महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

महाराष्ट्रातील राज्य सरकारी संस्था, भारत

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (इंग्लिश: Maharashtra Housing and Area Development Authority; प्रचलित नाव: म्हाडा) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण करून झाली.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
प्रकार नागरी नियोजन
स्थापना ५ डिसेंबर १९७७
मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र
मालक महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ [१]

महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत.


मंडळे

संपादन
क्र. मंडळ कार्यालय अखत्यारीतील जिल्हे
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ वांद्रे, मुंबई मुंबई जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ वांद्रे, मुंबई मुंबई शहर
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ वांद्रे, मुंबई मुंबई शहर व उपनगरे
कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ वांद्रे, मुंबई ठाणे जिल्हा
रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ नाशिक नाशिक जिल्हा
धुळे जिल्हा
जळगाव जिल्हा
अहमदनगर जिल्हा
नंदुरबार जिल्हा
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ पुणे पुणे जिल्हा
सातारा जिल्हा
सांगली जिल्हा
सोलापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हा
औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा
जालना जिल्हा
परभणी जिल्हा
बीड जिल्हा
नांदेड जिल्हा
उस्मानाबाद जिल्हा
लातूर जिल्हा
हिंगोली जिल्हा
अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ अमरावती बुलढाणा जिल्हा
अकोला जिल्हा
अमरावती जिल्हा
यवतमाळ जिल्हा
वाशिम जिल्हा
नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविभाग मंडळ नागपुर वर्धा जिल्हा
नागपुर जिल्हा
भंडारा जिल्हा
चंद्रपूर जिल्हा
गडचिरोली जिल्हा
गोंदिया जिल्हा

बाह्य दुवे

संपादन