जुन्या चर्चा पासून पर्यंत
चर्चा १ जानेवारी ३, २००९ ऑक्टोबर ३१, २००९
चर्चा २ नोव्हेंबर १, २००९ मार्च १८, २०१०
चर्चा ३ मार्च १८, २०१० मे १४, २०१०
चर्चा ४ मे १४, २०१० ऑगस्ट ९, २०१०

विकिपीडिया:धूळपाटी२२‎ यात संबंधित लेखांची लिंक दिली तर बरे असे माझे मत आहे. पण त्याने आपण दिलेले रंग बदलतात.बघा. आपणास जसे योग्य वाटेल तसे करा.यात एका राशीचे नउ चरण येतात.त्यामुळे सुरुवात राशीपासुन करावयास हवी असे माझे मत आहे.शेवटी निर्णय आपण करा. वि. नरसीकर (चर्चा) ०७:३२, १८ मे २०१० (UTC)

जोडाक्षरे

संपादन

अचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१८, २३ मे २०१० (UTC)


मी तज्ज्ञ नाही, पण जोडाक्षरे हलन्त दिसू लागणे हा ब्राउझरचाच दोष. रिफ्रेश केले की बहुधा नीट दिसतात J ०७:००, २३ मे २०१० (UTC).

कोल्हा, खोकड, इ

संपादन

नमस्कार,

होय, गेले काही दिवस/महिने मी व्यक्तिगत कामांत अतिशय व्यग्र आहे. तरीही अधूनमधून वेळ 'चोरुन' येथे येत असतो.

खरे म्हणजे मलाही या कोल्हा, खोकड या शब्दांबाबत शंका होती/आहे व मी पूर्वी क्षितिजशी (मला वाटते) याबद्दल चर्चा केलेलेही आठवते... माझ्या माहितीप्रमाणे कोल्हा म्हणजे Fox आणि लांडगा म्हणजे Jackal असे असावे. तथापि त्यावेळी क्षितिजने काही संदर्भ देउन लिहिलेली माहिती बरोबर असल्याचे आठवते. तरी तुमचे संदर्भ चाळून पुढील काही दिवसांत शहानिशा करतो. तोपर्यंत चावडीवर हा प्रश्न मांडला असता जाणकार मंडळी याबद्दल अधिक माहिती देतील सुद्धा!

अभय नातू ०६:२०, १ जून २०१० (UTC)

काही नाही. फक्त नमस्कार.बरेच दिवसांनी भेटत आहोत. वि. नरसीकर (चर्चा) ०९:१३, ३ जून २०१० (UTC) होय. डोक्यात बरेच लेख लिहायचा विचार आहे. थोडा मोकळा झाल्यावर ते काम करतो. वि. नरसीकर (चर्चा) ०९:५३, ३ जून २०१० (UTC)


धन्यवाद.आपण अकोला विमानतळावरील लेखात भर घातली व मला माझे मागे राहुन गेलेले काम आठवले. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४४, ५ जून २०१० (UTC)

अगदी बरोबर! वि. नरसीकर (चर्चा) ०८:५५, ५ जून २०१० (UTC)

अति सुंदर! एक नंबर काम होत आहे.सहकार्याबद्दल व लेख पूर्णत्वाकडे नेण्याबद्दल खरोखर धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) १०:४७, ५ जून २०१० (UTC)

बरहा पॅड

संपादन

नाही. तेथे भाषा बदलण्याची सोय नाही. 'बरहा' पॅड वर मराठी टाईप करुन मग तेथे कॉपी पेस्ट करावे लागते. हवे असेल तर बरहा पॅड कसे डाउनलोड करावे त्याची मेल पाठवितो. वि. नरसीकर (चर्चा) ०७:३०, ८ जून २०१० (UTC)

मी विकिबूक्स आणि विकिक्वोटचे तात्पूरते प्रचालक(sysop) ८ दिवसापर्यंत घेतले होते. पण तेव्हा मराठी विकिपीडियावरसुद्धा मराठी लेखनाची सुविधा उपलब्ध करावी अथवा नको या बद्दल एकमत नव्हते तसेच त्या प्रकल्पांना कायमस्वरूपी लक्ष देणारे प्रचालक नव्हते त्यामुळे टाळले होते.माहितगार ०८:१५, ८ जून २०१० (UTC)
होय मराठी विकिपीडियाची धूळपाटी वापरण्यास काहीच हरकत नाही. ( अंतर्गत दुवे,कुठे देण्याची जरूर भासल्यास विकिक्वोटवर द्याल त्या प्रमाणे लिहिलेतर तुम्हाला सोपे पडेल) त्या पलिकडे जाऊन मराठी विकिपीडियावर तुम्हाला पुरेसा अनुभव आहेच तर विकिक्वोटचे प्रचालकपदही सांभाळण्याचा विचार करा.माहितगार ११:०२, ८ जून २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन

आज विकिवर माझे एक वर्ष पूर्ण झाले.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहे. आज/उद्या तो पूर्ण होईल. दररोज सुमारे १९.०१९ संपादनांच्या सरासरीने या ३६५ दिवसात संपादने पूर्ण केली आहेत.आपले,माहितगार, अभय व संकल्प यांचे वारंवार मार्गदर्शन लाभले त्यानेच हे शक्य झाले. साचा प्रकारात पारंगतता नव्हती. ते काम नुकतेच सुरु केले आहे. जमेल काही दिवसांनी. वेळोवेळी केलेल्या सहाय्याबद्दल व माझ्याप्रती दाखविलेल्या सदिच्छेबदल आपणा सर्व विकिकरांना मनःपूर्वक धन्यवाद.आपला लोभ आहेच. कायम ठेवावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:३३, ९ जून २०१० (UTC)


Wikiquote:कौल हे पान (अजुन मला वाटते) तयार झाले नाही. तेथे गेल्यावर कोरे पान उघडते.कृपया त्वरीत तपासा.नाहीतर माहितगार यांची मदत घ्या.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४५, २४ जून २०१० (UTC)

विकिक्वोट

संपादन

नमस्कार,

व्यक्तींचे जन्म/मृत्यूवर्षांनुसार वर्गीकरण अगदी सोपे आहे. त्यातील पहिला भाग तुम्ही केलेला दिसतो - उदा. अल्बर्ट आइन्स्टाइन - इ.स. १८९७ मधील जन्म --> इ.स. १८९७ असे वर्गीकरण होइल. त्या अधिक वर्गीकरण हवे असल्यास इ.स. १८९७ मधील जन्मलेले शास्त्रज्ञ --> इ.स. १८९७ मधील जन्म --> इ.स. १८९७ असे करता येईल, किंवा इ.स. १८९७ मधील जन्मलेले भौतिकशास्त्रज्ञ --> इ.स. १८९७ मधील जन्मलेले शास्त्रज्ञ --> इ.स. १८९७ मधील जन्म --> इ.स. १८९७ असेही.

चित्रांबद्दल - मी कॉमन्सशिवाय इतर प्रकल्पांतील चित्रे जोडलेली पाहिली नाहीत. w: किंवा wb: असे जोड दिले असता तेथे त्या त्या प्रकल्पांतील दुवे दिसतील पण चित्रे दिसणार नाहीत.

अभय नातू २०:५५, २९ जून २०१० (UTC)

सूचनेबद्दल धन्यवाद.

संपादन

वर्ग:विजय तेंडुलकरांचे साहित्य ह्या वर्गात त्या लेखांचे वर्गीकरण करावयाचे राहिले होते,लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.चे.प्रसन्नकुमार ०९:३७, ६ जुलै २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन
मला एंजल हार्ट बार्नस्टार दिल्याबद्दल धन्यवाद.मोठ्या आनंदाने स्विकारत आहे, पण मला एंजल लोंकांच्या पंक्तीत बसवल्यामुळे खर्‍याखुर्‍या एंजलमंडळीवर अन्याय करत आहात एवढे मात्र खरे.
सहाय्याबद्दल म्हणाल तर मी समाधानी आहे, देणार्‍याने देत जावे काव्यपंक्तीतम्हटल्या प्रमाणे आपण नरसिकरजी आणि इतरहीमंडळींनी आमचे हात घेतले आहेत असे निश्चितच म्हण्ता येईल.
मला वाटते निखळ ज्ञान हा विश्वकोशाचा निकष एकदा का स्विकारला की "लहान तोंडी.." असे काही रहात नाही.

माहितगार १३:४६, ७ जुलै २०१० (UTC)

autographs प्रताधिकार

संपादन
  • प्रश्न चांगला विचारलात
या बाबतीत प्रताधिकाराचे प्रश्न तर आहेतच शिवाय इंडियन एव्हीडन्स ऍक्टचाही संबध येत असावा असे वाटते.
प्रथमतः तुम्ही जिथे रहाता आणि जेथील नागरीक आहात तेथील कायद्यांच्या परिपेक्षात तुम्ही विचारकेलेला चांगला या दृष्टीने आपण भारतीय आणि महाराष्ट्रीय कायदे आणि न्याय संस्थेने दिलेल्या निर्णयांच्या परिपेक्षात याचा विचार करणे अधीक रास्त होईल.
एखाद्या गोष्टी बाबत न्यायसंस्थेचा (उच्चन्यायालय/सर्वोच्च न्यायालय) एखादातरी निर्णय येऊन जात नाही तो पर्यंत काही applications (असंख्य विषयातील) ची legality धूसर(ग्रे) अस्पष्ट राहाते. आणि अनिश्चित स्थितीत विनाकारण हात घालणे मी आपल्याला सुचवू शकत नाही.
आपण विचारलेली autographs प्रताधिकार हा विषय कायदेशिर दृष्ट्या मला क्लिष्ट complex वाटतो.किमान इतर भारतीय कायद्यांचे व्यवस्थीत पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशी चर्चा होणे गरजेचे वाटते.अशी चर्चा करण्याकरिताही काही किमान पार्श्वभूमी माहित असणे सोईचे पडते त्या दृष्टीने कॉमन्स वरील या विषयातील चर्चा (सवडीनुसार) वाचून घेतल्यात तर बरे पडेल.
तेथील एका चर्चेतील पुढील दृष्टीकोण मला माझ्या पातळीवर सयूक्तीक वाटला "Firstly, as you appear to have realised, copyright resides with the creator of a work. I don't get the right to distribute copies of a film simply because I buy a DVD of it. This also applies to individual copies that were gifts. You can sell, give away, or destroy your copy of it, but the right to control copying (hence copyright) resides with the creator.
ज्या autographs पब्लीक डॉमेन (प्रसार माध्यमातून/ जाहीरातीतून) प्रकाशित झाल्या आहेत त्या वापरल्या जाऊ शकतात असा एक दृष्टीकोण मांडलेला दिसतो.सोबतच तुम्हाला स्वतःला आलेल्या पत्रांचाही विचारकरा त्यावरील मालकी हक्क तुमचा स्वतःचा असतो त्याच्या पुनःप्रकाशनाचा आधिकार तुम्हाला असतो तर autographs बूक मधील सहीवरचा का नाही असाही दृष्टीकोण पुढे ठेवता येऊ शकतो.
इथे अशातील न. मोदी आणि नितीशकुमारांचा रंगलेला फोटोग्राफच्या जाहीरातीतील उपयोगाचा रंगलेला वाद आठवत असेल ज्यात छायाचित्रात मोदी आणि नितीश दोघेही आहेत.समजा दोघेही एका सार्वजनिक व्यासपिठावर होते आणि तिसर्‍या व्यक्तीने छायाचित्र काढले तर छायाचित्राचे पुर्नौपयोगाचा आधिकार कुणाकुणाला पोहोचतो? असे वाद न्यायालया बाहेर न मिटता खरोखर न्यायालयातून निर्णीत होत नाहीत तो पर्यंत काहीच स्पष्ट नसते.
मला वाटते जी autographs निव्वळ initials (not used/authorised for any property/financial/banking use) आहेत,तुमच्या ऍटोग्राफबूक मध्ये आहेत सोबतच पब्लीक डॉमेन मध्ये आहेत या तिन्ही कंडीशनपुर्‍या करत असतील तर त्या वापरण्याबाबत थोडेफार स्वातंत्र्य कदाचित घेता येईल.
शिवाय ज्या व्यक्तीचा मृत्यूहोऊन ६० वर्षे झालीत अशा व्यक्तींचे प्रताधिकार आपोआपच संपूष्टात येतात.पण एव्हीडन्स ऍक्ट मधील जबाबदार्‍या संपूष्टात येत असतील असे नाही.
आपण Stephen Hawking चा उल्लेख केलात त्या चित्रचढवणार्‍या व्यक्तिने मी सही पुन्हा पूर्णतः स्वतःच्या हाताने काढली मूळाबरहुकूम नाही म्हणून प्रताधिकार माझा आहे आणि म्हणून मी मुक्त करतो असे म्हटले आहे.परंतु तरीही एव्हीडन्स ऍक्ट सारखे इतर कायद्यांच्या कचाट्यातून इतके सहज सुटता येईल का नक्की माहित नाही.
एवढ लांब उत्तर देऊन काय सांगितल तर माहित नाही :)
माहितगार ०६:२४, ८ जुलै २०१० (UTC)
ता.क. autograph ज्यांची आहे त्यांच्याकडून तशी लेखी परवानगी घेणे हा सुद्धा एक चांगला मार्ग आहे. माहितगार ०६:४०, ८ जुलै २०१० (UTC)

विकिक्वोट वर मराठी भाषा वापरण्यासाठीची सोय आपणच करू शकतो का?

संपादन
हो यापूर्वी तुमच्या विकिक्वोट चर्चा पानावर नमुद केल्याप्रमाणे तेथील प्रचालक या नात्याने ते तुम्ही स्वतः करू शकता.
काही शंका असल्यास, माझ्या शिवाय सदस्य:कोल्हापुरी कडून अधीक चांगले मार्गदर्शन प्राप्त होऊ शकेल.माहितगार ०६:३४, ८ जुलै २०१० (UTC)

दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा

संपादन
मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)

नमस्कार

संपादन

नमस्कार, मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०४:४६, १२ जुलै २०१० (UTC)

माझे त्याबद्दल काहीच म्हणणे नव्हते. वॉशिंग्टन याच्या स्पेलिंगबद्दल होते. ते आजच अभयनी दुरुस्त केले आहे. जमेल तसा येथे येत जाईल. जबाबदार्‍या वाढल्या आहेत.आपले म्हणण्याचा पूर्ण आदर ठेउन क्यु: वर पण भेट देईल.धन्यवाद.तुमचेसाठी व सर्वांसाठी २ पार्ट्या देउ लागतो.बघु कसे जमते ते.एखाद्या विकिमीट मध्ये?

नरसीकर

मराठी कळफलकाविषयी

संपादन

नमस्कार Gypsypkd,
प्रथम तुमचे प्रचालकपदासाठी अभिनंदन! मराठी टमकलेखन करण्यासाठी तुम्हाला खालील पाने विकिकोट्सवर नेली पाहिजेत.

  1. मिडियाविकी:Translit.js
  2. मिडियाविकी:monobook.js
  3. विकिपीडिया:Input System‌

- कोल्हापुरी ०४:१७, १३ जुलै २०१० (UTC)

तुम्हाला या पानांवरील मजकूर खालील दुव्यांवरून मिळेल तो जसाच्या तसा विकिकोट्सवर त्याच नावाच्या पानांवर टाका
  1. मिडियाविकी:Translit.js -> [१]
  2. मिडियाविकी:monobook.js -> [२]
  3. विकिपीडिया:Input System‌ -> याच्या संपादन पानावर जाऊन तेथून स्रोत घ्या.
- कोल्हापुरी ११:०७, १३ जुलै २०१० (UTC)
मला वाटते मिडियाविकी:monobook.js नव्याने तयार करून त्यात वरच्या दूव्यावरील मजकूर टाकावा लागेल. - ०३:३२, १४ जुलै २०१० (UTC)
विकिक्वोटवर मी मराठीत टाईप करू शकत आहे, मी फायरफॉक्स वापरतो. तुम्ही ब्राऊजर कोणता वापरता ? तुम्ही तुमच्या न्याहाळकाच्या (ब्राऊजर)च्या कुकीज वगळून तुमचा ब्राऊजर बंद करा.तुमच्या संगणकावर कंट्रोल +F5 चार एक वेळा प्रेस करून संगण्कास रिफ्रेश करा आणि पुन्हा तुमचा ब्राऊजर चालू करा.
या सुचना लक्षात न आल्यास तुमचा ब्राऊज इंटरनेट एक्सप्लोरर आहे का अजून कोणता ते आधी कळवा म्हणजे पुढील मार्गदर्शन करणे सोपे जाईल.माहितगार ०५:४३, १७ जुलै २०१० (UTC)
आणि तुम्ही विकिक्वोटचे टंकण सुविधा नेहमी वापरणार असल्यास भविष्यात फायरफॉक्स ब्राऊजर वापरणे अधीक सोईचे राहील कारण इंग्रजी आणि मराठी भाषा बदल फायरफॉक्समध्ये अधीक सुलभपणे होतो.

अप्रतिम

संपादन

सादर नमस्कार,आपण माहितगार यांचे पानावर टाकलेला संदेश बघितला.टिटवीचा आवाज अप्रतिमच आहे. मलाही मागे कावळ्याचा आवाज टेप करुन टाकतांना अश्याच अडचणी आल्या होत्या. ३ दिवसांनी ते काम अखेर जमले. संगणकात ट्रायल सॉफ्टवेअर टाकुन तो मग केला.आपल्या भ्रमंतीमुळे आपण अनेक पक्ष्यांचे आवाज टेप करुन टाकु शकाल. नुसते तोंडदेखले कौतुक नव्हे. तो आवाज खरोखरीच सुंदर व अप्रतिम टेप व रेकॉर्ड झाला आहे. त्यास तोड नाही.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४८, ३१ जुलै २०१० (UTC)

आवाज क्षेत्रातील त्यातही .ogg संचिकांबद्दलचे माझेही ज्ञान मर्यादीत पेक्षा नगण्यच आहे. इतरही बहुसंख्य मराठी विकिपीडियन्सची स्थिती अशीच असावी असे वाटते (हि स्थिती तुम्ही आणि नरसिकरांनी मिळून बदलल्या बद्दल अभिनंदन). कॉमन्सवरील आवाज संचिकांखाली त्या कोणत्या भाषी विकिपीडीयाच्या कोणत्या पानावर जोणडल्या आहेत त्याचे दुवे मिळतात. प्रेसेंटेशनच्या बाबतीत त्यांची नक्कल करता येईल.
मी सध्याच्या संगणकावर स्पीकर सुविधा नसल्यामुळे लगेच प्रतिक्रीया देऊ शकत नाही.पण चांगलेच झाले असणार असा विश्वास आहे.एवढेच नाही तर यापुढेही माझा सल्ला सदर आवाज संचिका कॉमन्सवर चढवून तीचे मुखपृष्ठावर नोंद करण्या करिता विनंती टाकण्याच्या दृष्टीने सरळ पाऊल उचलावे. संचिका या पहिल्याच प्रयत्नात निवडली जाईल असे नाही, पण त्याप्रयत्नातून जी माहिती मिळेल ती सुद्धा मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अमुल्यच असेल.
विकिपीडियावर खरेतर प्रांतिकता असा कोणताही मुद्दा नाही. आकलनात्मक सुबोध प्रमाण मराठी हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय निश्चित आहे, मराठीत मराठी शब्द रूळवण्याच्या प्रयत्नात मीही सहभागी आहे पण हे करताना शुद्धीकरण हा उद्देश ठेवण्यापेक्षा आकलनात्मक सुबोधता हा उद्देश ठेवावयास हवा. हे विषय अगदी सावरकरांच्या वेळेपासून दोन्ही परस्पर विरूद्ध बाजूंनी अटी तटीने लावून धरले. बर्‍याच शुद्धलेखन येणार्‍या मंडळीना आपल्याला भाषाशास्त्राचे आकलन आहे हा गोड गैरसमज असतो,असे गैरसमज माझ्या सारख्या पेक्षा शुद्धलेखन येऊन भाषाशास्त्र माहित असलेल्या व्यक्तीकडून दूर केले जाऊ शकतील ,पण गमतीची गोष्ट अशीकी भाषाशास्त्राचा एकुणच अभ्यास मराठीभाषेच्या तज्ञांनीही मर्यादीतच केला आहे हे केवळ तज्ञच जाणतात हि गोष्ट ते मान्य ही करतात, या करिता खारी लढाई भाषाशास्त्र विषयक लेखांचे आणि मराठी व्याकरणाचे अधिक

लेखन मराठी विकिपीडियात आणूनच करता येईल.

सावरकरांच्या काळात नसलेला अ़जून काही महत्वाचे मुद्दे आजच्या काळात दिसतात, एक तर इंग्रजीभाषेच्या सर्व साधारण वापरात आणि शिक्षणात वाढलेले मोठे प्रमाण , इंग्रजी भाषेतून शिकलेली मराठी मुलांचा इंग्रजी शब्द वापरात ठेवणेचा कलही नैसर्गिकच म्हणला पाहिजे.दुसरे तर दृकश्राव्य माध्यमांचा प्रभावही वाढला आहे.आणि शुद्धीकरण चळवळीने कितीही विरोध नोंदवलेतरी अगदी आघाडीच्या परंपरागत मराठी वृत्तमाध्यमांनी काळाप्रमाणे नवीन हिंदी आणि इंग्रजी शब्दांना स्विकारण्याचे धोरण जवळपास अधिकृतपणे स्विकारल्याचेच दिसते आहे, एवढेच नाही तर शुद्धलेखन नियमांच्या निमनातही त्यांनी कमालीची फ्लेक्सिबिलीटी( शुद्धलेखन वाद्यांच्या दृष्टीने शिथीलता) आणली आहे.
माहितगार ०७:५६, ३१ जुलै २०१० (UTC)

एकदम बेस्ट.हा मानाचा तुरा खोवल्याबद्दल अजुन एकदा अभिनंदन.आगे बढो.बिनधास्त. वि. नरसीकर (चर्चा) १२:५२, ३१ जुलै २०१० (UTC)

होय भारतीय पोस्टाची तिकिटे प्रताधिकारीत असतात,भारतीय संघशासनाचे जवळपास सारे प्रकाशित साहीत्य प्रताधिकारीत असते,एवढेच नव्हे सर्व कायदे आणि राज्यघटना इंग्रजी आणि भारतीय भाषात भाषांतरकरण्या पुरते प्रताधिकारमुक्त असतात , अभारतीय भाषात भाषांतरास मुक्त नसतात (हा बहुतेक स्वातंत्र्यपुर्व ब्रिटीश शासनाच्या सोयीचा भाग असावा पण अजून तरी कायदा तसाच आहे.) commons:Category:Stamps of India येथे ६० वर्षे उलटल्यामुळे प्रताधिकारमुक्त झालेली छायाचित्रे उपलब्ध आहेत केवळ तीच वापरावीत माहितगार १४:४१, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
आपण सुचवलेला स्टँपबद्दल मी साशंक आहे. कारण त्यावर बारीक अक्षरात २००२ लिहिल्या सारखे दिसते. हे पोस्ट खात्याचे संकेतस्थळ उघडले नाही तिकिटाची रिलिज डेट तीथे मिळते का पाहिलेले चांगलेमाहितगार १४:५३, ६ ऑगस्ट २०१० (UTC)

कृपया कोकीळकावळा हा लेख बघा.आवाजाच्या बाबतीत वर्णन/ मजकूर कसा टाकावा ते कळेल. वि. नरसीकर (चर्चा) ०३:४८, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

तुमचे विकिक्वोटवर काम चांगले चालू आहे,थोडासा व्यस्त आहे. ह्या महिन्यात अधून मधूनच लक्ष असेल क्षमस्व, त्यामुळे सदस्य संकल्प किंवा मैहि हू डॉन यांना विनंती करून पहावी. माहिती चौकट साचांकरिता सहाय्य पान सुद्धा उपलब्ध आहेमाहितगार ०९:२५, ९ ऑगस्ट २०१० (UTC)
Return to the user page of "Gypsypkd/जुनी चर्चा ४".