विजय वडेट्टीवार

एक भारतीय राजकारणी

विजय नामदेवराव वडेट्टीवार हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप व पुनर्वसन या विभागांचे कॅबिनेट मंत्री होते.

विजय वडेट्टीवार

कार्यकाळ
३० सप्टेंबर २०२३ – डिसेंबर २०२४
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

कार्यकाळ
२०१९ – २०२४

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
व्यवसाय राजकारण

वडेट्टीवार हे माजी आमदार असून चिमूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेत झाली असून, नंतर त्यांनी नारायण राणे यांचेसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसच्या पक्षातर्फे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.[][][] चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादनशुल्क मंत्री  यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". bbc.com. ५ जाने २०२०.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  4. ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल (2020-10-01). "चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठणार?; वडेट्टीवार लागले कामाला". TV9 Marathi. 2020-10-17 रोजी पाहिले.