आणीबाणी (भारत)

(आणीबाणी या पानावरून पुनर्निर्देशित)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.[] राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले, प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना स्थगिती देण्यात आली, विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करण्यात आली, रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. एकप्रकारे आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली. अशा कठीण प्रसंगी, लेखक बशीर मोमीन (कवठेकर)[] यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले[] आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगमंचावर सादर केले. 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य टिकवण्यासाठी कशा प्रकारे दिल्लीच्या आक्रमणाला शौर्याने तोंड दिले हे दर्शवले आहे. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कलीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले.[]

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

जनता हळूहळू आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी, यांनी मोठे योगदान दिले.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली.

आणीबाणीची पार्श्वभूमी

संपादन

इंदिरा गांधींचा उदय

संपादन

१९६७ ते १९७१ दरम्यान, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर आपले बहुमत प्रस्थापित केले. त्यांनी केंद्र सरकारचे अधिकार पंतप्रधान सचिवालयात केंद्रित करायला सुरुवात केली आणि त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्याबद्दल धोका आणि अविश्वास वाटू लागला. इंदिरा गांधींनी काँग्रेस मधील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. जुलै १९६९ मध्ये अनेक मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि सप्टेंबर १९७० मध्ये प्रिव्ही पर्स रद्द केल्यामुळे इंदिरा गांधींचा प्रभाव आणि लोकप्रियता खूप वाढली होती. इंदिराजींना "अर्थशास्त्रात समाजवाद आणि धर्माच्या बाबतीत धर्मनिरपेक्षता, गरीब समर्थक आणि संपूर्ण राष्ट्राच्या विकासासाठी उभे" म्हणून पाहिले गेले."[]

१९७१ भारतीय सार्वत्रिक निवडणुका मध्ये, लोकांनी इंदिराजींच्या गरीबी हटाओ" या लोकप्रिय घोषणेला प्रतिसाद देत त्यांना बहुमत दिले (३५२ जागा)."[] डिसेंबर 1971 मध्ये, इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानला वेगळे करून स्वतंत्र बांगलादेश राष्ट्राची निर्मिती केली त्यावेळी त्यांची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर होती.

राज नारायण खटल्याचा निकाल

संपादन

१९७१ च्या संसदीय निवडणुकीत इंदिरा गांधीं यांनी राज नारायण यांचा पराभव केला होता. राज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात, इंदिरा गांधीं विरोधात, त्यांची निवड रद्दबातल करण्यासाठी खटला दाखल केला. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांची निवड रद्द केली आणि अतिरिक्त सहा वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी २४ जून १९७५ रोजी, उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि गांधींना खासदार म्हणून मिळालेले सर्व विशेषाधिकार बंद करण्याचे आणि त्यांना मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याचे आदेश दिले. तथापि, त्यांच्या अपीलाचा ठराव प्रलंबित असेपर्यंत त्यांना पंतप्रधानपदी राहण्याची परवानगी देण्यात आली. जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांनी दररोज सरकारविरोधी आंदोलने पुकारली. दुसऱ्या दिवशी, जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीत एक मोठी रॅली आयोजित केली होती, जिथे ते म्हणाले की "जर एखाद्या पोलिस अधिकाऱ्याने सरकारचे आदेश अनैतिक असेल तर ते नाकारले पाहिजेत कारण स्वातंत्र्य लढ्यादरम्यान हे महात्मा गांधी यांचे ब्रीदवाक्य होते". असे वक्तव्य देशात बंडखोरी माजवण्याचे संकेत आहेत असे समजून इंदिरा गांधींनी फखरुद्दीन अली अहमद यांना आणीबाणीची स्थिती घोषित करण्याची विनंती केली. तीन तासांत सर्व प्रमुख वृत्तपत्रांची वीज खंडित करून राजकीय विरोधकांना अटक केली. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा न करता पाठवण्यात आला होता, ज्यांना फक्त त्याची माहिती मिळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला मान्यता दिली.[][]

भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ आणि ३५६ चा वापर करून, इंदिरा गांधींनी स्वतःला विलक्षण अधिकार दिले आणि नागरी हक्क आणि राजकीय विरोधावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. सरकारने हजारो आंदोलक आणि राजकीय नेत्यांना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यासाठी देशभरातील पोलिस दलाचा वापर केला. जयप्रकाश नारायण, मुलायम सिंह यादव, राज नारायण, मोरारजी देसाई, चरण सिंह, जीवराम कृपलानी, जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी, आणि इतर आंदोलनकर्त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. काही राजकीय पक्षांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जमात-ए-इस्लामी हिंद सारख्या संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) नेते व्ही. एस.अच्युतानंदन आणि ज्योतिर्मय बसू यांच्या साहित्यांच्या पक्षाशी संबंधित इतर अनेकांना अटक करण्यात आली. आणीबाणीच्या घोषणेला आणि घटनेतील दुरुस्तीच्या विरोधात असलेल्या काँग्रेस नेत्यांनी, जसे की मोहन धारिया आणि चंद्र शेखर, त्यांच्या सरकारी आणि पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना सुद्धा अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले.DMK सारख्या प्रादेशिक विरोधी पक्षांच्या सदस्यांना देखील अटक करण्यात आली.

आणीबाणी विरोधी चळवळ

संपादन

लोकशाही बचाओ मोर्चा

संपादन

आणीबाणीच्या घोषणेनंतर लवकरच, शेख समुदायाच्या नेतृत्वाने अमृतसर येथे बैठका बोलावल्या ज्यात त्यांनी काँग्रेसच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला विरोध करण्याचा निर्धार केला.[] "लोकशाही बचाओ मोर्चा" चे समर्थन अकाली दलाने सुद्धा केले होते. या विरोधी मोर्चादरम्यान 40,000 हून अधिक अकाली आणि इतर शीखांना अटक करण्यात आली.[]

साहित्य व कलाक्षेत्र

संपादन

साहित्य

संपादन
  • लेखक श्री. राही मासूम रझा यांनी त्यांच्या 'कतर बी आरजू' या कादंबरीद्वारे आणीबाणीवर टीका केली. [१०]
  • रिच लाइक अस नयनतारा सहगल द्वारे अंशतः आणीबाणीच्या काळातील पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि राजकीय भ्रष्टाचार आणि दडपशाही यांसारख्या घटनांशी संबंधित आहे.[११]

रंगभूमी /नाट्य क्षेत्र

संपादन

आणीबाणी मुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्यात आली होती तेंव्हा अशा कठीण प्रसंगी, लेखक बशीर मोमीन (कवठेकर)[१२] यांनी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे ऐतिहासिक संदर्भ असेलेले नाटक लिहिले[१३] आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रंगमंचावर सादर केले.

'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' या नाटकात, छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली, स्वराज्य टिकवण्यासाठी, कशा प्रकारे दिल्लीच्या आक्रमणाला शौर्याने तोंड दिले हे दर्शवले आहे. नाटकाच्या शेवटी, जनतेने स्वराज्य रक्षणासाठी नेहमीच संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे असे आवाहन केले जायचे. हे नाटक प्रतिकात्मक स्वरूपात, तत्कालीन दिल्ली सरकारने लोकशाही वर केलेल्या आक्रमणाला धैर्याने परतवून लावण्यासाठी जनतेला प्रेरणा देणारे ठरले. अशाप्रकारे साहित्यिक बशीर मोमीन, त्यांनी लिहिलेले नाटक आणि नाटकातील कलाकार, यांनी भारताच्या लोकशाही संवर्धनासाठी सुरू असलेल्या लढ्यात, मराठी रंगभूमीच्या माध्यमातून, जनतेला प्रेरित करत संविधान टिकवण्याच्या चळवळीत योगदान दिले.[१४]


घटनाक्रम

संपादन
१९७५
  • १२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
  • २२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
  • २४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.
  • २५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
  • ३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.
  • १ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
  • ५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.
  • २३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजूरी.
  • २४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.
  • ५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.
१९७६
  • २६ जानेवारी : 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' नाटकाचे पुण्यात रंगमंचावर सादरीकरण. ऐतिहासिक संदर्भ देऊन प्रतीकात्मक स्वरूपात आणीबाणी विरुद्ध लढा देण्यासाठी जनतेला आवाहन.
  • २१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.
  • २५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.
  • ३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजूरी.
  • १ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.
१९७७
  • १८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.
  • २० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.
  • २४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
  • ११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.
  • २१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.
  • २२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू". BBC न्युज मराठी. २० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.
  2. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  3. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”
  4. ^ अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021
  5. ^ a b गुहा, पृ. ४३९
  6. ^ org/web/20170519080200/http://www.mtholyoke.edu/~ghosh20p/page1.html "भारतीय आणीबाणी 1975-77" Check |archive-url= value (सहाय्य). Mount Holyoke College. 19 मे 2017 रोजी [http:// /www.mtholyoke.edu/~ghosh20p/page1.html मूळ पान] Check |url= value (सहाय्य) पासून संग्रहित. 2009-07-05 रोजी पाहिले.
  7. ^ "The इंदिरा गांधींचा उदय -date=2009-06-27". Missing or empty |url= (सहाय्य)
  8. ^ J.S. ग्रेवाल, द शीख ऑफ पंजाब, (केंब्रिज, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, 1990) 213
  9. ^ {{Cite book |last=Amore |first=Roy C. |url=https://books.google.com/books?id=3eqvDwAAQBAJ&dq=sant+ kartar+singh+emergency&pg=PA32 |title=Religion and Politics: New Developments Worldwide |date=2019-09-17 |publisher=MDPI |isbn=978-3-03921-429-7 |pages=32 |language=en}
  10. ^ ओ. पी. माथूर, भारतीय कादंबरीत इंदिरा गांधी आणि आणीबाणी, सरूप अँड सन्स, 2004. आयएसबीएन 978-81-7625-461-8.
  11. ^ साचा:साहित्य जर्नल
  12. ^ "बशीर मोमीन (कवठेकर)" Archived 2019-06-03 at the Wayback Machine., दै.महाराष्ट्र टाइम्स, 2-March-2019
  13. ^ खंडूराज गायकवाड, लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे- बशीर मोमीन कवठेकर!, “दै नवाकाळ", 20-Jan-2019”
  14. ^ अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021