नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - ५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ नागपूर जिल्ह्यात आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १२ ते १६, ४३ ते ५१, ७९ ते ८२ आणि १०३ ते १०५ यांचा समावेश होतो. नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][][]

भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
२००९ पूर्वी: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचा भाग
२००९ देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर दक्षिण पश्चिम
उमेदवार पक्ष मत
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भाजप ८९,२५८
विकास पांडुरंग ठाकरे काँग्रेस ६१,४८३
लोखंडे राजू जोतीराम भाबम १०,५३३
उमाकांत (बबलू) देवतळे अपक्ष ८,३३७
सुनील चोखीनाथ झोडपे अपक्ष १,६१८
जयदीप जोगेंद्र कवाडे रिपाई (A) १,४३८
रंगारी राजेश श्रावण अपक्ष ८४८
चिमोटे राममूर्ती केशवराव गोंगपा ४३७
राजू महादेव पेंदाम झारखंड मुक्ति मोर्चा १८४
बंटी हरिदास उके अपक्ष १८४
कांबळे राजू संपतराव अपक्ष १८१
भैय्यासाहेब भगवान शेलारे Indian Justice Party १३६
उद्धव श्यामरावजी खडसे अपक्ष ११७
खेमराज पुनाजी मून अपक्ष ११२
बाळासाहेब ऊर्फ प्रमोद रामजी शंभरकर अपक्ष ८९

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). २४ October २००९ रोजी पाहिले.
  4. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).