उपवास

हिंदू धर्मातील व्रत
उपवास अल्प आहार

प्रस्तावना

संपादन

उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी आहे.उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणै: सह| उपवास:स विद्न्येयः सर्वभोग विवर्जित:||अन्नपाणी वर्ज्य करून राहणे म्हणजे उपवास होय. सामान्यपणे उपवास याचा अर्थ हलका व मित आहार घेणे असा होतो.[]बृहदारण्यक उपनिषदात ईश्वराप्रत जाण्याचे जे विविध उपाय सांगितले आहेत त्यापैकी उपवास हाही एक आहे असे मानले जाते.उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे असे गौतम धर्मसूत्रात सांगितले आहे.यज्ञ कर्माला उपयुक्त असे धान्य शिजवून त्याचा अल्पाहार घेणे असा उपवास याचा अर्थ काठक गृह्यसूत्रात सांगितला आहे.तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा श्रेष्ठ असे महाभारत या ग्रंथात सांगितले आहे. आषाढी एकादशी,महाशिवरात्री, हरितालिका, रामनवमी अशा विविध व्रतांमधेही उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे.[]

सामाजिक आशय

संपादन

कमी दर्जाचे अन्न-धान्य भक्षण करून राहणे याला उपवास म्हणतात. रोज आपण जे अन्न-धान्य खातो, त्याच्या सतत वापराने, त्या विशीष्ट धान्याच्या पुरवठ्यावर ताण पडतो. तो ताण कमी करण्यासाठी, एका विशिष्ट दिवशी वऱ्याचे तांदुळ, भगर वा तत्सम किंवा फळफळावळे या उपवस्तु खाण्यात येतात. जैन धर्माने उपवासाला विशेष महत्त्व दिले. त्यांनी सरसकट सर्वांनाच उपवासा करण्याचा धार्मिक आदेश दिल्याने समाजाच्या सर्व सत्रात उपवास संल्प्ना पोचली असे दिसते.[] उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे असे मानले जाते.

फायदे

संपादन
 
उपवासाची बटाटा कचोरी

आयुर्वेद असे सांगते की लंघन (उपवास) हा श‍रीराला निरोगी करतो. उपवासामुळे श‍रीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो.[]ज्याप्रमाणे, आपण रजेच्या दिवशी वेळ असल्यामुळे घराची साफसफाइ करतो त्याप्रमाणे, या कमी ताणाच्या वेळेत श‍रीरही साफसफाइ करते व दोष बाहेर काढून टाकते. आपल्या श‍रीरात या साठी यंत्रणा आहे. सबब, आठवड्यातुन एकदा उपवास, हा शरीर शुद्धीकारक व आपल्यास हितकारक आहे.अल्प आहार,शर्करायुक्त कंदमूळ खाणे(बटाटे,रताळे),दूध अथवा दुधापासुन केलेले पदार्थ यांचे सेवन त्याजोडीने,ईश्वरभक्ति,चांगले विचार,भजन,कीर्तन,कमी वा चांगलेच बोलणे,सत्संग या गोष्टी उपवास काळात करण्याचा उपयोग होतो.

निषिद्ध

संपादन

उपवासादरम्यान भरपुर थंड पाणी पिणे, दिवसा झोप, मैथुन,उच्च शारीरिक कष्टाची कामे,हिरव्या भाज्या खाणे, कुसंगती,वाईट विचार,शिव्या-शापयुक्त बोलणे,पोटभर खाणे हे टाळावे.

  1. ^ "उपवास". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2024-06-27 रोजी पाहिले.
  2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  3. ^ भारतीय संस्कृती कोश खंड पहिला
  4. ^ टीम, एबीपी माझा वेब (2023-02-09). "उपवास केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? वाचा सविस्तर माहिती". marathi.abplive.com. 2024-06-27 रोजी पाहिले.