शिव्या
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा प्रभाव दिसून येतो. साहित्यात किंवा लिखित स्वरूपात शिव्या उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या भ या शब्दापासून सुरू होतात म्हणून कोणी यास भकार शब्द असेही म्हणतात.
रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते.
प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे.
शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषतः या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हणले जाते.
प्रकार
संपादनधर्म व जातिवाचक शिव्या
संपादनभारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते.[ संदर्भ हवा ]
कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या हा विभाग पहा.'
त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे
संपादनगाढव, नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चावट, कृतघ्न, बावळट, मूर्ख, बेअक्कल, पागल
बोंब
संपादनकुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरुद्ध बाजूने (तळहाताची विरुद्ध बाजू) सुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते). बोंब मारणे आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या "शिमगा" सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या होळी भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे.
अध्याहृत अर्थावर आधारित शिव्या
संपादन- साला
'साला' हा वस्तुतः 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ'; बहिणीचा नवरा' नव्हे.) या अर्थीचा हिंदी भाषेतील शब्द आहे. 'बायकोचा भाऊ' अशाच अर्थाने याचेच 'साळा' हे रूप मराठी भाषेतही काही भागांत/काही समाजांत प्रचलित आहे.
हा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून का गणला जातो याचे एक सुंदर स्पष्टीकरण श्री. खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या पुस्तकात आढळते.
थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणाऱ्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो.
महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो.
उदा.: चित्रपटातील एक गीत-पप्पू कांट डान्स साला
मराठी साहित्यात शिव्यांचा वापर
संपादनसंत साहित्यातील शिव्यांचा वापर
संपादनमराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.
उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।।
अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।।
लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।।
काय केले रांडलेका। तुला राजी नाही तुका।। २४७८
- रांडलेका हा शब्द अनौरस {विधवेची (वैधव्यानंतर जन्मलेली)} संतती या अर्थी वापरला आहे.
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥
तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥
जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥
थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७॥
बाह्य दुवे
संपादन- संस्कृत भाषेतील शिव्या एक खमंग चर्चा Archived 2007-09-01 at the Wayback Machine.