अवध

भारतातील प्रदेश, आशिया

अवध हा भारत देशाच्याउत्तर प्रदेश भागातील एक ऐतिहासिक प्रदेश व भूतपूर्व संस्थान आहे. १७२२ साली मुघल साम्राज्याच्या अस्त काळामध्ये स्थापन झालेल्या अवधची राजधानी फैजाबाद येथे होती व ती नंतर लखनौमध्ये हलवण्यात आली. सादत अली खान पहिला हा अवध प्रांताचा पहिला नवाब होता.

अवधचे भारतामधील स्थान
अवधचा पहिला नवाब सादत अली खान पहिला

आजही उत्तर प्रदेशाच्या मोठ्या भागात अवधी संस्कृतीचे नमुने आढळतात. अवधी ही येथील एक प्रमुख भाषा आहे तसेच अवधी खाद्यपदार्थ भारतभर लोकप्रिय आहेत. उमराव जान हा हिंदी चित्रपट अवधी काळातील कथानकावर आधारित आहे.