एखाद्या धान्यापासून किंवा कडधान्यापासून लाह्या बनवल्या जातात. विशेषतः मका किंवा ज्वारीपासून बनवलेल्या लाह्या खाल्ल्या जातात. धान्याचे किंवा कडधान्याचे दाणे भिजवून खूप तापवलेल्या भट्टीतल्या वाळूत भाजले की दाणा फुटतो व त्याची लाही बनते. या लाह्या वजनाने हलक्या असतात. याचा उपयोग खाद्यपदार्थात केला जातो. काही हिंदू व्रतवैकल्यांमध्येही यांचा उपयोग होतो.
नागपंचमीला हरभऱ्यापासून फुटाणे करणे म्हणजेच हरभऱ्याची लाही करणे
तसेच तांदुळाच्या साळीपासून बनवलेल्या लाहीला साळीच्या लाह्या म्हणतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेवैद्य दाखवण्यासाठी साळीच्या लाह्या वापरल्या जातात. पॉप क‍‌ॉर्न म्हणजे मक्याची लाही.
हल्ली गहू, वाटाणा याच्याही लाह्या बाजारात मिळतात

मक्याच्या लाह्या
साळीच्या लाह्या