अंजन ( वनस्पतिशास्त्रीय नाव: हार्डविकिया बायनाटा Hardwickia binata Roxb, कुळ: Caesalpinaceae, ( संस्कृत: अंजन, हिंदी: अंजन;)

अंजन
ANJAN.jpg
शास्त्रीय वर्गीकरण

वर्णनसंपादन करा

अंजनाचा वृक्ष सर्वसाधारणपणे शुष्क पानझडीच्या वनांत आढळतो. हा वृक्ष सरासरी १५ ते २५ मीटर उंच वाढतो. खोड खरबरीत तपकिरी रंगाचे असून साल भेगाळलेली दिसते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे खोडाचा रंग गडद होत जातो. पाने संयुक्तपर्णी, द्विदल म्हणजेच दोन पर्णिकांची मिळून बनलेली असतात. .आपटयाच्या पानासारखी दिसतात

अंजन आणि कांचन एकाच कुळातील असल्यामुळे प्रथमदर्शनी दोघांमधे गफलत होण्याची शक्यता असते. परंतु कांचन आणि अंजनाच्या पानांमधील मुख्य फरक म्हणजे पर्णिकांची रचना. अंजनाचे पान दोन देठविरहित पर्णिकांचे बनलेले असून दोन्ही पर्णिका एकमेकांपासून पूर्णपणे सुट्या असतात याउलट कांचनाच्या पर्णिका मध्यशिरेला जोडल्या जाऊन मध्यावर घडी पडणारे पान तयार होते. अंजनाच्या या पर्णिका साधारणपणे 2.5 ते 7.5 सेमी लांब असतात. फुले छोटी, नाजूक, पिवळसर रंगाची व सहज नजरेत न भरणारी असतात. फुले हिवाळयात येतात . शेंगा चपट्या, लांबट आकाराच्या, दोन्ही टोकांकडे निमुळत्या, आणि खालच्या टोकाजवळ एक बी धारण करणाऱ्या असतात. अंजनाचा पाला हा जनावरांसाठी उपयुक्त चारा आहेे. या वनस्पतीचे लाकुड तांबडया रंगाचे व अतिशय कठिण असते .भारतातले सर्वात जड लाकुड अशी ओळख आहे . भासता ओलना कु

हंगामसंपादन करा

अंजनवृक्षाची एप्रिलमधे पानझड होऊन मे ते ऑगस्ट दरम्यान झाडाला नवी पालवी फुटते. साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर हा अंजनाच्या फुलण्याचा काळ असतो. यानंतर लगेचच फळे तयार होऊन ती पुढील हंगामापर्यंत झाडावर टिकतात.

नैसर्गिक आढळसंपादन करा

अंजनाचा वृक्ष शुष्क प्रदेशांत नैसर्गिकरीत्या आढळतो. उथळ, वालुकामिश्रित, खडकाळ जमीन याच्या वाढीसाठी पोषक असते. अंजनाची लांब मुळे जमिनीत खोलवर शिरून खडकांच्या भेगांमधून लांबवर पसरतात. त्यामुळे पाण्याशिवायही झाड व्यवस्थितपणे जिवंत राहू शकते.

उपयोगसंपादन करा

  1. धागे: अंजनाच्या सालीपासून मिळणाऱ्या धाग्यांपासून बळकट दोर तयार करतात.
  2. चारा: पानांमधे साधारण ९% प्रथिने असतात, त्यामुळे जनावारांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून वापर केला जातो.
  3. इमारतीचे लाकूड: भारतात मिळणाऱ्या लाकडांच्या प्रकारांपैकी अंजनाचे लाकूड अतिशय टिकाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. अंजनाचे लाकूड प्रामुख्याने शेतीची उपकरणे, बैलगाड्या, चाके व इमारतींच्या बांधकामासाठी वापरले जाते.
  4. इंधन: जळणासाठी तसेच कोळसा तयार करण्यासाठी अंजनाचे लाकूड उपयोगी आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा