कृष्ण जन्माष्टमी

श्रीकृष्ण जन्मोत्सव,प्रमुख हिंदू सण
(कृष्णजन्म सोहळा या पानावरून पुनर्निर्देशित)

कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे.[] श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेकंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.[][]

आई यशोदा सोबत कृष्ण . चित्रकार: राजा रविवर्मा
Janmashtami (es); જન્માષ્ટમી (gu); زَرمِ ستَم (ks); Кришна-джанмаштами (ru); Janmashtami (de); 黑天诞辰 (zh); कृष्णाष्टमी (ne); جنم اشٹمی (ur); Janmastami (sv); Джанмаштамі (uk); Кришна-Джанмаштами (tt); कृष्णजन्माष्टमी (sa); जन्माष्टमी (hi); కృష్ణాష్టమి (te); ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੈਅੰਤੀ (pa); জন্মাষ্টমী (as); Janmashtami (eo); கிருஷ்ண ஜெயந்தி (ta); Janmashtami (it); কৃষ্ণজন্মাষ্টমী (bn); Janmashtami (fr); कृष्ण जन्माष्टमी (mr); କୃଷ୍ଣ ଜନ୍ମାଷ୍ଟମୀ (or); Krysznadźanmasztami (pl); เทศกาลกฤษณชันมาษฏมี (th); Krišna Džanmaštami (lt); Krishna Janmashtami (nb); Janmashtami (ro); Krishna Janmashtami (ca); Krishna Janmashtami (uz); Krishna Janmashtami (id); Krisjna-djanmasjtami (nn); ശ്രീകൃഷ്ണ ജന്മാഷ്ടമി (ml); Janmashtami (nl); クリシュナ・ジャンマシュタミ (ja); कृष्ण जन्माष्टमी (mai); ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ (kn); जन्माष्टिमी (bho); Krishna Janmashtami (en); کرشن جنم اشٹمی (pnb); जन्माष्टमी (awa); ᱡᱚᱱᱢᱟᱥᱴᱚᱢᱤ (sat) festività induista (it); সনাতনধর্মীয় উৎসব (bn); કૃષ્ણના જન્મ નિમિત્તે ઉજવાતો તહેવાર (gu); भगवान कृष्णको जन्मदिन (ne); वार्षिक हिंदू त्योहार जो भगवान कृष्ण के जन्म का जश्न मनाता है (hi); ശ്രീകൃഷ്ണന്റെ ജന്മദിവസം (ml); ಹಿಂದೂ ದೇವತೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಜನನದ ಕಾರಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ವಾರ್ಷಿಕ ಸ್ಮರಣಾರ್ಥ (kn); festa tradicional de l'hinduisme (ca); श्रीकृष्ण जन्मोत्सव,प्रमुख हिंदू सण (mr); శ్రీ కృష్ణుని జన్మదినం (te); ପ୍ରଭୁ ଶ୍ରୀକୃଷ୍ଣଙ୍କ ଜନ୍ମଦିନ (or); কৃষ্ণৰ জন্মতিথি উপলক্ষে উদযাপিত হিন্দু উৎসৱ (as); Annual commemoration in India on account of birth of the Hindu deity Lord Krishna (en); 印度教节日 (zh); ஆண்டு தோறும் தமிழ் மாதம் ஆவணி, அஷ்டமி திதி, ரோகிணி நட்சத்திரம் அன்று கிருஷ்ணன் பிறப்பு பண்டிகை. (ta) Krishna Janmashtami, Krishna Jayanti (ro); জন্মাষ্টমী (bn); കൃഷ്ണാഷ്ടമി, ഗോകുലാഷ്ടമി, അഷ്ടമി രോഹിണി, ശ്രീകൃഷ്ണ ജയന്തി, ജന്മാഷ്ടമി (ml); Крішна-джанмаштамі (uk); गोकुलाष्टमी (hi); जन्माष्टमी, गोकुळ अष्टमी, कृष्णजन्म सोहळा, कृष्णजन्माष्टमी (mr); Krishna Janmashtami, Krishna Jayanti (de); କୃଷ୍ଣାଷ୍ଟମୀ, ସାତମ୍ ଆଠମ୍, ଗୋକୁଳାଷ୍ଟମୀ, ଅଷ୍ଟମୀ ରୋହିଣୀ, ଶ୍ରୀକୃଷ୍ଣ ଜୟନ୍ତୀ, ଶ୍ରୀ ଜୟନ୍ତୀ (or); Janmashtami, Krishna Jayanti (en); Krishna Janmashtami, Krishna Jayanti (eo); 黑天神誕生日 (zh); గోకులాష్టమి (te)
कृष्ण जन्माष्टमी 
श्रीकृष्ण जन्मोत्सव,प्रमुख हिंदू सण
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारउत्सव
स्मरणोत्सव
स्थान भारत, बांगलादेश, नेपाळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार, श्रावण या महिन्यात; तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो. []

हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. [] भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. [] [] कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो. []

बाळ कृष्ण
कृष्ण बलराम

महत्त्व

संपादन
 
कृष्णाला नदीच्या पलीकडे घेऊन जाणारा वासुदेव

कृष्ण हा देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडीया वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते (ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट आणि ३ सप्टेंबरला हा दिवस येतो). [] []

कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता, लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते, सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता. [१०] जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनकदुंदुभी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्प शेष बलरामदेखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता . ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून, कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. [११] कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, कृष्णाच्या बाळाच्या रूपाला (बाळकृष्ण)आंघोळ घालण्यात येते, कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे. [११]

भारताच्या विविध प्रांतात

संपादन

हा उत्सव भारतात सर्वत्र होतो.हा सण विशेषतः मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैर-सांप्रदायिक समुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो. याशिवाय भारतातील इतर सर्व राज्ये आणि उमरकोट, थारपारकर, मीरपूरखास आणि संपूर्ण सिंध पाकिस्तानमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. [] [१२]

गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.[१६]गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.

 
रासलीला चित्र

मध्य प्रदेशात [१७]आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.[१८] याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.[१३]

  • मणिपूर येथे दिवसभर उपवास करून रात्री कृष्णाची पूजा केली जाते. हनुमान मंदिर, गोविंदजी मंदिर येथे विशेष पूजा होते, जत्रा भरते, लोक उत्सवाचा आनंद घेतात.[१९]
मुख्य लेख: व्रत

अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.[२०] अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार[२१] करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.[१८] पू जा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे.वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो.[२२] कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.

गोपाळकाला/दहीहंडी

संपादन
मुख्य लेख: गोपाळकाला

उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.[२३]महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.[२४] हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.[२५] काला म्हणजे एकत्र मिळविणे.[२६]
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबूआंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.[२७] हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. [१८] गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.[१८]

बलराम जयंती

संपादन

जन्माष्टमीच्या आधी, म्हणजे श्रावण वद्य षष्ठीला बलराम जयंती असते.[२८]

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Varadpande, Manohar Laxman (1982). Krishna Theatre in India (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9788170171515.
  2. ^ Sharma, Aruna (2011-06). The Heartland of Divinity: Fairs and Festivals of Madhya Pradesh (इंग्रजी भाषेत). SCB Distributors. ISBN 9788183282222. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Verma, Priyanka (2014-03-07). Krishna Janmashtami (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5083-548-7.
  4. ^ a b c James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: A–M. The Rosen Publishing Group. pp. 314–315. ISBN 978-0823931798.
  5. ^ J. Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. p. 396. ISBN 978-1-59884-205-0.
  6. ^ Edwin Francis Bryant (2007). Sri Krishna: A Sourcebook. Oxford University Press. pp. 224–225, 538–539. ISBN 978-0-19-803400-1.
  7. ^ भट्ट, विनय (2022-08-19). "श्रीकृष्ण जन्माष्टमी आज: पूजन के लिए दिनभर में पांच मुहूर्त, वृंदावन, द्वारिका और पुरी के पुजारियों ने बताई जन्माष्टमी पूजा की आसान विधि". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2022-08-19 रोजी पाहिले.
  8. ^ Cynthia Packert (2010). The Art of Loving Krishna: Ornamentation and Devotion. Indiana University Press. p. 169. ISBN 978-0-253-00462-8.
  9. ^ Charles R. Brooks (2014). The Hare Krishnas in India. Princeton University Press. p. 250. ISBN 978-1-4008-5989-4.
  10. ^ Pavan K. Varma (2009). The Book of Krishna. Penguin Books. pp. 7–11. ISBN 978-0-14-306763-4.
  11. ^ a b Constance A Jones (2011). J. Gordon Melton (ed.). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-CLIO. p. 459. ISBN 978-1-59884-206-7.
  12. ^ "In Pictures: People Celebrating Janmashtami in India". International Business Times. 10 August 2012. 10 August 2012 रोजी पाहिले.
  13. ^ a b Growse, F. S. Mathura-Brindaban-The Mystical Land Of Lord Krishna (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171824434.
  14. ^ Desai, Anjali H. (2007). India Guide Gujarat (इंग्रजी भाषेत). India Guide Publications. ISBN 978-0-9789517-0-2.
  15. ^ "Google Books". books.google.co.in. 2018-08-03 रोजी पाहिले.
  16. ^ Deśiṇgakara, Viṭhṭhala Śrīnivāsa (1977). Vrata-śiromaṇī. Śā.Vi. Deśiṅgakara.
  17. ^ (India), Madhya Pradesh (1994). Madhya Pradesh: District Gazetteers (इंग्रजी भाषेत). Government Central Press.
  18. ^ a b c d जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड २. भारतीय संस्कृतीकोश मंडळ प् प्रकाशन.
  19. ^ Lisam, Khomdan Singh (2011). Encyclopaedia Of Manipur (3 Vol.) (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 978-81-7835-864-2.
  20. ^ Deśiṇgakara, Viṭhṭhala Śrīnivāsa (1977). Vrata-śiromaṇī. Śā.Vi. Deśiṅgakara.
  21. ^ Dwivedi, Dr Bhojraj. Sanatan Pooja Vidhi (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788128814167.
  22. ^ उपाध्ये, काशिनाथ. धर्मसिंधु.
  23. ^ "Janmashtami 2022: श्रीकृष्ण जन्माष्टमी पर दुल्हन की तरह सजे कृष्ण के धाम, बिखर रही अलौकिक छटा, देखें वीडियो". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-08-19 रोजी पाहिले.
  24. ^ "दहीहंडीचा सण आणि कायद्याची चौकट..." २२.८. २०१९. 2019-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२.८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  25. ^ "गोविंदा आला रे आला…". ५. ८. २०१६. २२. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  26. ^ Dandekar, Vaidya Suyog (2013-09-01). Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti. Sukrut Prakashan, Pune. ISBN 9788190974691.
  27. ^ "Gopalkala - Marathi Recipe". २२. ८. २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  28. ^ मिश्रा, आरती (२१. ८. २०१९). "हल षष्ठी 2019: संतान की लंबी उम्र की कामना से करें व्रत, शाम के समय इस विधि से करें पूजन, पढ़ें व्रत कथा..." 2019-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१. ८. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)