लखनौ

भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर.
(लखनऊ या पानावरून पुनर्निर्देशित)


लखनौ (हिंदी: लखनऊ) ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. नवाबांचे शहर ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गोमती नदीच्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून अवध भूभागाची राजधानी असलेले लखनौ मुघल साम्राज्याच्या दिल्ली सल्तनतीचा भाग होते. सध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत अवधीउर्दू ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत.

लखनौ
लखनऊ
उत्तर प्रदेशमधील शहर

वरून घड्याळाच्या काट्यानुसार: बडा इमामबाडा, लखनौ चारबाग रेल्वे स्थानक, रूमी दरवाजा, हजरतगंज, ला मार्टिनिये कॉलेज व आंबेडकर स्मारक उद्यान
लखनौ is located in उत्तर प्रदेश
लखनौ
लखनौ
लखनौचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 26°48′N 80°54′E / 26.800°N 80.900°E / 26.800; 80.900

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा लखनौ जिल्हा
क्षेत्रफळ २,५२८ चौ. किमी (९७६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४२० फूट (१३० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४८,१५,६०१
  - महानगर ४९,०१,४७४
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

लखनौ येथे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र आहे. उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथील लखनौ लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले.

वाहतूक

संपादन

भारतातील रा.मा. २४, रा.मा. २५, रा.मा. २८रा.मा. ५६ हे चार राष्ट्रीय महामार्ग लखनौमधून जातात. आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग हा देशामधील सर्वाधिक लांबीचा द्रुतगतीमार्ग असून त्याद्वारे लखनौवरून आग्रा तसेच दिल्लीपर्यंत जलद रस्तावाहतूक शक्य आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये खुला करण्यात आलेला पूर्वांचल द्रुतगतीमार्ग लखनौला पूर्वांचल भागासोबत जोडतो.

लखनौ चारबाग रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-कानपूर ही उपनगरी रेल्वेसेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. लखनौ मेट्रो ही जलद परिवहन प्रणाली लखनौमध्ये कार्यरत असून ह्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामधील बांधकाम प्रगतीपथावर आहे.

चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौमधील प्रमुख विमानतळ असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय मध्य पूर्वेतील दुबई, रियाध, मस्कत इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

शिक्षण

संपादन

लखनौमध्ये उच्च शिक्षणासाठी अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. भारतीय प्रबंध संस्थान लखनौ ही नामांकित व्यापार प्रशासन शिक्षण संस्था लखनौमध्ये स्थित आहे. ह्याशिवाय भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, केंद्रीय औषधे संशोधन संस्था, भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था इत्यादी अनेक प्रशिक्षण संस्था लखनौमध्ये आहेत.

भारतीय बॅडमिंटन संघटना (बॅडमिंटन असोसिएअशन ऑफ इंडिया) ह्या भारतामधील बॅडमिंटन खेळाच्या सर्वोच्च नियंत्रण संस्थेचे मुख्यालय लखनौमध्ये आहे. के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजीत केले जातात. भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये खेळणारा अवध वॉरियर्सहॉकी इंडिया लीगमध्ये खेळणारा उत्तर प्रदेश विझार्ड्स हे दोन लखनौमधील प्रमुख व्यावसायिक क्लब आहेत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत