जेम्स अँडरसन
जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो.
जेम्स ॲंडरसन | ||||
इंग्लंड | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | जेम्स मायकल ॲंडरसन | |||
उपाख्य | जिमी, जिम, जिम्झा, द बर्नली एक्सप्रेस | |||
जन्म | ३० जुलै, १९८२ | |||
बर्नली, लॅंकेशायर,इंग्लंड | ||||
उंची | ६ फु २ इं (१.८८ मी) | |||
विशेषता | गोलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | डावखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने जलद-मध्यम | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
एकदिवसीय शर्ट क्र. | ९ (prev. ४०) | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
२००२–present | लॅंकेशायर (संघ क्र. ९) | |||
२००७/०८ | ऑकलंड | |||
२००० | लॅंकेशायर | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | १८८ | १९४ | २९६ | २६१ |
धावा | १,३५३ | २७३ | २,०३९ | ३७६ |
फलंदाजीची सरासरी | ८.९६ | ७.५८ | ९.२६ | ८.९५ |
शतके/अर्धशतके | ०/१ | ०/० | ०/१ | ०/० |
सर्वोच्च धावसंख्या | ८१ | २८ | ८१ | २८ |
चेंडू | ३७,८७७ | ९,५८४ | ५८,८७५ | १२,७३० |
बळी | ७०३ | २६९ | १,११४ | ३२८ |
गोलंदाजीची सरासरी | २६.५२ | २९.२२ | २४.६७ | २८.५७ |
एका डावात ५ बळी | ३२ | २ | ५४ | २ |
एका सामन्यात १० बळी | ३ | n/a | ६ | - |
सर्वोत्तम गोलंदाजी | ७/४२ | ५/२३ | ७/१९ | ५/२३ |
झेल/यष्टीचीत | १०१/– | ५३/– | १५७/– | ६८/– |
११ जुलै, इ.स. २०२४ |
अँडरसन क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. याने जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक तर एकूण गोलंदाजांमध्ये (मुतिया मुरलीधरन नंतर) दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
फेब्रुवारी २०२३मध्ये हा आयसीसी गोलंदाज क्रमवारीत हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी त्याने सर्वाधिक वयाच्या गोलंदाजाने पहिला क्रमांक मिळविण्याचा विक्रम रचला.[१][२] २०२४मध्ये निवृत्तीच्या आधी अँडरसन ७व्या क्रमांकावर होता.[३] वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या जलदगती गोलंदाजांत अँडरसन एक आहे.[४]
अँडरसन आपला पहिला कसोटी सामना २००३मध्ये आणि शेवटचा २०२४मध्ये खेळला. हा इंग्लंडकडून २००२-१५ दरम्यान एकदिवसीय आणि २००७-०९ दरम्यान टी२० सामने खेळला..[५] २०१८मध्ये इंग्लंडच्या १,०००व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्वोत्तम संघामध्ये त्याची निवड केली होती.[६]
अँडरसन जलदगती गोलंदाजांमध्ये कसोट्यांमधून सर्वाधिक बळी (७०४) घेणारा आहे. हा ६०० आणि ७०० बळी घेणारा पहिला जलदगती गोलंदाज आहे. इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक बळी घेतलेले आहेत.[७] हा इंग्लंडकडून सर्वाधिक आणि सचिन तेंडुलकरनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त कसोटी सामने खेळलेला आहे.[८] याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्येही सर्वाधिक (२६९) बळी घेतलेले आहेत.[९] अँडरसन आणि ज्यो रूटची १९८ धावांची भागीदारी इंग्लंडसाठी शेवटच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी आहे. अँडरसन कसोट्यांमध्ये फलंदाजी करीत असताना विक्रमी ११४ वेळा नाबाद राहिला आहे.[१०]
उच्च फॉर्ममध्ये[मराठी शब्द सुचवा] असतानाही २०२४मध्ये इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने अँडरसनला लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर निवृत्त करण्याची घोषणा केली
सुरुवातीचे आणि खाजगी जीवन
संपादनअँडरसनचा जन्म इंग्लंडच्या लँकेशायर काउंटीतील बर्नली शहरात झाला व त्याचे लहानपण येथेच गेले. याने सेंट मेरीज आणि सेंट थियोडोर आरसी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. हा अगदी लहानपणापासून बर्नली क्रिकेट क्लबमध्ये खेळत असे. शाळांना सुट्या असताना आणि वीकांतात ह क्लबच्या दुसऱ्या दर्जाच्या संघाचा स्कोरर असे. त्याचे वडील मायकेल या संघाचे नायक होते.[११][१२] जेम्सला लहापणापासूनच क्रिकेट खेळाडू व्हायचे होते. वयाच्या १७व्या वर्षी हा लँकेशायर लीगमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक होता.[१३] त्याने म्हणले आहे की "मी नेहमीच सीम बोलिंग करीत असे परंतु १७व्या वर्षी काय झाले माहिती नाही पण अचानक मी जलदगतीने गोलंदाजी करू लागलो."[ संदर्भ हवा ] अँडरसन फुटबॉलचा चाहता असून बर्नली एफ.सी.चा समर्थक आहे.[१४]
२००४मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असताना अँडरसनची ओळख डॅनियेला लॉइडशी झाली. त्यांनी २००६मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुली आहेत.[१५][१६]
काउंटी क्रिकेट
संपादनअँडरसन आपला पहिला लिस्ट अ काउंटी सामना २००० नॅटवेस्ट चषक स्पर्धेत लँकेशायर क्रिकेट बोर्ड कडून सफोक काउंटी विरुद्ध खेळला. यात त्याने रसेल केटलीचा पहिला बळी घेतला.[१७]
२००२मथ्ये अँडरसन पहिला प्रथम वर्गीय सामना लँकेशायरकडून खेळला. या हंगामात त्याने १३ सामन्यांमध्ये प्रत्येकी २२.२८ धावा देत ५० बळी घेतले. यात तीन वेळा एकाच डावात ५ बळी होते.[१८] इंग्लंडकडून कसोटी सामने खेळलेला इयान वॉर्ड अँडरसनचा पहिला प्रथम वर्गीय बळी होता.[१९] याच वर्षी त्याला लँकेशायरचा सर्वोत्तम नवोदित खेळाडू पुरस्कार दिला गेला.[२०] २००३मध्ये अँडरसन लँकेशायरकडून हॅटट्रिक घेणारा वयाने सगळ्यात लहान खेळाडू झाला. ही हॅटट्रिक त्याने ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आपल्या कसोटी पदार्पणाआधी आठवडाभर घेतली होती.[२१] मे २००४ मध्ये अँडरसनने वूस्टरशायरविरुद्ध पहिल्यांदा एकाच सामन्या १० बळी घेतले.[२२]
अँडरसन २००५ च्या हंगामात लँकेशायरकडून पूर्ण वेळ खेळला. याच वेळी त्याला राष्ट्रीय संघात घेण्यात आले होते परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही. हिवाळ्यातील आंतरराष्ट्रीय दौरे संपल्यावर अँडरसन परत लँकेशायरकडून खेळायला लागला परंतु सामन्यांमध्ये खेळण्याचा सराव नसल्याने त्याची कामगिरी फारशी प्रभावशाली नव्हती.[२३] २००५ च्या काउंटी मोसमात त्याने ३०.२१ सरासरीने ६० प्रथम वर्गीय आणि २२.०० सरासरीने २७ एकदिवसीय बळी घेतले.[१८][२४]
२००६ च्या मे महिन्यात अँडरसनच्या पाठीत अस्थिभंग झाल्याने त्याला लँकेशायरकडून खेळता आले नाही.[२५] या वर्षी तो फक्त दोन सामने खेळला आणि त्यातही त्याने फक्त प्रत्येकी ४ षटके तीन वेळा टाकली. इंग्लड राष्ट्रीय संघाने त्याला अधिक दुखापत होऊ नये म्हणून हे बंधन घातले होते.[२६] लँकेशायरने आपल्याकडून खेळू न शकणाऱ्या अँडरसनला ग्लॅमॉर्गन संघात पाठविण्याचाही विचार केला परंतु शेवटी खेळता आले नाही तरी त्याला आपल्याच संघात ठेवून घेतले.[२७]
२००८चा दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर अँडरसन लँकेशायरकडून खेळला नाही..[२८] या मोसमात त्याने लँकेशायरसाठी ७.७५ धावांच्या सरासीने २० प्रथम वर्गीय बळी घेतले.[२९]
२००९ मोसमाच्या पहिल्याच सामन्यात अँडरसनने ससेक्सविरुद्ध प्रथम वर्गीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करीत १०९ धावांत ११ बळी घेतले. त्यानंतर लगेचच त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळण्याची संधी दिली गेली.[३०] २६ एप्रिल २००९ पर्यंत अँडरसनने लँकेशायरसाठी ४८ सामन्यांमध्ये २४.३७ च्या सरासरीने १८८ बळी आणि ४४ लिस्ट अ सामन्यांमध्ये २१.७८ च्या सरासरीने ६६ बळी घेतले होते.[३१][३२]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
संपादनअँडरसनची इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी २००२मध्ये पहिल्यांदा निवड झाली तेव्हा त्याने अजून लँकेशायरकडून काउंटी सामना सुद्धा खेळलेला नव्हता.[३३] निवडीच्या वेळी त्याने २६.७५ च्या सरासरीने ५ लिस्ट अ सामन्यांमध्ये २३ बळी घेतलेले होते.[३४]
अँडरसनची गोलंदाजीची पद्धत निराळी आहे. चेंडू टाकतानाच्या क्षणी त्याचे डोके खाली झुकलेले असते आणि त्यानी डोळे मिटलेले असतात. इंग्लंडच्या क्रीडा मार्गदर्शकांच्या सल्ल्याने त्याने काही काळ डोके न झुकवता चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु असे करताना त्याचा वेग कमी होत असे. अँडरसनने पुन्हा आपली पहिलीच पद्धत अवलंबिली..[३५] २००३ साली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज बॉब विलिसने भाकित केले होते की अँडरसनच्या या पद्धतीमुळे त्याला फारतर ५ वर्षे खेळता येईल[१३] परंतु अँडरसन २१ वर्षे कसोटी क्रिकेट खेळला.
२००२-०३: विश्वचषक, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका
संपादन१५ डिसेंबर, २००२ रोजी वयाच्या २०व्या वर्षी अँडरसन आपला पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्न येथे खेळला. सलामीला गोलंदाजी करीत त्याने ६ षटकांमध्ये १/४६ अशी कामगिरी केली.[३६] श्रीलंका शामिल असलेल्या या तिरंगी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्याची २००३ च्या विश्वचषक खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघात निवड झाली. या स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध दिवस-रात्रीच्या सामन्यात ४ बळी घेउन इंग्लंडला विजय मिळवून दिला व स्वतः मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला. याच स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या शेवटच्या षटकात त्याने १२ धावा दिल्या व नंतर इंग्लंडचा संघ हा सामना हरला व स्पर्धेबाहेर पडला.
२००३ च्या मोसमात अँडरसन आपला पहिला कसोटी सामना खेळला. लॉर्ड्स मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध त्याने पदार्पणातच एका डावात ५ बळी मिळविले. इंग्लंडकडून आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये ही कामगिरी करणारा हा ४२वा खेळाडू आहे.[३७] यानंतरच्या लगेचच्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील एकदिवसीय सामन्यात त्याने ओव्हल मैदानावर हॅटट्रिक घेतली. इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा अँडरसन पहिलाच खेळाडू होय.[३८]
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अँडरसनला अपेक्षित इतके यश मिळाले नाही.[३९] यात त्याने ३९.८६ च्या सरासरीने १५ बळी घेतले.[४०] यातील ५ बळी त्याने पाचव्या सामन्यात एकाच डावात १०२ धावा देउन घेतले.[४१][४२] या सामन्यांमध्ये विशेषतः ग्रॅम स्मिथने त्यला चांगलेच झोडपले. त्याने अँडरसनच्या गोलंदाजीवर १७२ बॉलमध्ये १५७ धावा काढल्या आणि फक्त एकदाच अँडरसनकडून बाद झाला.[४३]
अँडरसनला या वर्षीचा क्रिकेट राइटर्स यंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार एकमुखाने मिळाला होता.[४४] त्याच सुमारास त्याला इंग्लंड बोर्डाने मध्यवर्ती कंत्राट देऊ केले.[४५] यानंतर लगेचच डाव्या गुडघ्याला दुखात झाल्याने त्याने बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली.[४६]
श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी अँडरसनची निवड झाली परंतु दुखातपींमुळे त्याला फक्त एक कसोटी सामना खेळता आला. यात त्याने ०/८५ अशी कामगिरी केली.
२००४-०५: वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, पाकिस्तान
संपादनदुखापतीतून बरे झालेल्या अँडरसनला वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कसोटी आणि एकदिवसीय मालिकांसाठी निवडले गेले होते[४७] परंतु कसोटी सामन्यांसाठी जेम्स कर्टली व इतर गोलंदाजांना कौल देत अँडरसनला राखून ठेवण्यात आले.[४८] एकदिवसीय सामन्यांमध्ये अँडरसनने प्रत्येकी ३७ धावा देत ४ बळी घेतले.[४९] या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात क्रिस गेलला बाद करून त्याने आपला ५०वा एकदिवसीय बळी मिळवला.[५०] यावेळी अँडरसनची एकूण बळींची संख्या २३.७८ च्या सरासरीने ५० इतकी होती.[५१]
२००४मध्ये वेस्ट इंडीजचा संघ परतीच्या दौऱ्यावर आला असताना सायमन जोन्सला झालेल्या दुखापतीमुळे अँडरसनला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली पण त्याने फारशी गोलंदाजी केली नाही. त्याचा आत्मविश्वास जणू हरविला होता असे वाटत असताना शेवटच्या सामन्यातील कामगिरीने तो पु्न्हा एकदा फॉर्ममध्ये[मराठी शब्द सुचवा] येत असल्याचे दिसले.[५२] त्याला झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर संघात स्थान मिळाले. झिम्बाब्वेमध्येही त्याची कामगिरी फारशी चमकून उठली नाही.
यानंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अँडरसन मुख्यत्वे राखीव खेळाडू होता. तिसऱ्या कसोटीमध्ये मिळालेल्या संधीचा त्याला फायदा घेता आला नाही व २/१४९ अशी कामगिरी केली. उरलेल्या मोसमात अँडरसन लँकेशायरकडून खेळला आणि २००५ अॅशेसच्या शेवटच्या सामन्यात त्याला संघात घेतले परंतु पॉल कॉलिंगवूडला खेळणाऱ्या ११मध्ये स्थान मिळाले.[५३]
पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या अँडरसनला पुन्हा एकदा डावलून शॉन उडॉल आणि ॲशली गाइल्स यांना खेळणाऱ्या संघात स्थान दिले गेले. अँडरसन या दौऱ्यावर एकही कसोटी सामना खेळला नाही.[५४] अँडरसनने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.५७ सरासरीने इंग्लंडकडून सर्वाधिक (अँड्रु फ्लिन्टॉफशी बरोबरी करीत ७ बळी घेतले.[५५]
२००६: भारत, ऑस्ट्रेलिया
संपादनदुखापतीतून बरा झालेला सायमन जोन्सचा समावेश भारताच्या २००६ दौऱ्यावर केला गेल्यामुळे अँडरसनला संघातून वगळण्यात आले.[५६] अँडरसनला वेस्ट इंडीजला जाणाऱ्या इंग्लंड अ संघात स्थान मिळाले.[५७] दौरा सुरू होण्याआधी काही दिवसांत इंग्लंडच्या भारतातील खेळाडूंना (सायमन जोन्स, मायकेल वॉन आणि मार्कस ट्रेस्कोथिक) झालेल्या दुखापतीमुळे अँडरसन, अॅलास्टेर कूक आणि ओवैस शाह यांना भारतात पाठविण्यात आले.[५८] अँडरसनला शेवटच्या कसोटी सामन्यात लियाम प्लंकेटच्या जागी घेण्यात आले. त्याने पहिल्या डावात ४० धावा देत ४ बळी घेतले.[५९]
या सामन्यानंतरच्या पाकिस्तान आणि श्रीलंका दौऱ्यांवर अँडरसनची निवड निश्चित होती परंतु पाठीमध्ये सूक्ष्म अस्थिभंग झाल्याने अँडरसनला पूर्ण मोसमातून माघार घ्यावी लागली. त्याच्या ऐवजी साजिद महमूदची वर्णी लागली. सगळ्या उन्हाळ्यात तो फक्त दोन काउंटी सामने खेळला.[२५][६०]
या दुखापतीमुळे जवळजवळ सहा महिने प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले नसताना सुद्धा अँडरसनची निवड २००६ अॅशेस आणि चँपियन्स चषकासाठी करण्यात आली.[६१] इंग्लंड ही कसोटी मालिका ०-५ अशी सडकून हरला. एकदविसीय मालिका सुरू असताना पुन्हा एकदा पाठीचे बारीक दुखणे सुरू झाल्याने अँडरसनला माघारी पाठविण्यात आले.[६२] त्याआधी ४ सामन्यांत त्याने २०.६२ च्या सरासरीने ८ बळी घेतले होते.[६३][६४]
२००७: विश्वचषक, वेस्ट इंडीज, भारत, श्रीलंका
संपादनऑस्ट्रेलियाचा दौरा संपायच्या आधीच परतलेल्या अँडरसनला २००७ विश्वचषक संघात स्थान मिळाले. स्पर्धा सुरू होण्याआधी काही दिवस सराव करीत असताना अँडरसनचे बोट मोडले. दुखऱ्या हातानेही खेळत अँडरसनने इंग्लंडसाठी विश्वचषकात गोलंदाजी केली व ४१.१२ सरासरीने ८ बळी घेतले.[६५]
विश्वचषकानंतर डंकन फ्लेचरच्या जागी पीटर मूर्सची इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यावर त्याने अँडरसनसह इतर इंग्लंडच्या खेळाडूंना इंग्लंडसाठी खेळत नसताना आपआपल्या काउंटीसाठी खेळण्याची मुभा दिली.[६६] अँडरसन वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी सामने खेळला नाही परंतु एकदविसीय सामन्यांमध्ये त्याला स्थान मिळाले. यातील दुसऱ्या सामन्यात रुनाको मॉर्टनशी टक्कर झाल्यावर त्यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे अँडरसनला त्याच्या सामन्याच्या मानधनापैकी ५०% रकमेचा दंड केला गेला.[६७] अँडरसनने या मालिकेत ३०.४० च्या सरासरीने ५ बळी घेतले.[६८]
२००७ च्या भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर मॅथ्यू हॉगार्डच्या जागी अँडरसनला स्थान मिळाले. अँडरसन या दौऱ्यावरील तीनही कसोटी सामने खेळला. रायन साइडबॉटम आणि क्रिस ट्रेमलेट हे इतर दोन जलदगती गोलंदाज होते.[६९] पहिल्याच कसोटीत त्याने आपला ५०वा कसोटी बळी (महेंद्रसिंग धोणी) मिळविला.[७०] अँडरसनचा हा १७वा कसोटी सामना होता.[७१] एकाच डावात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांचा बळी घेणारा अँडरसन पहिला इंग्लिश गोलंदाज होता. या दौऱ्यावर अँडरसने ३५.५७ च्या सरासरीने १४ बळी घेतले. यातील ५/४२ हे लॉर्ड्स सामन्यात होते.[७२] इंग्लंड ही मालिका हरला असतानाही त्याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला.[७३]
यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत अँडरसनने सर्वाधिक १४ बळी २२.५७ च्या सरासरीने घेतले.[७४] यांमध्ये गौतम गंभीरचा बळी त्याचा १००वा एकदिवसीय बळी होता.[७५]
सप्टेंबर २००७मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रवी बोपारा ऐवजी अँडरसनची निवड करण्यात आली.[७६] इंग्लड साखळी सामन्यांच्या पहिल्या फेरीनंतर बाहेर पडला. अँडरसनने चार सामन्यात ३४.०० सरासरीने फक्त ३ बळी घेतले.[७७]
श्रीलंकेच्या दौऱ्यावर अँडरसनने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८.२५ सरासरीने ४ बळी घेतले.[७८][७९] दौऱ्यावर असताना डाव्या घोट्याला दुखापत झालेली असतानाही[८०] त्याने कसोटी सामन्यांत भाग घेतला. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याच्या एका षटकात ६ चौकार मारले गेले होते.,[८१][८२] या सामन्यात १६७ धावा देउन फक्त दोन बळी मिळवल्यावर उरलेल्या सामन्यांतून अँडरसनला वगळण्यात आले व त्याच्याऐवजी स्टुअर्ट ब्रॉडने कसोट्यांमध्ये पदार्पण केले.[८३]
२००८: न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत
संपादन२००८ च्या न्यू झीलंड दौऱ्यावर अँडरसन २ टी२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळला. एकदीवसीय सामन्यांमध्ये अँडरसन निष्प्रभ होता. ६७.५० सरासरीने फक्त ४ बळी घेतल्यावर[८४] त्याला स्थानिक ऑकलंड एसेस संघासाठी खेळण्यास पाठविले गेले..[८५] याला न्यू झीलंडमधील अनेकांनी विरोध केला. त्यांना वाटले की अँडरसन न्यू झीलंडमध्ये खेळून आपले गमावलेले फॉर्म[मराठी शब्द सुचवा] परत मिळवेल.[८६]
दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत मॅथ्यू हॉगार्डला अनपेक्षितपणे वगळले जाउन त्याच्याऐवजी अँडरसनला संघात स्थान मिळाले. याच वेळी स्टीव हार्मिसनच्या जागी ब्रॉडला घेतले गेले. हा दुहेरी बदल म्हणजे इंग्लंडच्या गोलंदाजीच्या एक युगाचा अंत आणि दुसऱ्या युगाची नांदी समजला जातो.[८७][८८] या सामन्यात अँडरसनने ५/७३ आणि २/५७ अशी कामगिरी करीत इंग्लंडला १२६ धावांचा विजय मिळवून दिला..[८९] शेवटच्या सामन्यात मात्र त्याने फलंदाजांकडून १/१५३ असा चोप खाल्ला.[९०][९१]
बेभरवशाची कामगिरी टाळण्यासाठी अँडरसनने आपल्या गोलंदाजीच्या पवित्र्यात बदल करून पुन्हा एकदा २००३ च्या सुमारासचा पवित्रा अवलंबिला.
न्यू झीलंडच्या इंग्लंड दौऱ्यासाठी अँडरसनला संघात राखले गेले. यात त्याने १९.३१ च्या सरासरीने १९ बळी घेतले. एक मालिकेच हे अँडरसनचे सर्वाधिक बळी होते..[९२] त्याने पहिल्या दोन कसोट्यांमध्ये ५/१३० आणि ५/१३९ अशी कामगिरी केली.[९३] दुसऱ्या सामन्यात अँडरसनचा चेंडू डॅरिल फ्लिनच्या तोंडावर लागून त्याचा एक दात पडला. अँडरसनच्या आक्रमक गोलंदाजीत जेकब ओरामच्या शिरस्त्राणावर चेंडू लागला होता.[९४] असा मार दिल्याने आपल्याला फारसा आनंद झाला नाही असे अँडरसन म्हणला होता..[९५] शेवटच्या सामन्यात अँडरसनने स्टुअर्ट ब्रॉडसोबत ७६ घावांच्या भागीदारीत २८ धावा केल्या.[९६] याच बरोबर त्याने ९/९८ अशी गोलंदाजी करीत सामनावीर खिताब मिळवला.[९७] ही कामगिरी पाहून इंग्लंडच्या गोलंदाजी मार्गदर्शक ओटिस गिब्सन यांनी अँडरसनने आपला आत्मविश्वास वाढवला तर तो जागतिक दर्जाचा गोलंदाज होईल असे भाकित केले,[९८] यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत मात्र अँडरसन निष्प्रभ ठरला.[९९]
कारकीर्दीच्या या टप्प्यावर अँडरसनच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास आढळून येते की त्याला डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध सीमित यश मिळालेले होते. तोपर्यंत त्याने उजखोऱ्या फलंदाजांना सरासरी २९.११ धावा देउन ७० वेळा आउट केले होते परंतु डावखोऱ्या फलंदाजांविरुद्ध हे आकडे ५४.९४ आणि १९ असे फिके होते.[१००] यात २००३ च्या एका सामन्यात ग्रॅम स्मिथ आणि गॅरी कर्स्टेन या दोघांनी अँडरसनकडून २७६ धावा लुटल्या होत्या न्यू झीलँडच्या या दौऱ्यात यामध्ये काही प्रगती होउन त्याने २२ उजखोरे बळी २०.७७ आणि ५ डावखोरे बळी ३८.६० च्या सरासरीने घेतले होते.[१००] या दौऱ्याच्या शेवटी अँडरसनची एकूण आकडेवारी पाहता जुलै २००७ पूर्वीच्या १६ कसोट्यांमध्ये ४६ बळी ३८.३९ सरासरीने तर नंतरच्या ९ कसोट्यांमध्ये ४३ बळी ३०.५८ सरासरीने घेेत त्याने आपली प्रगती सुरू ठेवली होती.[१००]
या वर्षीच्या दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान अँडरसनने आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवली. हेडिंग्ले मैदानावरील दुसऱ्या कसोटी सामन्यातत्याने तिसऱ्या दिवशी नाइट वॉचमन म्हणून ३४ धावा केल्या. या दरम्यान डेल स्टाइनचे चेंडू त्याच्या मनगटावर आणि हेलमेटवर आदळले होते.[१०१]
या दौऱ्याच्या शेवटच्या कसोटीत अँडरसनने जॉक कॅलिसला २ धावांवर पायचीत करून आपला १०० वा कसोटी बळी मिळवला.[१०२] या सामन्या अंती अँडरसनने एकूण १०४ बळी ३४.५१ च्या सरासरीने मिळवले होते.[७१]
यानंतरचा इंग्लंडच्या भारत दौरा पूर्ण होऊ शकला नाही. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर चढवलेल्या भीषण हल्ल्यानंतर हा दौरा अर्धवट सोडून देण्यात आला.[१०३][१०४] यापूर्वी खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांत अँडरसनला एकही बळी मिळवता आला नाही.[१०५]
२००९: वेस्ट इंडीज
संपादनयानंतरच्या वेस्ट इंडीज दौऱ्याआधी मार्गदर्शक पीटर मूर्सची हकालपट्टी झाली आणि कर्णधारपदी केव्हिन पीटरसन ऐवजी अँड्रु स्ट्रॉसची निवड झाली.[१०६][१०७]
सेंट किट्समधील दोन सराव सामन्यांमध्ये अँडरसनची कामगिरी चमकली नाही व त्याला पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले.I[१०८][१०९] या सामन्यात इंग्लंडचा सडकून पराभव झाला. रायन साइडबॉटमचे फॉर्म घसरत असल्याचे पाहून अँडरसनला पुन्हा एकदा संघात त्याच्याऐवजी स्थान मिळाले. अँटिगामध्ये सर व्हिवियन रिचर्ड्स मैदानावर खेळला जाणारा हा सामना दुसऱ्याच षटकात थांबविण्यात आला. निकृष्ट दर्जाच्या मैदानावरून हा सामना दोन दिवसांनी अँटिगा रिक्रिएशन मैदानावर खेळवला गेला.[११०] येथे दोन्ही डावांत नाइट वॉचमन म्हणून अँडरसनने दिवस वाचवला परंतु पहिल्या डावात त्याला एकही बळी मिळाला नाही[१११] आणि दुसऱ्या डावात इंग्लंडला शेवटचा बळी न मिळवता आल्याने वेस्ट इंडीजने हा सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले.[११२]
विक्रम
संपादनपुरस्कार आणि बहुमान
संपादनइतर व्यवसाय आणि छंद
संपादनइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
साचा:इंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०१५
साचा:इंग्लंड संघ - क्रिकेट टी२० विश्वचषक, २०१०
- ^ Hogwood, Cameron (22 February 2023). "Anderson returns to top of ICC Test bowling rankings". Sky Sports. 1 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "England's 'evergreen' Anderson becomes oldest cricketer to top Test rankings". द टाइम्स ऑफ इंडिया. 22 February 2023.
- ^ "ICC – Test Match Player Rankings". Icc-cricket.com. 2021-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "James Anderson: England bowler set to join illustrious list of stars to compete at the elite level after turning 40". BBC Sport. 16 August 2022.
- ^ "James Anderson profile and biography, stats, records, averages, photos, and videos".
- ^ "England's greatest Test XI revealed". ICC. 30 July 2018. 22 December 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "James Anderson becomes third-highest wicket-taker in Tests". International Cricket Council. 4 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2021 रोजी पाहिले.
- ^ "Records – Test Matches – Individual Records (Captains, Players, Umpires) – Most Matches In Career". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "Records - England - One-Day Internationals - Most Wickets". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
- ^ "Records. Test matches. Partnership records. Highest partnerships by wicket". ESPNcricinfo. 16 November 2021 रोजी पाहिले.
- ^ Anderson, James; Gibson, Richard (2012). Jimmy: My Story. London: Simon & Schuster. pp. 12–13. ISBN 978-0857207050. Unknown parameter
|name-list-style=
ignored (सहाय्य) - ^ साचा:Cite podcast
- ^ a b Emma John (19 September 2003). "Lessons in life". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
- ^ "The Big Interview: Jimmy Anderson". Evening Standard. 1 June 2009. 31 January 2021 रोजी पाहिले.
- ^ Emma John (October 2007). "How the pin-up grew up". ESPNcricinfo. Retrieved on 10 December 2007.
- ^ Lancashire County Cricket Club (12 January 2009). "Jimmy's Finest Delivery". ESPNcricinfo. 16 June 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Retrieved on 12 January 2009.
- ^ "Suffolk v Lancashire Cricket Board, 2000 NatWest Trophy". CricketArchive. 2021-12-22 रोजी पाहिले.
- ^ a b "First-class bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Stats - James Anderson joins 1000 first-class wickets club". ESPNcricinfo. 6 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "James Anderson". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Hat-trick for Anderson as Essex stumble at Old Trafford". ESPNcricinfo. 14 May 2003. Retrieved on 26 May 2008.
- ^ Andrew Miller (14 May 2004). "Anderson and Keedy take Lancashire top". ESPNcricinfo. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Cooley backs Anderson for Pakistan". ESPNcricinfo. 28 September 2005. Retrieved on 30 May 2008.
- ^ "ListA bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 30 May 2008.
- ^ a b "Anderson out for two months". ESPNcricinfo. 2 February 2006. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Cork haul overshadows Anderson". ESPNcricinfo. 21 September 2006. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Anderson included in Lancashire squad". ESPNcricinfo. 17 September 2006. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Harmison available for season finale". ESPNcricinfo. 1 September 2008. Retrieved on 1 September 2008.
- ^ "Test bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
- ^ ESPNcricinfo staff (24 April 2009). Big wins for Nottinghamshire and Lancashire. ESPNcricinfo. Retrieved on 26 April 2009.
- ^ "First-class bowling for each team by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
- ^ "List A bowling for each team by James Anderson". CricketArchive. Retrieved on 26 April 2009.
- ^ "James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
- ^ "ListA bowling in each season by James Anderson". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
- ^ Andrew Miller (18 April 2008). "Anderson seeks consistency in England comeback". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ "Australia v England VB Series 2002/03; Melbourne Cricket Ground 15 December 2002 (50-over match) (day/night)". CricketArchive. Retrieved on 29 May 2008.
- ^ "1st Test: England v Zimbabwe at Lord's, May 22–24, 2003". ESPNcricinfo. 13 December 2011 रोजी पाहिले.
- ^ Andrew Miller (20 June 2003). "Anderson and Trescothick batter Pakistan to defeat". ESPNcricinfo. Retrieved on 4 September 2008.
- ^ Freddie Auld (6 August 2003). "Don't panic!". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
- ^ "JM Anderson – ODI Batting – Career summary". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
- ^ "South Africa in England Test Series, 2003 – England averages". ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
- ^ Andrew Miller (6 August 2003). "Into the hands of fate". ESPNcricinfo. Retrieved on 16 May 2008.
- ^ Rob Smyth (9 September 2003). "As the dust settles ..." ESPNcricinfo. Retrieved on 28 May 2008.
- ^ "Anderson voted Young Cricket of the Year". ESPNcricinfo. 15 August 2003. Retrieved on 28 May 2008.
- ^ "Anderson, Flintoff and Collingwood awarded central contracts". ESPNcricinfo. 11 September 2003. Retrieved on 28 May 2008.
- ^ "Anderson to miss Bangladesh Tests". ESPNcricinfo. 25 September 2003. Retrieved on 28 May 2008.
- ^ "England name unchanged squad for Windies tour". ESPNcricinfo. 7 January 2004. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Anderson waits for his opening". ESPNcricinfo. 22 April 2004. Retrieved on 29 May 2008.
- ^ "England in West Indies, 2003–04 One-Day Series Averages". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
- ^ "a15876, o2127: West Indies v England, England in West Indies 2003/04 (7th ODI)". CricketArchive. Retrieved on 21 December 2008.
- ^ "JM Anderson: One-Day Internationals – Bowling analysis, cummulative". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
- ^ Andrew Miller (21 August 2004). "Anderson shines on a golden day". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
- ^ Andrew McGlashan (9 December 2005). "Anderson learning a tough lesson". ESPNcricinfo. Retrieved on 26 June 2008.
- ^ Andrew Miller (28 November 2005). "Vaughan could prove the difference". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
- ^ "England in Pakistan, 2005–06 One-Day Series Averages". ESPNcricinfo. Retrieved on 21 December 2008.
- ^ "Anderson loses Test place as Jones returns". ESPNcricinfo. 13 January 2006. Retrieved on 21 December 2008.
- ^ "Anderson called up for England A tour". ESPNcricinfo. 27 January 2006. Retrieved on 21 December 2008.
- ^ "Cook and Anderson fly to India". ESPNcricinfo. 25 February 2006. Retrieved on 21 December 2008.
- ^ John Stern (20 March 2006). "Anderson's resurgence". ESPNcricinfo. Retrieved on 21 September 2008.
- ^ "Mahmood and Lewis earn call-up". ESPNcricinfo. 8 May 2006. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Anderson set for Glamorgan loan". ESPNcricinfo. 15 September 2006. Retrieved on 29 May 2008.
- ^ "Anderson builds up to bowling". ESPNcricinfo. 15 February 2007. Retrieved on 31 May 2008.
- ^ "Anderson cool over back stiffness". ESPNcricinfo. 25 January 2007. Retrieved on 31 May 2008.
- ^ "Commonwealth Bank Series, 2006–07 Averages". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ "England delay Anderson decision". ESPNcricinfo. 15 March 2007. Retrieved on 26 June 2008.
- ^ Andrew McGlashan (22 May 2007). "Moore's fresh outlook". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ "Anderson fined after Morton clash". BBC. 5 July 2007. Retrieved on 22 August 2008.
- ^ "NatWest Series [West Indies in England], 2007". ESPNcricinfo. Retrieved on 22 August 2008.
- ^ Andrew McGlashan (24 July 2007). "The drinks are on Jimmy". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ "t1840, f49898: England v India, India in British Isles 2007 (1st Test)". CricketArchive. Retrieved on 21 December 2008.
- ^ a b "JM Anderson: Test matches – Bowling analysis, cumulative". Retrieved on 21 December 2008.
- ^ Andrew McGlashan (21 July 2007). "Zaheer gives India hope after Anderson's haul". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ Andrew Miller (14 August 2007). "The road to redemption". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ Mathew Varghese (10 September 2007). "The Bell factor and India's bowling worries". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ "o2611, a18335: England v India, India in British Isles 2007 (1st ODI)". CricketArchive. Retrieved on 21 December 2008.
- ^ Andrew McGlashan (7 September 2007). "Anderson replaces Bopara for Twenty20". ESPNcricinfo. Retrieved on 31 May 2008.
- ^ "Most wickets: ICC World Twenty20, 2007/08". ESPNcricinfo. 12 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Retrieved on 27 December 2008.
- ^ Andrew Miller (10 October 2007). "Collingwood's men confound expectations". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ "England in Sri Lanka ODI Series, 2007/08". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ Andrew Miller (30 November 2007). "Vaughan keeps his cards close". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ Andrew McGlashan (1 December 2007). "England's bowlers take the honours". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ Andrew McGlashan (3 December 2007). "Sri Lanka build a lead on Murali's record day". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ "England in Sri Lanka Test Series – 1st Test Sri Lanka v England". ESPNcricinfo. Retrieved on 2 June 2008.
- ^ "England in New Zealand ODI Series, 2007/08". ESPNcricinfo Retrieved on 3 June 2008.
- ^ Andrew Miller (5 March 2008). "Anderson links up with Auckland". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ "Larsen slams Anderson deal". ESPNcricinfo. 6 March 2008. Retrieved on 3 June 2008.
- ^ Andrew Miler (12 March 2008). "Harmison and Hoggard axed by England". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ Andrew Miler (14 March 2008). "Many thanks to Auckland". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ Will Luke (14 March 2008). "Anderson five puts England in control". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ Andrew Miller (26 March 2008). "Sidebottom's transformation". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ "England in New Zealand Test Series – 3rd Test New Zealand v England". ESPNcricinfo. Retrieved on 3 June 2008.
- ^ "New Zealand in England Test Series, 2008". ESPNcricinfo. Retrieved on 8 June 2008.
- ^ Will Luke (16 May 2008). "England make spirited response to New Zealand's 277". ESPNcricinfo. Retrieved on 8 June 2008.
- ^ Will Luke (23 May 2008). "Taylor responds in kind to England's aggression". ESPNcricinfo. Retrieved on 8 June 2008.
- ^ "Flynn injury disconcerts Anderson". BBC. 23 May 2008. Retrieved on 8 June 2008.
- ^ Jamie Lillywhite (6 June 2008). "Kiwis reeling after Anderson haul". BBC. Retrieved on 8 June 2008.
- ^ "England v New Zealand 3rd Test report". BBC. 8 June 2008. Retrieved on 8 June 2008.
- ^ "England v New Zealand 3rd Test reaction". BBC. 8 June 2008. Retrieved on 8 June 2008.
- ^ "NatWest Series [New Zealand in England], 2008". ESPNcricinfo. Retrieved on 22 August 2008.
- ^ a b c S Rajesh (13 June 2008). "Splendid Anderson and his Achilles heel". ESPNcricinfo. Retrieved on 22 August 2008.
- ^ Andrew McGlashan (21 July 2008). "Ballsy batting, and a different sort of rearguard". ESPNcricinfo. Retrieved on 3 September 2008.
- ^ "f50678, t1885: England v South Africa, South Africa in England 2008 (4th Test)". CricketArchive. Retrieved on 21 December 2008.
- ^ Bull, Andy; Ashdown, John (27 November 2008). "England to fly home from India but Test series will go ahead". The Guardian. London. 17 July 2024 रोजी पाहिले. Unknown parameter
|name-list-style=
ignored (सहाय्य) - ^ Hopps, David (2009). "India v England, 2008–9". In Berry, Scyld (ed.). Wisden Cricketers' Almanack 2009 (146th ed.). London. pp. 1105–1107, 1110–1111. ISBN 978-1905625161.
- ^ Hobson, Richard (2009). "India v England – One-Day International Reports". In Berry, Scyld (ed.). Wisden Cricketers' Almanack 2009 (146th ed.). London. pp. 1112–1117. ISBN 978-1905625161.
- ^ "Pietersen insists he is blameless". BBC News. 11 January 2009. 14 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Strauss to lead West Indies tour". BBC News. 7 January 2009. 14 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Tour match: St Kitts Invitational XI v England". BBC Sport. 14 May 2013 रोजी पाहिले.
- ^ "Tour match: West Indies A v England". BBC Sport. 14 May 2013 रोजी पाहिले.
- ^ "Test abaondoned over poor outfield". BBC News. 13 February 2009. 14 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "3rd Test: West Indies v England at St John's, Feb 15–19, 2009". ESPNcricinfo. 18 July 2011 रोजी पाहिले.
- ^ "West Indies show hitherto hidden steel". ESPNcricinfo. 14 July 2013 रोजी पाहिले.