माळवा एक्सप्रेस भारतीय रेल्वे एक वेगवान प्रवासी रेल्वे आहे. ही गाडी मध्य प्रदेशमधील इंदूर ह्या स्थानकापासून जम्मू काश्मीरमधील जम्मू तावीपर्यंत रोज धावते.

माळवा एक्सप्रेसचा फलक

इतिहास संपादन

सुरुवातीस ही गाडी इंदूर आणि नवी दिल्लीदरम्यान धावत असे. त्यानंतर जम्मू तावी पर्यंत धावायला लागली. पाकिस्तानपर्यंत धावणारी ही पहिलीच भारतीय गाडी होती. इंदूर ते लाहोरपर्यंत धावणाऱ्या या विशेष गाडीची सेवा दोन्ही देशांमधील राजकीय मतभेदांमुळे २२ ऑक्टोबर, इ.स. १९८५ रोजी खंडीत करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले परंतु प्रत्यक्षात त्यानंतर ५५ दिवसांनंतर लाहोरपर्यंतची सेवा थांबविण्यात आली. या कालावधीमध्ये आठवडयातून एकदा – शुक्रवारी ही गाडी दोन्ही दिशांनी धावत होती. भोपाळ एक्सप्रेस, रेवांचल एक्सप्रेस आणि अहिल्यानगरी एक्सप्रेस या गाडयांनंतर आयएसओ हे मानांकन प्राप्त झालेली भारतामधील आणि मध्य प्रदेशातील ही पाचव्या क्रमांकाची गाडी आहे.

क्रमांक आणि नामकरण संपादन

१२९१९ क्रमांकाची गाडी इंदूर पासून जम्मू तावी पर्यंत आणि १२९२० क्रमांकाची गाडी जम्मू तावी पासून इंदूरपर्यंत धावते. मध्य प्रदेशमधील माळवा प्रदेशावरून या गाडीचे नामकरण मालवा एक्सप्रेस असे केलेले आहे.

आगमन आणि निर्गमन संपादन

२०१० पासून ही गाडी रोज जम्मू तावीहून सकाळी ९:०० वाजता निघते आणि ३९ स्थानकांवर थांबे घेत २७ तास आणि ५० मिनिटांचा प्रवास ( यामध्ये थांब्यावरील ३ तास १ मिनिटाचा सुद्धा समावेश आहे ) करून दुस-या दिवशी दुपारी १२:५० वाजता इंदूर येथे पाहोचते. या गाडीचा सरासरी वेग ५५.३ कि.मी. प्रति तास एवढा असून एकूण १५४० कि.मी. प्रवास किंवा थांबे वगळून ६२.१ कि.मी. प्रति तास असा आहे.

गाडीचा परतीचा प्रवास इंदूर पासून दुपारी १२:२५ला चालू होतो आणि २७ तास आणि ४० मिनिटांचा प्रवास करून ( यामध्ये थांब्यावरील २ तास ५६ मिनिटांचा समावेश आहे ) दुस-या दिवशी संध्याकाळी ०४:०५ वाजता जम्मू तावीला पाहेाचते. या गाडीचा सरासरी वेग ५६ कि.मी. प्रति तास असा असून थांबे वगळून ६२. ७ कि.मी. प्रति तास असा आहे.

परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी जम्मू तावी ते नवी दिल्ली पर्यंत अत्यंत वेगात प्रवास करते परंतु नवी दिल्ली ते भोपाळ दरम्यान तीचा वेग अतिशय मंदावतो. बरेचदा या दरम्यान ती विलंबाने धावत असते. तरीही उत्तर भारतामधून इंदूरपर्यंत धावणारी ही सर्वांत उत्तम, एकमेव आणि अतिशय वेगवान गाडी आहे.

मार्ग आणि थांबे संपादन

 
मालवा एक्सप्रेस

देवास - उज्जैन, उज्जैन - भोपाळ, भोपाळ - बिना, बिना - झॉंसी - ग्वालिअर, ग्वालिअर - आग्रा, आग्रा - मथुरा, मथुरा - नवी दिल्ली आणि दिल्ली - अमृतसर या मार्गाने धावणारी ही गाडी मध्य प्रदेश, राजस्थान, नवी दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधून धावते. या गाडीचे थांबे खालीलप्रमाणे :

डब्यांची रचना संपादन

  • २४ डब्यांची रचना खालीलप्रमाणे :-
  • १५ शयनयान डबे
  • २ वातानुकूलित व्दितीय वर्ग
  • २ वातानुकूलित तृतीय वर्ग
  • ४ सर्वसाधारण
  • १ खादय गृह

उपलब्धता संपादन

ही गाडी आठवडयातील सातही दिवस एकदा धावते.

संदर्भ संपादन