ता.वणीयवतमाळ जिल्ह्यातील केळापूर आणि घाटंजी या तालुक्यांमध्ये पैनगंगा नदी खोऱ्यात टिपेश्वर अभयारण्य पसरले आहे. (७८° ३५' पूर्व ते ७८° २०' पश्चिम आणि २०° ००' उत्तर ते १९° ३५' दक्षिण) नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील पांढरकवडा गावापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर, यवतमाळहून ९२ कि. मी. अंतरावर, अदिलाबादपासून ४२ कि. मी. अंतरावर हे अभयारण्य आहे.

दि. ३० एप्रिल १९९७ च्या अध्यादेशानुसार १४८.६२ चौ. कि. मी. क्षेत्राला टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. या अभयारण्याचे संचालन मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेंच राष्ट्रीय उद्यानचे वनसंरक्षक करतात. या जंगलात असलेल्या टिपाई देवीच्या मंदिरावरून या अभयारण्यास टिपेश्वर नाव पडले आहे. अभयारण्य क्षेत्रात टिपेश्वर, मारेगांव आणि पिटापुंगरी अशी तीन गावे येतात. या अभयारण्यात इंग्रजांच्या काळातील एक छोटेसे विश्राम गृह आहे. एक निसर्ग वाचन/अभास केंद्रही येथे सुरू करण्यात आलेले आहे.

वन्यजीव

संपादन

शुष्क पानगळीचे हे जंगल अनेक वन्यजीवांचे आणि झाडांचे पोषण करते. येथे वाघ, बिबट्या, रानमांजर, छोटे उदमांजर, खोकड, झिपरे अस्वल, चौशिंगा, काळवीट, भारतीय मुंगीखाऊ, चितळ आदी मुख्य सस्तन प्राणी असून सरपटणारे प्राणी नाग, घोणस, धामण, अजगर, घोरपड येथे पहायला मिळतात.

वृक्षांपैकी अंजन, आपटा, बहावा, बाभुळ, बेल, बिबा, बोर, चिंच, चंदन, धावडा, हिरडा, जांभुळ, काठ सावर, खैर, मोह, पळस, साग, सालई, सिताफळ, सुबाभुळ, तेंदू, तिवस, उंबर, वड हे मुख्य वृक्ष येथे आहेत.

फुलपाखरांपैकी Blue Pansy, Chocolate Pansy, Grey Pansy, Lemon Pansy, Yellow Pansy, Common Sailor, Commander, Baronet, Common Leopard, Joker, Common Crow, Plain Tiger, Common Grass Yellow, Common Gull, Pale Grass Blue, Grass Jewel, Common Rose, Common Mormon, Crimson Rose [मराठी शब्द सुचवा] ही फुलपाखरे येथे दिसतात.

याशिवाय सुमारे १६० जातींचे विविध पक्षी येथे पहायला मिळतात, त्यात पाणकावळे, बगळे, घार, तितर, कबुतरे, सुतार, नवरंग, मैना, स्वर्गीय नर्तक यांचा प्रामुख्याने समावेष आहे.

अभयारण्याचे शास्त्रीय वर्गीकरण

संपादन
Bio-Geographic Zonation
Bio-Geographic Kingdom Paleotropical
Sub Kingdom Indomalyopin
Bio-Geographic Zone Deccan Peninsula
Biotic Province 6 B, Central Deccan
Sub Division Range Satpuda Maikal Division

टिपेश्वर अभयारण्य अर्ध डोंगराळ प्रकारातील अभयारण्य असून यातील सुमारे ६० % भाग डोंगराळ, ३० % मध्यम उताराचा तर १० % सपाट भूप्रदेशाचा आहे. येथील कमाल तपमान ४६° से, किमान तपमान ७° से. तर सरासरी तपमान २८° से. असते. पर्जन्य सरासरी १००० मि. मी. असून सुमारे १०० दिवस पावसाचे असतात.