सदस्य चर्चा:Gypsypkd/जुनी चर्चा १
जुन्या चर्चा | पासून | पर्यंत |
---|---|---|
चर्चा १ | जानेवारी ३, २००९ | ऑक्टोबर ३१, २००९ |
चर्चा २ | नोव्हेंबर १, २००९ | मार्च १८, २०१० |
चर्चा ३ | मार्च १८, २०१० | मे १४, २०१० |
चर्चा ४ | मे १४, २०१० | ऑगस्ट ९, २०१० |
स्वागत
संपादननमस्कार सारंग,
मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे.आपण लिहित असलेला भारतीय नाणी हा लेख अत्यंत माहितीपूर्ण आहे.
मात्र मराठी विकिपीडियावर भारतीय रुपया या नावाचा लेख आधीपासूनच अस्तित्वात आहे. भारतीय नाणी या लेखातील माहिती तुम्ही भारतीय रुपया या लेखात इतिहास असा नवीन विभाग करून टाकू शकता.
संपादनाबाबत वा इतरही काही प्रश्न असल्यास आपण चावडीवर विचारू शकता.
आपल्याकडून अधिक योगदानाच्या अपेक्षेत,
क्षितिज पाडळकर ०६:५८, ४ जानेवारी २००९ (UTC)
हेल्प मी
संपादनमला मदत हवी आहे!
मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा
आपण मला नवीन लेख लिहितांना / संपादन करतांना आवश्यक असणार्या सर्व बाबींविषयी मदत द्यावी. जसे शिर्षक, संदर्भ, इ. तसेच लेख अन्य कोणी वाचल्यास त्यांचा प्रतिसाद मिळू शकेल का?
- नमस्कार सारंग आपण आपल्या चर्चा पानावर {{helpme}}साच्या एवजी {{fasthelp}} लावला होता तो मी बदलला.{{fasthelp}}साचा ही मदत् देताना वापरला जातो तर {{helpme}} साचा मदत घेताना वपरला जातो. .मी अश्यात बरीच सहाय्य पाने अपडेट केली आहेत,काही शंका असतील तर जरूर कळवावे.
- आपण १०० पेक्षा अधिक संपादनाचा आकडा मागेच ओलांडून गेला आहात आपण विकिपीडिया:निर्वाह विकिपीडिया:नामविश्व विकिपीडीया:गस्त हे लेख जरूर वाचावेत.
- धन्यवाद
- Mahitgar १४:५२, १६ जून २००९ (UTC)
अभिनंदन
संपादननमस्कार Gypsypkd/जुनी चर्चा १,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगा आणि प्रवृत्त करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
Mahitgar ०८:३०, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
नमस्कार
संपादननमस्कार सारंग,
पंचतंत्र लेख वाचला. लेख छोटेखानी व छान आहे. तिथे तुमचे नाव आहे. विकीत लेखक स्वतःचे नाव देत नाहीत. इतिहास या सदरातून ते समजते.
कृपया आपण हे नाव काढाल का?
तुम्हाला रशियन येते असे वाचले. रशियन भाषा मराठी किंबहुना कोणत्याही भारतीय विकीवर फारच थोड्या जणांना येत असेल. रशियन विकीवरच्या उत्कृष्ट लेखांची नावे येथे आहेत. यातील काही लेख जरी थेट मराठीत आले तर ती आपल्या मराठी विकीवरची मोलाची भर ठरेल.
Dakutaa ०५:०७, १५ फेब्रुवारी २००९ (UTC)
चित्रे
संपादनइतर विकिपीडियावरील चित्रे येथे घालण्यासाठी दोन उपाय आहेत.
१. जर तेथील चित्र कॉमन्सवर असेल तर काहीही करण्याची गरज नाही. ते चित्र मराठी विकिपीडियावर उद्धृत केले असता आपोआप दिसते.
२. जर चित्र कॉमन्सवर नसेल तर ते (प्रताधिकारित नसलेले) चित्र आपल्या संगणकावर उतरवून घ्यावे (save picture as...) आणि मग येथे डावकडील साधनपेटीतील संचिका चढवा दुव्यावरुन चढवावे आणि मग उद्धृत करावे.
अभय नातू १९:३७, २७ एप्रिल २००९ (UTC)
लेखांचे एकत्रीकरण
संपादनसारंग,
एकाच विषयावर दोन लेख आढळल्यास --
१. दोन्ही(किंवा जास्त) लेख एकाच विषयावर आहेत हे पडताळून पहावे.
२. दोनपैकी कोणत्या लेखाचे शीर्षक बरोबर आहे हे ठरवावे.
३. ज्या लेखांचे शीर्षक सुयोग्य नाही त्यातील मजकूर योग्य शीर्षकाच्या लेखात हलवावा.
४. तेथून योग्य शीर्षकाकडे पुनर्निर्देशन द्यावे.
५. योग्य शीर्षकाचा लेख संपादित करावा.
अभय नातू १६:२४, ३१ मे २००९ (UTC)
साचा बदल
संपादनसाच्याचे संपादन इतर लेखांप्रमाणेच आहे, जेथे तो वापरला आहे त्या लेखाच्या स्रोतात साच्याचे नाव शोधा आणि साचा:<साचानाव> असे डावीकडील शोधपेटीत टाकून त्या साच्यावर जा आणि बदल करा. (किंवा साचा वापर केलेल्या लेखाच्या संपादनासाठी टिचकी दया आणि पानावर सर्वात खाली (स्रोत पेटीत नव्हे!) तुम्हाला तेथे वापरलेल्या सर्व साच्यांचे दूवे दिसतील) वर्ग पानांवर बदल करण्यासाठी जे लेख चुकीचे दिसत आहे त्यांचे स्थानांतरण करावे लागते, जसे मी मलकापुर या लेखाचे स्थानांतरण मलकापूर असे केले त्यामुळे वर्ग पानावर बदल झाला. - कोल्हापुरी ०९:५४, ४ जुलै २००९ (UTC)
असे?
संपादनआपल्याला असेच अभिप्रेत आहे काय का चौकटी शिवाय हवे. Mahitgar ०८:२९, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
ही चित्रे अनुक्रमे बरोबर आहेत. त्यांच्याखाली डावीकडून क्र. १, २, ३ असे लिहावे का ?
- आपल्याला जे अधिक उपयूक्त वाटेल तसे.मी लेखात इंग्रजी विकिपीडियातील लेखाचा दुवा जोडला आहे.पाहिला नसेल तर तो लेख संदर्भाकरिता पाहून घ्यावा.
की ती चित्रे सलगपणे एकच दृष्य म्हणून एकत्र जोडता येतील?
- खरेच कल्पना नाही. हा मुद्दा आपण चावडीवर मांडल्यास इतर सदस्यांकडून मर्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल.
Mahitgar ०९:०५, ५ ऑगस्ट २००९ (UTC)
np
संपादनमी [१] या संकेतस्थळावरील software वापरून चित्रे जोडली.
माझ्यासाठीपण हा पहिलाच प्रयोग होता...but that software is really good and easy (and open source :) ).
आपला,
क्षितिज पाडळकर २३:२२, ९ ऑगस्ट २००९ (UTC)
खरगपूर
संपादन- उदाहरणार्थ आपल्या संपादनापूर्वी खरगपूर अवर्गीकृत होता.पण आता मला तो वर्गीकृत मध्ये दिसतो. कदाचित तुमच्या न्याहाळकाची सय (browser cache) आपल्याला नवीन बदल होऊनही तुमच्या संगणकावर दाखवत नसेल असे बरेचदा होते.
एक तर पान कंट्रोलCtrl आणि F5 कळ एकदम दाबून रिफ्रेश करा त्याने फायदा झाला नाहीतर
आपण इंटरनेट एक्स्प्लोरर वापरता काय? तसे असेल तर tools-internet options येथे cookies delet करा आणि नंतर पेज रेफ़्रेश्श करा.
Mahitgar १२:४१, १५ ऑगस्ट २००९ (UTC)
वर्गिकरणे
संपादन- प्रथमत: चांगले काम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.मी तुम्ही केलेली एक दोनच वर्गीकरणे तपासली सर्वसाधारणत: ठिक आहेत. विशेष:उपसर्गसुची येथे वर्ग नामविश्व निवडल्यास व शोध घेतल्यास आधी वापारले गेलेल्या वर्गीकरण नावांचा अंदाज येऊ शकतो व वर्गीकरणांची काही वेळा होणारी पुनरावॄत्ती किंवा दोन लेख एकाच वर्गीकरणात असू शकणारे लेख फक्त लेख्नन पद्धतीतील फरकांमूळे वेगळ्या ठिकाणी दिसण्याचे टळू शकेल.
जमल्यास,किमान प्रकल्पाअंतर्गत कोणती वर्गीकरणे आहेत त्यांचा शोध घेऊन प्रकल्प वार वर्गीकरणे नमुद करून केली तर अधिक उत्तम. नवीन पाने बनविणार्यांना समजणे सोपे जाईल.
जसे चेकोस्लोव्हेकिया फुटबॉल संघ चे वर्ग:चेकोस्लोव्हेकिया हे वर्गीकरण बरोबरच आहे . सोबत कदाचित वर्ग:चेकोस्लोव्हेकिया फुटबॉल संघ आणि ह्या वर्गाचे वर्गीकरण वर्ग:देशांनुसार फुटबॉल संघ वर्ग:फुटबॉल संघ वर्ग:फुटबॉल असेही करू शकू.
धन्यवाद Mahitgar १३:०७, १५ ऑगस्ट २००९ (UTC)
- अजून एक... विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण इथे तुम्हाला वर्गीकरणाबद्दल अधिक माहिती मिळू शकते. मीपण अधून मधून विशेष:अवर्गीकृत_पाने येथे जाऊन तेथील लेखांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो.
- मी विशेष पृष्ठे / अवर्गीकृत पाने येथील मला माहीत असलेल्या पानांमध्ये वर्गवारी करीत आहे. बदल करून झाल्यावर मूळ अवर्गीकृत पानावर त्याची नोंद बदलत नाही का
- सामान्यतः ही पाने लगेचच update होत नाहीत. ती प्रत्येक दिवशी एकदा update होतात. व सयीमध्ये (cache) ठेवली जातात. त्यामुळे विशेष:अवर्गीकृत_पाने येथे लगेचच बदल दिसत नाहीत.
- पुनश्च चांगले काम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.
- क्षितिज पाडळकर १३:२२, १५ ऑगस्ट २००९ (UTC)
पाने काढा व पुनर्निर्देशन
संपादननमस्कार सारंग,
आपण घृष्णेश्वर मंदिर येथे {{पानकाढा}} असा संदेश टाकला होता. विकिवर आपण खालील संकेत वापरतो.
- जर लेखाचे नाव पूर्णच चूक असेल, तरच {{पानकाढा}} वापरले जाते. उदा. मोर हा पक्शी वर नीबन्ध्
- मात्र एकच लेख अभिप्रेत असेल, तर पुनर्निर्देशन #REDIRECT [[मूळ लेख नाव]] असे वापरले जाते. उदा. घृष्णेश्वर मंदिर --> घृष्णेश्वर.
यामुळे जर विकिच्या शोधपेटीमध्ये घृष्णेश्वर मंदिर टाकले असता आपण आपोआप घृष्णेश्वर या लेखाकडे जातो.
- अजून एका ठिकाणी पुनर्निर्देशने मोठ्या प्रमाणात वापरली जातात, ती म्हणजे इंग्रजी (अभारतीय) लोकांची नावे. त्यांच्या नावाचे Transliteration दोन तीन प्रकारे होऊ शकते. उदा. Daniel can be डॅनियेल, डॅनियल etc. अशा वेळेस आपण सर्वात common उच्चारानुसार लेख बनवतो व इतर लेख तिकडे पुनर्निर्देशित करतो.
I hope this helps.
क्षितिज पाडळकर १२:५३, १५ ऑगस्ट २००९ (UTC)
भारतीय नाणी
संपादनपुनर्निदेशन केलेले आहे, मला माहित नाही काय प्रोब्लेम होता ते. तुम्ही पक्ष्यांबाबत बरेच योगदान दिलेले आहे, आभारी आहे. मदत लागल्यास विचारावे, किंवा मीही विचारेन अजयबिडवे ११:४९, १६ ऑगस्ट २००९ (UTC)
अंतानास मर्किस
संपादनमी तुमच्याशी सहमत आहे कारण या लेखाचा इतिहास पाहिला असता लेखाची निर्मिती अभय नातूंनी केली आहे आणि पान वगळण्याच्या साचा delete इंग्रजी शब्द साचा वापरून अनामिक अमराठी व्यक्तिने स्पॅम केले असे वाटते. साचे इंग्रजीत जसेच्या तसे घेण्यातून उद्भवणारा हा एक त्रास आहे.
पाने शक्यतो ठेवता येतील हेच पहावयास हवे. पान काढा साचा लावताना आणि काढताना पानाचे चर्चा पान,इतिहास, येथे काय जोडले आहे आणि जमले तर काही आंतरविकिदुवे(असतील तर) तपासून निर्णय घ्यावा.
विकिपीडिया:कारण आणि en:Wikipedia:Deletion Policy लेखाचे भाषांतरास वेळ देऊ शकला तर पहावे.
माहीतगार ११:१९, २० ऑगस्ट २००९ (UTC)
Welcome ! माहीतगार १२:०१, २० ऑगस्ट २००९ (UTC)
मदत हवी
संपादन- विकिपीडिया:वनस्पती/करावयाच्या गोष्टींची यादी परिष्कृत करण्यात मदत हवी आहे.
माहीतगार ०७:०२, २१ ऑगस्ट २००९ (UTC)
रशीयन
संपादनयापूर्वी रशीयन शब्दांच्या लेखनाबद्दल चर्चा झाली असल्यास मला कल्पना नाही.बहूतेक नसावीच.इंग्रजी जर्मन इत्यादी शब्द्दंबद्दल यापूर्वी चर्चा झाल्या परंतु मला त्यात सहभाग घेण्याचा फारसा योग आला नाही.या बद्दल अधिक व्यवस्थित माहिती कदाचित अभय नातू देऊ शकतील.
- शुद्धलेखनाचे नियम#नियम १४ "कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे" असे सांगतो
- परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे "विदेशी भाषांतील जे शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत ते तसेच ठेवावेत.जसे-मशीन,इंजिन,मीटर,लिटर,लाव्हा वगैरे." असे सांगते.
मराठी, हिन्दी, इंग्रजी या भाषेतील सोडून बाकी भाषातील नावे आणि शब्द वृत्तमाध्यमांमूळे बर्याचदा आधी इंग्रजीत जातात आणि नंतर इंग्रजीतून मराठीत येई पर्यंत बरीच गफलत होते.तसेच हिन्दी वृत्तमाध्यमांनी केलेल्या अपभ्रंशांचा सुद्धा मोठा हात भार असतो.
अदेवनागरी लिपी भाषातील शब्दांचे लेखन करताना प्राधान्याने खालील प्रश्न येऊ शकतात
- जसे तामीळ मध्ये उच्चार आहेत पण त्यांना अक्षरे नाहीत खास करून सॉफ्ट वर्ण लिहिले जात नाहीत. महणताना खीर म्हणतील पण लिहिताना ख नसल्यामुळे कीर लिहितील. त्यामुळे तामीळ मध्ये कीर लिहिलेले दिसले ते तसेच मराठीत 'कीर' आणले तर ते चूक होणार. कारण कोणी तामीळ माणसाकडे जाऊन 'कीर' म्हणल्यास त्यालाही ते कळणार नाही. भाषांच्या या समस्येला तोडगा आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती ने देण्याचा प्रयत्न केला आहे.(खर सांगायच तर ती चांगली पद्धती असावी पण मला मराठीतून वाचण्यास न मिळाल्यामुळे उमगत नसावी,) बर्याच इंग्रजी विकिपीडियावरील लेखात परभाषिय शब्दाचे आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती नुसार लेखन उपलब्ध केलेले असते.
- केवळ इंग्रजी विकिपीडियात इंग्रजीत दिसलेले इतरभाषिय नाव/शब्द मराठी विकिपीडियात इंग्रजीनुरूप बदलले गेले असल्यास,आणि तुम्हाला त्या भाषेतील खरा उच्चार व्यवस्थित माहित असल्यास 'येथे काय जोडले आहे' ते पाहून त्या सर्व ठीकाणी बदलून लेख नवीन सुयोग्य नावात हलवून, चुकीचे लेखन वगळण्यास हरकरत नसावी, परंतु जेथे एखाद्या व्यक्तिचे नाव (क्रिडापटू/राजकारणी असे आणि इत्यादी) नाव/शब्द मराठी भाषेत चुकीच्या उच्चारणाने प्रचलीत असेल तर ते शीर्षक नाव न वगळता त्याभाषेतील सुयोग्य उच्चारण नावाकडे स्थानांतरीत करावे.
अर्थात मी हे अधीकतर नियमावर बोट ठेवून लिहिले,आधी म्हणल्या प्रमाणे मराठी विकिपीडियातील सवीस्तर चर्चात मी सहभागी झालेलो नाही. माहीतगार ११:२१, २५ ऑगस्ट २००९ (UTC) पुढे लिहित आहे.
धन्यवाद
संपादनमला प्रोत्साहीत केल्याबद्दल आपले व सर्वांचे मनःपुर्वक आभार. मी प्रगतीसाठी प्रयत्नरत आहेच.
ही छोटीशी भेट
WikiProject_वनस्पती झाडे जगतील तर आपण जगु
वर्ग
संपादन- हा < डावा आणि उजवा बाण > मिळून एक टॅग तयार होतो टॅग मधील माहितीला पॅरामीटर म्हणतात. प्रत्येक टॅग < डावा आणि उजवा बाण > तो पुढील ज्या परिच्छेदास लागू होणार तो परिच्छेद संपल्या नंतर / या रेषेसहीत < /डावा आणि उजवा बाण > अशा पद्धतीने टॅग बंद केला जातो. तो बंद करावयाचे राहील्यास खालीलभागात त्याचा परीणाम सुरूच राहातो. तुमचा <gallery> परिच्छेद संपल्यानंतर </gallery> एवजी <gallery> असा होता / या रेषेच्या अभावाने <gallery> टॅग [[वर्ग]] लपवण्याची करामात करत होता.
अशाच त्रूटी बर्याचदा <div>टॅग </div> ने बंद करावयचे राहील्यामुळे तसेच {| टॅग |} ने बंद करावयचे राहील्यामुळे होतात.
माहीतगार ०७:३१, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
बेरिलियम
संपादनबेरिलियम "इतर भाषेतील नावे"- तुमचा संदर्भ आंतरविकि दुव्यांना होता काय्?- नावे मलाही आढळली नाहीत ?
विकिपीडिया:मॅन्यूअल ऑफ स्टाईल (माहीतीचौकटसाचे) तुम्हाला माहीतीचौकटसाचे कितपत बनवता येतात ?
माहीतगार ०७:४२, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
हे भाषांतर सोबत करूयात ?
संपादनसर्वांना माहिती चौकटीत काय होते आहे हे समजणे कदाचित साचा:Infobox/doc आणि साचा:माहितीचौकट/doc पानाच्या भाषांतरामुळे सोपे जाईल.माहीतगार १२:५७, २८ ऑगस्ट २००९ (UTC)
अल वाडी अल जदिद प्रदेश
संपादनया लेखात कुणीतरी अरेबीक/फार्सी/उर्दू पैकी एकात मध्ये काही माहिती लिहिली आहे. google translate मधून ट्रान्सलेट केले असता relevant वाटले नाही .अल वाडी अल जदिद प्रदेश लेख एकदा तुमच्या नजरे खालून जाऊ द्यावी आणि वगळून टाकावी.माहीतगार ०६:००, २९ ऑगस्ट २००९ (UTC)
विकिपीडिया:भाषांतर प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनवर्ग नावांचे स्थानांतरण होत नाही
संपादनमाझ्या माहितीनुसार वर्ग नावांचे लेखां प्रमाणे स्थानांतरण होत नाही . बरोबर नावाचा नवीन वर्गाने, लेखांचे वर्गीकरण करून घ्यावे लागते असे वाटते. एखाद दुसर्या लेखाचे वर्गीकरण बदलावयाचे असेलतर ते मॅन्यूअली बरोबर करून जुना वर्गला पानकाढा साचा लावा. काम मोठे असेल तर बॉट्स सुविधेने लवकर होते. तुम्ही स्वत:च्या संगणकावर काम करत असल्यास बॉट सुविधा वापरावी. अथवा आपल्या कडे अभय नातूंना बॉट वापरता येतो त्यांना विनंती केल्यास ते बॉटचे सहाय्य पुरवू शकतील.
माहीतगार १५:१७, १० सप्टेंबर २००९ (UTC)
संजय राष्ट्रीय उद्यान
संपादनते एकत्रित लिहून राज्याच्या नावासमोर दोन्ही राज्यांची नावे एका खाली एक लिहावी का
Good idea.
अभय नातू २१:४१, १० सप्टेंबर २००९ (UTC)
स्थानांतरण
संपादनस्थानांतरण हा सोयीचा शब्द आहे.स्थानांतरणातही मूलतः पुर्ननिर्देशनच (Redirect) होते .अलेक्सांद्र सोल्झेनित्झिन हा लेख रिकामाच आहे आणि त्यात #REDIRECT [अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन]] असे किंवा #पुर्ननिर्देशन [अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन]] असे केलेतरी काम भागते केवळ चर्चा पानाचे #पुर्ननिर्देशन [चर्चा:अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन]] सुद्धा असे वेगळे करावे लागेल.
वरची आपण दिलेली केस सोपी आहे ह्या पेक्षा अधीक ट्रिकी केसेस असु शकतात अशा पवादात्मक स्थिती करिता त्याकरिता प्रशासकांना काही विशेष अधिकार दिलेले असतात.संबधीत जबाबदार्या समजुन घेऊन आपणही प्रचालक पदाकरिता अर्ज करू शकता.
तुम्ही दिलेले दुसरा विषय अभ्यासतो.माहीतगार १२:१६, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
- List of U.S. state birds करिता मला मराठी विकिपीडियात कोणता लेख आहे त्याचे नाव कल्प्ना नाही आपल्या योगदानाच्या पहिल्या पानावर तरी आढळले नाही.मला वाटते आधी मराठी शिर्षक देऊन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर ते पान कॉपी पेस्ट करून घ्या बहुधा काही प्रॉब्लेम या केस मध्ये तरी येणारनाही असे मला वाटते.
- टेबलस आणि साचांचे रंग त्या साचात/टेबल मध्येच बदलता येतात किंवा त्या नावाच्या टेबल्स/साचांचे रंग common.css मधून सुद्धा नियंत्रीत करता येतात या करिता इंगरजी विकिपीडियातील टेवबलच्य नावाकरीता त्यांच्या common.css काय रंग नमुद केल आहेत आणि मराठी विकिपीडियात नमुद आहेत वेगळे नमुद आहेत का नाहीतच हे तपासावे लागू शकते common.css च्या चर्चा पानावर अशा गरजा नमुदकरून प्रचालकांना विनंती करावी लागते.कॉमन css चा दुवा निर्वाह पानावर मिळेल
माहीतगार १२:३०, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
मुद्रण शुद्धी
संपादन- स्ट्रॅटेजी प्रस्ताव सहप्रकल्पास २१ सप्टे.च्या आधी १, २, ३, ४ येथे मराठी मुद्रण शुद्धी' (Proofreading) प्राधान्याने 'करून हवे . आहे यात आपले सहाय्य मिळाल्यास आभारी राहीन
माहीतगार १३:५१, १९ सप्टेंबर २००९ (UTC)
धन्यवाद
संपादनThanks!!! Everyone's Invited and always invited!! :)
मदत हवी
संपादननमस्कार, मी नवीन लेख संपादन करीत आहे. त्या लेखाची झलक दिसत नाहिये. झलक पहा वर क्लिक केले असता नुसते कोरे पान, जसे नवा लेख लिहितांना दिसते तसेच कोरे पान, दिसत आहे. लेखातील माहिती मी अन्यत्र कॉपी करून ठेवली आहे. या पानाची झलक आधी पाहूनच मग मी हे पान जतन करीत आहे, या पानावर प्रॉब्लेम नाही. Gypsypkd ०६:३१, २ ऑक्टोबर २००९ (UTC)
- झलक दिसत नाही असे सहसा होत नाही. काही वेळा काही टॅग पूर्ण क्लोज होण्याचे राहील्यास असे होत असावे पण त्यातही जतन केलेले संपादन दिसले पण झलक नाही दिसली असे होत नसावे.
- तुम्ही मागची जी दोन नवी पाने सोनपाठी सुतार कबरा गप्पीदास यांची झलक तपासली मला तरी दिसत होती. ज्या मजकूराने झलक दिसत नाही असा मजकूर एखाद्या रिकाम्या धूळपाटी वर टाकून जतन केल्यास तपासता येईल.
- या पूढील सूचनामुळेच झाले असावे असे नाही पण जरा लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने ---- वापरण्याचा विशेषत: शिफ्ट कळ दाबून येणार्या पायथ्या शी येणार्या _ _ विशेष आवश्यकता असल्या शिवाय वापरण्याचे टाळा. <> ने सुरू झालेले टॅग </> ने व्यवस्थित क्लोज झालेत का ते तपासावे.विशेषत: div nowiki none कोणतेचनाही, नन्ना __विनामजकुरबदल__, __विनामब____NOCONTENTCONVERT__, __NOCC__ यांचा वापर झालाय का याकडे लक्ष द्यावे. महिरपी साचा कंसात साचा नावाचा साचा पूर्ण नसेल अथवा त्याची चौकटीची माहिती common.css मधे नसेल किंवा common.css मॅच होत नसेल
gallery
संपादन- दालन हा शब्द मराठी विकिपीडियात एक वेगळे नामविश्व पानांचे प्रतिनिधित्व करतो. जसे दालन:सूर्यमाला, दालन:मराठवाडा दालन:वनस्पती इत्यादी दालने सध्या मराठी विकिपीडियात आहेत.
- gallery शब्दा करिता दिर्घा किंवा चित्रदालन किंवा तत्सम शब्द योजता आला तर पहावे नवीन येणार्या सदस्यांचे भविष्यातील गोंधळ टळू शकतील.
- धन्यवाद Mahitgar ०९:००, ३ ऑक्टोबर २००९ (UTC)
साचा:जीवचौकट/वापर
संपादन- साचा बनवण्यापूर्वी साध्या टेबल फॉर्मॅट मध्ये आपल्याला हवी ती माहिती भरावी .खालील प्रमाणे माहिती भरावी म्हणजे आपल्याला साचाता काय काय माहिती लागते हे आधी स्पष्ट होईल.
{| class="wikitable" |- |चित्रदालन || <gallery> File:Black Redstart I2 IMG 0862.jpg|कृष्ण थिरथिरा नर File:Black Redstart I2w IMG 0864.jpg|कृष्ण थिरथिरा नर </gallery> |- |इंग्रजी नाव || Black Redstart |- |शास्त्रीय नाव|| Phoenicurus ochruros rufiventris |}
चित्रदालन |
|
इंग्रजी नाव | Black Redstart |
शास्त्रीय नाव | Phoenicurus ochruros rufiventris |
नव्या पक्षीचौकट ची अजून सोपी पर्यायी व्यवस्था
संपादनखालील प्रमाणे केवळ मराठी नाव ,शास्त्रीय नाव, कुळ हि तीनच जैविक वर्गीकरणे (तीन पॅरामीटर) असलेली अत्यंत सोपी पक्षीचौकट तुमच्या करिता बनवली खालील प्रमाणे ती चौकट आहे. जास्तीची जैविक वर्गीकरण पॅरामीटर जोडण्याकरिता नेमके कुठे जायचे ते तुम्हाला पानावरूनच दिसते.आणि ते तुमच्याकरिता अजून खूप सोपे केले आहे.
सोप्या याच्यातच आधी हवीती वर्गीकरण नावे स्वतःच जोडून घ्या म्हणजे माझ्या सारख्या वनस्पती शास्त्र माहित नसलेल्या व्यक्तिचे कन्फ्यूजन टळेल. तसेच पक्षीचौकट वापरून किमान दहा एक पक्षीचे तरी लेख बनवून घ्यावेत. त्यानंतर चौकट दिसण्यात कशी चांगली करून घ्या व अध्हीक सुविधा टाका.
{{पक्षीचौकट|
चित्र =
|मराठी नाव =
|शास्त्रीय नाव =
|कुळ =
}}
{{पक्षीचौकट|
चित्र =[[Image:Jasminum.JPG|thumb|जाईची फुले]]
|मराठी नाव =गरूड
|शास्त्रीय नाव =काय आहे ?.
|कुळ =काय आहे ?
}}
ती खालील प्रमाणे दिसत आहे.
[[चित्र: | |
शास्त्रीय नाव | काय आहे ? |
---|---|
कुळ | काय आहे ? |
अन्य भाषांतील नावे |
वर्ग:माहितीचौकट साचे येथे इतरांनी बनवलेले सोपे माहिती चौकट साचे पहावयास मिळतील त्या नुसार एखादा साचा क्~ओपी करून नवा सचा बनवावा. अधीक माहिती करिता साचा:माहितीचौकट येथील माहिती नुसार नवा साचा बनवण्यास हरकत नाही.
त्या शिवाय संपुर्ण जीवसृष्टी बद्दल उपयोगी असा साचा:जीवचौकट/वापर पहावे.साचा:जीवचौकट काहिसा वेळखाऊ आहे. क्लिष्ट आहे. त्यामुळे वनस्पती विषयक लेख सुद्धा आडले आहेत. साचा:जीवचौकट/वापर सहज जमला तर पहा नाही तर सोडून द्या व नवा तुम्हाला सोपी अशी माहिती चौकट बनवून घ्या.Mahitgar ०७:२३, ४ ऑक्टोबर २००९ (UTC)
आणखी एक, पक्षी विषयासाठी कोणता साचा वापरावा ? त्यात भारतीय अनेक भाषांची नावे लिहिता आली पाहिजे पण साचा सुटसुटीतही असावा असे वाटते. ह्या विषयी तुम्हाला काही करता येईल का ? Gypsypkd ०९:१२, ३ ऑक्टोबर २००९ (UTC)
वर्ग: Helpdesk
कृपया e-mail बघावा, ही विनंती.
नरसीकर.
धन्यवाद
संपादनआपल्या शुभेच्छांकरिता धन्यवाद ! अजून खरेतर बरेच काही करावयाचे बाकी आहे. तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा ! माहितगार ०६:३५, १६ ऑक्टोबर २००९ (UTC)
पक्षीचौकट साचा
संपादनपक्षीचौकट साचा मी रूंदीला थोडा कॉम्पॅक्ट करून दिला आहे हे तुमच्या चर्चा पानावर आधी लावलेल्या साचात आडळेल. खालील गोष्टी तुम्हाला तुमच्या सवडीने करता येतील. आजीबात घाई किंवा आवश्यकता नाही.केवळ प्रगत साचे तुमचे तुम्हाला बनवणे सोपे जाणे आणि मी उपलब्ध केलेल्या सहाय्य कितपत उपयूक्त ठरत आहे का याचा अंदाजा यावा हा माझा हेतु आहे.. हवेतर आधी धूळपाटीवर करून पहावे.
- वर एक चित्र कंपलसरी ठेवून बाकी गॅलरी दाखवा लपवा साचात दाखवा म्हणल्यानंतरच दिसेल अशी लपवता येईल. (मी विवीध प्रकल्पांच्या सुचालन साचात असे दाखवा-लपवा पहाण्यास मिळेल)
- चमच्या (पक्षी) आणि काळ्या शेंडीचा बुलबुल येथे जसे कुळ हे लिहिले नाहीतरी ती ओळ दिसते आहे.ती लिहिली नाही तर तेवढीच ओळ दिसणार नाही अशी व्यवस्था करता येते. या करिता स्वीच किंवा असेलतर सांगा नावाचे पृथकक वापरले जाते.
माहितगार ०७:५०, १६ ऑक्टोबर २००९ (UTC)
- {{PAGENAME}} ऐवजी {{लेखनाव}} असे मराठीत वापरण्याबद्द्ल विचार करावा.माहितगार ०६:००, २४ ऑक्टोबर २००९ (UTC)
अप्रतीम
संपादनतुमचे पक्षीविषयक तसेच प्राणीविषयक लेख अप्रतीमच हं ! त्यासाठी एखादा वेगळाच बार्नस्टार तयार करावा लागणार. माझे ज्ञान तेथे कमी पडते. मला नाही वाटत इंग्रजीशिवाय इतर कोणत्या विकिपीडियावर यापेक्षा उत्तम लेख असतील ते. बढे चलो.
V.narsikar