आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) द्वारे रोबोकॉन (रोबोटिक काॅनटेस्टचे संक्षिप्त) आयोजित केले जाते, जो आशिया पॅसिफिक प्रदेशातील २० हून अधिक देशांचा समुह आहे. जपान याआधीच राष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धा आयोजित करत आहे आणि २००२ मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे यजमान देखील बनले आहे. तेव्हापासून, दरवर्षी सदस्य प्रसारकांपैकी एक या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करतो.
प्रत्येक सहभागी देशाचे प्रसारक( broadcasters ) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करतील अशा संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करतात. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. सहभागी संघांनी त्यांच्या स्वतःच्या रोबोटची रचना आणि निर्मिती करणे अपेक्षित आहे,आणि प्रशिक्षक, टीम लीडर, मॅन्युअल रोबोट ऑपरेटर आणि स्वयंचलित रोबोट ऑपरेटरसह त्यांचे संघ तयार करणे.
दूरदर्शन, राष्ट्रीय सार्वजनिक सेवा प्रसारक दरवर्षी राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धा आयोजित करते आणि विजेत्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. २००२ मध्ये पहिली रोबोकॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये आयआयटी कानपूरमध्ये तीन महाविद्यालयातील फक्त चार संघ सहभागी झाले होते. बालेवाडी, पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग मैदानात झालेल्या इंडियन नॅशनल रोबोकॉन २०१२ मध्ये ही संख्या ६६ आणि २०१८ मध्ये १०७ वर पोहोचली होती. २००८ आणि २०१४ मध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा यजमान होता. २०२२ मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे दूरदर्शन आणि आयआयटी दिल्ली यांनी नवी दिल्ली येथे केले आहे.