नागपूर महानगरपालिका

भारताच्या महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराची महानगरपालिका

नागपूर शहराचे काम नागपूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय नागपूरच्या सिव्हील लाईन्स येथे आहे.

३१ मे १८६४ मध्ये नागपूरमध्ये नगरपालिका अस्तित्वात आली.[१]त्यावेळेस सुमारे ६,००० चौरस मैल (१६,००० चौ. किमी) क्षेत्रफळ असलेल्या नागपूर शहराची लोकसंख्या सुमारे ८२००० होती.या नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत २ मार्च १९५१ या साली झाले.

त्यावेळी,या शहराचे महानगरपालिकेअंतर्गत असलेले क्षेत्रफळ २१७.५६ चौ.कि.मी होते व या शहराची त्यावेळची लोकसंख्या ४८२३०४ इतकी होती.हे शहर सध्या महाराष्ट्राची उप-राजधानी म्हणून परिचित आहे. २६ डिसेंबर १९५० रोजी या संस्थेचा हिरक महोत्सव साजरा करण्यात आला.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन