राहुल गांधी

भारतीय राजकारणी

राहुल गांधी (जन्म - १९ जून १९७०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय यूथ काँग्रेस व नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आहेत.[१] ते ऑल इंडिया काँग्रेस समिति चे महासचिव राहिले आणि केरळ वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत.[२]

राहुल गांधी
राहुल गांधी

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ वायनाड

जन्म १९ जून, १९७० (1970-06-19) (वय: ५१)
दिल्ली
राजकीय पक्ष काँग्रेस
नाते  •  राजीव गांधी (वडील)

 •  संजय गांधी (काका)
 •  मेनका गांधी (काकू)
 •  वरून गांधी
 •  सोनिया गांधी (आई)
 •  प्रियंका गांधी - वाड्रा (बहीन)

व्यवसाय राजकारण
सही राहुल गांधीयांची सही
संकेतस्थळ rahulgandhi.in

राहुल गांधी हे नेहरू-गांधी परिवारातून आहेत. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहेरु हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. सुरक्षा कारणांमुळे, कुमारवयात त्यांना वारंवार शाळा बदलायला लागली. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे कनिष्ठ पुत्र आहेत.

राहुल गांधी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीत आपल्या मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार कुमार विश्वासभारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मात्र, २०१९ लोकसभा निवडणूक यात त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला.

राजकारणपूर्व जीवनसंपादन करा

राहुल गांधी हे माजी पंतप्रधान राजीव गांधी व मूळ इटालियन वंशज सोनिया गांधी यांचे चिरंजीव.त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला.त्यांच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी या तेव्हाच्या (१९७०) पंतप्रधान होत्या.

राहुल यांचे पूर्व शिक्षण सेंट. कोलंबिया स्कूल,दिल्ली व दून स्कूल,देहरादून येथे झाले. मात्र, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे शालेय शिक्षण घरीच झाले. त्यांचे बी.ए. चे शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ येथे झाले.पुढे त्यांनी ट्रिनिटी काॅलेज येथून एम्.फिल्. ही पदवी प्राप्त केली.

शिक्षणानंतर त्यांनी लंडनमध्ये एक खासगी नोकरी केली. त्यानंतर ते बॅकाॅप्स सर्व्हिसेस प्रा.लि.,मुंबई येथे रुजू झाले.

राजकीय जीवनसंपादन करा

सुरुवातीचा काळसंपादन करा

मार्च २००४ मध्ये, राहुल यांनी राजकीय प्रवेशाची घोषणा केली व मे २००४ ची लोकसभा निवडणूक अमेठी मतदारसंघामधून लढवत असल्याचे सांगितले.यापूर्वी हा मतदारसंघ राजीव गांधी व सोनिया गांधी प्रतिष्ठेचा बनवला होता. तसेच उत्तर प्रदेशातील काँग्रेसची परिस्थिती सुधरवणे हे आव्हानही त्यांच्यापुढे होते. त्यांच्या पहिल्याच मुलाखतीत ते म्हणाले होते की मी देशास एकत्र घेऊन चालणार आहे व जातिभेद नष्ट करणार आहे. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मतदारसंघातून १ लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला.त्यांचे २००६ व २००७ मधील निवडणुकीतील वाटा उल्लेखनीय होता.

त्यांना २००७ मध्ये भारतीय युवक काँग्रेसचे अधिकार सोपविण्यात आले. तसेच २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्षपद सोपविण्यात आले.

युवक काँग्रेस मधील कार्यसंपादन करा

युवा काँग्रेसचे अध्यक्ष असताना २००८ मध्ये गांधींनी अनेक मुलाखती दिल्या. त्याचा फायदा युवा काँग्रेस चे सदस्य २००,००० हून २.५ दशलक्ष इतके वढले.

२००९ च्या निवडणूकासंपादन करा

२००९ लोकसभा निवडणुकीत राहुल यांनी पुन्हा एकदा ३७०,००० च्या मताधिक्याने विजय संपादन केले.यावेळी काँग्रेस विजयी झाला. मे २०११ मध्ये, राहुल यांना उ.प्र मध्ये शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली.व नंतर जामीन देण्यात आला.

संदर्भसंपादन करा

  1. ^ IANS, BS Web Team & (2019-08-10). "Sonia Gandhi named interim Congress president; Rahul Gandhi declines again". Business Standard India. 2019-08-28 रोजी पाहिले.
  2. ^ IANS, BS Web Team & (2019-08-10). "Sonia Gandhi named interim Congress president; Rahul Gandhi declines again". Business Standard India. 2019-08-28 रोजी पाहिले.