १९३३ - वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
- १९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
- १९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
- १९४६ - इर्गुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बहल्ला चढवला. ९० ठार.
एकविसावे शतक संपादन करा
- २००३ - अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.
जन्म संपादन करा
- १८८७ - गुस्ताव लुडविग हेर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
- १९२१ - विल्यम रॉथ, अमेरिकेचा सेनेटर.
- १९२३ - मुकेश, पार्श्वगायक.
- १९२३ - बॉब डोल, अमेरिकेचा सेनेटर.
- १९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.
- १९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे आमदार व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष.
मृत्यू संपादन करा
- १४६१ - चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
- १५४० - जॉन झापोल्या, हंगेरीचा राजा.
- १६७६ - पोप क्लेमेंट दहावा.
- १८२६ - ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.
- १८३२ - नेपोलियन दुसरा, फ्रांसचा राजा.
- १९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक.
- १९५० - विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा १०वा पंतप्रधान.
- १९५८ - मिखाइल झोश्चेन्को, रशियन लेखक.
- २००३ - उदय हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
- २००३ - कुसे हुसेन, सद्दाम हुसेनचा मुलगा.
प्रतिवार्षिक पालन संपादन करा
- पाय दिन. (२२/७ = पाय)
बाह्य दुवे संपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै महिना