देवेंद्र फडणवीस

भावी प्रधानमंत्री
(देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या पानावरून पुनर्निर्देशित)

देवेंद्र सरीता गंगाधराव फडणवीस (जन्म:२२ जुलै १९७०:नागपूर, भारत - हयात) हे भारतीय राजकारणी व ५ डिसेंबर २०२४ पासून भारताच्या महाराष्ट्र राज्याचे १८वे व विद्यमान मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ आणि २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९ अश्या दोन कार्यकाळांसाठी देवेंद्र यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण केलेले आहे. ३० जून २०२२ ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यान ते महाराष्ट्राचे ९वे उपमुख्यमंत्री देखील राहिले. तत्पूर्वी ते २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. देवेंद्र हे १९९९ ते २००९ दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तर २००९ पासून दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री .त्यापूर्वी, वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. २०१९ छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे. देवेंद्र हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

देवेंद्र फडणवीस

विद्यमान
पदग्रहण
५ डिसेंबर २०२४
मागील एकनाथ संभाजी शिंदे
कार्यकाळ
२३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील उद्धव बाळ ठाकरे
कार्यकाळ
३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील राष्ट्रपती राजवट

कार्यकाळ
३० जून २०२२ – ४ डिसेंबर २०२४
(२ जुलै २०२३ पासून पद अजित पवारसोबत वाटलेले)
मागील अजित अनंत पवार
पुढील एकनाथ संभाजी शिंदे
अजित अनंत पवार

कार्यकाळ
१ डिसेंबर २०१९ – २९ जून २०२२
मागील विजय नामदेव वडेट्टीवार
पुढील अजित अनंत पवार

विद्यमान
पदग्रहण
२२ ऑक्टोबर २००९
मागील नवीन मतदारसंघ
मतदारसंघ दक्षिण-पश्चिम नागपूर
कार्यकाळ
७ ऑक्टोबर १९९९ – २१ ऑक्टोबर २००९
मागील विनोद गुधाडे पाटील
पुढील सुधाकर देशमुख
मतदारसंघ पश्चिम नागपूर

कार्यकाळ
१९९७ – २००१
मागील अज्ञात
पुढील अज्ञात

जन्म २२ जुलै १९७०
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अमृता फडणवीस
नाते गंगाधर फडणवीस
अपत्ये दिविजा फडणवीस (कन्या)
निवास 'सागर' बंगला, मलबार हिल, मुंबई, भारत
गुरुकुल नागपूर विद्यापीठ
फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन
व्यवसाय राजकारणी
धर्म वैदिक सनातन हिंदू
संकेतस्थळ www.devendrafadnavis.in

[ संदर्भ हवा ]

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले.[ संदर्भ हवा ] संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने गाजत असलेली ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी.एस.ई.(??) बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले..

देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्या वडलांची आणि काकूंची पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला.[]

त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

शिक्षण

संपादन

फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना, जनसंघाचे सदस्य असताना, सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. फडणवीस यांनी नंतर इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला कारण त्यांना पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते कारण त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले होते. त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या सरस्वती विद्यालय शाळेत करण्यात आली, जिथे त्यांनी त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण घेतले.[] फडणवीस यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.

फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आहे.[]

 
देवेंद्र फडणवीस - एक हास्य मुद्रा

विधिमंडळातील कार्य

संपादन
  • १९९९ पासून ते आज सालापर्यंत विधिमंडळात आमदार
  • अंदाज समितीचे सदस्य
  • नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य
  • नियम समितीचे सदस्य
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य
  • राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
  • सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य
  • स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य


विवाद

संपादन

१ जानेवारी २०२०ला भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल-मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी जल-संपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले की या दोघांनी जाणीवपूर्वक आपले २०१९ महाराष्ट्र विधानसभेचे तिकीट कापले. आपली उमेदवारी कापून आपले राजकारण संपवण्याचा कट रचला गेला असे खडसे वृत्त-वाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतीत म्हणाले[][]

सामाजिक योगदान

संपादन

[ संदर्भ हवा ]

  • ’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रीज”चे सचिव
  • नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
  • नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
  • नागपूर विद्यापीठाचे सेनेट सदस्य
  • नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल)चे उपाध्यक्ष
  • संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य

आंतरराष्ट्रीय

संपादन
  • अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्‍युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
  • अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
  • ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य
  • केन्यातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण
  • डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व
  • मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग
  • युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग
  • रशियात मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
  • स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
  • होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण

भुषवलेली पदे

संपादन
  • १९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
  • १९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
  • १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर
  • १९९४ भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
  • २००१ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणी्स
  • २०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष
  • २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
  • २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते
  • जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री

पुरस्कार

संपादन
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
  • नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
  • पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
  • राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
  • रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
  • नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' पुरस्कार

पुस्तके

संपादन

चरित्र

संपादन
  • लेखिका सुषमा नवलखे यांनी फडणवीस यांचे चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.
  • देवेंद्र फडणवीस यांनी चार मराठी पुस्तके लिहिली आहे असे सांगितले जाते, त्यांतील एक - 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत[]' हे एक पुस्तक आहे.[ संदर्भ हवा ]
  • आणखी एक ३६ पानी पुस्तक - 'आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘[] (प्रकाशन ५ जुलै २०२०)

संदर्भ

संपादन
  1. ^ "All you need to know about Devendra Fadnavis". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-02-19 रोजी पाहिले.
  2. ^ NANDGAONKAR, SATISH (२९ ऑक्टोबर २०१४). "Kid who protested Emergency - Nagpur's Mr Popular set to don CM mantle". The Telegraph India. २८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "All you need to know about Devendra Fadnavis". Daily News and Analysis. Diligent Media Corporation Ltd. 28 October 2014. 30 October 2014 रोजी पाहिले.
  4. ^ "खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे आपले तिकीट कापले गेल्यामागे कारणीभूत आहेत असे थेट आरोप केले". Zee २४ Tass news channel. ३ जानेवारी २०२०. ३ जानेवारी २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  5. ^ ABP, Live. "खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपले तिकीट कापले असे थेट नाव घेऊन आरोप केले". एबीपी माझा न्यूझ चॅनल. ६ जानेवारी २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. ६ जानेवारी २०२० रोजी पाहिले. More than one of |पहिले नाव= and |first= specified (सहाय्य); More than one of |दुवा= and |url= specified (सहाय्य); More than one of |website= and |संकेतस्थळ= specified (सहाय्य)
  6. ^ "देवेंद्र फडणवीस यांचं नवं पुस्तक एका क्लिकवर". Loksatta. 2022-02-19 रोजी पाहिले.
  7. ^ "देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक पुस्तक : काय आहे पुस्तकात? वाचा…". Loksatta. 2022-02-19 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
मागील:
पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
३१ ऑक्टोबर २०१४ – विद्यमान
पुढील:
उद्धव ठाकरे