ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. सावली आणि २. सिंदेवाही ही दोन संपूर्ण तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि ब्रह्मपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय नामदेवराव वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती
संपादनब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
- सावली तालुका
- सिंदेवाही तालुका
- ब्रह्मपुरी तालुका : गांगलवाडी आणि ब्रह्मपुरी महसूल मंडळ; ब्रह्मपुरी नगरपालिका
ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादननिवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
ब्रम्हपूरी | ||
उमेदवार | पक्ष | मत |
अतुल देविदास देशकर | भाजप | ५०३४० |
संदीप वामनराव गड्डमवार | अपक्ष | ४४८४५ |
पंकज मधुकर गुड्डेवार | काँग्रेस | ३०२६५ |
नीलकंठ पुंडलिक उरकुडे | बसपा | ७३०० |
अशोक पंढरीनाथ रामटेके | रिपाई (आ) | ४५३५ |
रमेशकुमार बाबूरावजी गजबे | अपक्ष | ४१०३ |
Shukla Dinkar IndraDutta | स्वभाप | २३६८ |
विकास श्रीहरी हरणे | अपक्ष | १९४२ |
उद्धव अंतराम शिंगाडे | जसुश | १४२६ |
जितेंद्र आडकू राउत | अखिल भारतीय मानवता पक्ष | ८८४ |
मनोहर प्रल्हाद गेडाम | अपक्ष | ६६४ |
रविंद्र गुलाब नागोसे | अपक्ष | ६०१ |
देवानंद सोनकुसरे | डेसेपा | ६०० |
देवानंद रामचंद्र पिलारे | अपक्ष | ४९६ |
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
नोंदी
संपादन- ^ द्विसदस्यीय जागा.
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).