व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इत्यादींसाठी विशिष्ट नीतिनियमांनी करावयाचे आचरण.[] व्रत हे विशिष्ट काळासाठी, विशिष्ट तिथीस, विशिष्ट वाराला, विशिष्ट महिन्यात किंवा विशिष्ट पर्वाला आचरले जाते. व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात.

ऋग्वेदानुसार या शब्दाचा अर्थ 'आज्ञा', 'धार्मिक आचरण', 'उपासना पद्धती' या अनुषंगाने येतो.'ब्राह्मण' ग्रंथांनुसार 'धार्मिक क्रिया', 'आहार निर्बंध', 'विशिष्ट वर्तन', उपवास आदी होतो. धर्मसिंधू या ग्रंथात 'पूजा आदींचा अंतर्भाव असणारा धार्मिक विधी' असे नमूद केले गेले आहे.

व्रत शब्दात वृ असा संस्कृत धातू असून त्याचा अर्थ निवड करणे, अवरोध करणे असा होतो. व्रत-वैकल्ये असा जोडशब्द असून व्रताच्या आचरणाने विकलता येणे अपेक्षित असते.[]

प्रकार

संपादन
  • (काम्य) व्रते - मनातील एखादी इच्छा वा कामना पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारी व्रते.उदाहरणार्थ - गोपालसंतान व्रत इत्यादी.
  • निष्काम (अकाम्य) व्रते - मनात कोणतीही इच्छा वा कामना न ठेवता, केवळ आचरण म्हणून करण्यात येणारी व्रते.
  • कायिक - ज्या व्रतात फक्त शरीराचाच वापर करतात.ज्याने शरीरशुद्धी होते असे व्रत. उदा० कार्तिकस्नान, योगासने[]
  • मानसिक - ज्या व्रतात मनाचा वापर होतो असे व्रत. याने मानसिक बळ मिळते. मनाची ताकद वाढते.उदा० जप, मानसपूजा, मौन []
  • वाचिक - वाचेचा/वाणीचा वापर करून करण्यात येणारे व्रत.- स्तोत्र पठण- वाचादोष काढण्यासाठी, शुद्ध वाणीसाठी.[]
  • असिधारा व्रत - पतिपत्‍नींनी झोपताना मधे तलवारीचे पाते ठेवून झोपणे. (असि म्हणजे तलवार)

व्रतांच्या देवता

संपादन

हिंदू धर्मात वेगवेगळ्या व्रतांच्या वेगवेगळ्या आराध्य देवता असतात.या देवतांची पूजा व्रतामध्ये केली जाते. त्या व्रताच्या वेळी त्या विशिष्ट देवतेची कथा वाचली जाते.[]

काही व्रते आणि त्यांच्याबद्दलच्या समजुती

संपादन
  • गणेश व्रत (संदर्भ - श्री गणेश कोश, संपादक- अमरेंद्र गाडगीळ)
  • गणेश चतुर्थी व्रत : हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात, कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे. गणेश चतुर्थी व्रत हे गाणपत्य संप्रदायाचे एक विशेष व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे एक महिन्याचे हे व्रत असते. नदीकिनारी जाऊन पार्थिव म्हणजे मातीचा गणेश तयार करून त्याची पूजा करावी व नंतर लगेच त्याचे विसर्जन करावे असे मूळ व्रत आहे.
  • जोगेश्वरी मातेचे व्रत : जोगेश्वरी मातेचा नवाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
  • मंगळागौर : नववधूने सुखी संसारासाठी करावयाचे पार्वतीचे व्रत आहे. लग्न झाल्यावर सासरी नववधू पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे मंगळागौरीचे व्रत करते.
  • महालक्ष्मी व्रत : हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.
  • मासिक व्रते : व्रताचरण केल्याने जीवनतील संकटांचा, आधीव्याधींचा, दुःखांचा निरास होऊन सुखाचा लाभ होतो.
  • वैभवलक्ष्मी व्रत : सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत]] केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.[]
  • शुभ्र बुधवार व्रत : बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी.
  • संतोषीमाता व्रत : जगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात (कोणत्या?) उल्लेख आहे.[]
  • श्री सत्यदत्तव्रत : योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्ठत्व व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.
  • श्रीसत्याम्बा व्रत : श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदंबाच होय.
  • सरस्वती व्रत : सरस्वती व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे.
  • सोळा सोमवार व्रत : हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे.

श्रावण महिन्यात व चातुर्मासात करावयाची काही व्रते[]

संपादन
  • अयाचित भोजन : ताटात वाढलेलेच फक्त खाणे, पुन्हा वाढून न घेणे किंवा पूर्वकल्पना न देता एखाद्याच्या घरी भोजनाच्या वेळी जाणे, तिथे भोजन मिळाल्यास ते सेवन करणे अथवा उपवास करणे.[]
  • एकभुक्त व्रत : दिवसात फक्त एक वेळीच जेवणे. या व्रतात सूर्यास्तानंतर बहुधा जेवत नाहीत.
  • नक्तव्रत : या व्रतात फक्त सूर्यास्तानंतरच एकवेळा जेवण घेतात.
  • फलाहार : जेवणाेवजी फक्त फळेच खाणे.
  • मौन भोजन : जेवताना मौन राखणे, शांत व प्रसन्न वृत्तीने भोजन करणे व पदार्थाच्या चवीची कोणतीही तक्रार न करणे.

[१०]

रमझान महिन्यात करावयाचे व्रत

संपादन
 
रमझान व्रत
  • रोजा : या व्रतात दिवसभर तोंडात पाणीही न घेता उपवास करतात. सूर्योदयापूर्वी आणि रात्र पडल्यावर भरपूर जेवतात.[११]

जैन व्रते

संपादन
  • संथारा व्रत - आमरण उपोषण करणे. हे व्रत जैन साधू आयुष्य संपविण्यासाठी करतात.[१२]

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "व्रते". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ Pokhriyal, Ramesh (2020). Inspiration for the World (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 978-93-5296-681-3.
  3. ^ a b Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-617-5.
  4. ^ Sharma, Rajesh. Vrat Parva Aur Tyohar (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-935-4.
  5. ^ Hindu Vrat Kathayen (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. 2003. ISBN 978-81-288-0375-8.
  6. ^ Sharma, Rajesh. Vrat Parva Aur Tyohar (हिंदी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-935-4.
  7. ^ Rājā Kesarasiṃha kā asalī khyāla (हिंदी भाषेत). Kalyāṇamala. 1977.
  8. ^ "श्रावण मासारंभाला द्या अशा खास शुभेच्छा आणि करा शंकराचे नामस्मरण". महाराष्ट्र टाइम्स. 2022-07-30 रोजी पाहिले.
  9. ^ Sadaiv, Shashikant (2020-01-01). Vrat-Upvas Ke Dharmik Aur Vaigyanik Adhar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-87980-55-6.
  10. ^ तरुण भारत नागपूर, ई-पेपर दि. ०७/०८/२०१३ पान क्र. ५
  11. ^ "Ramadan 2022 timings: Here are countries with the longest Ramzan fast". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2022-08-03 रोजी पाहिले.
  12. ^ Sachdeva, G. S. (2020-09-23). Sacred and Profane: Unusual Customs and Strange Rituals (इंग्रजी भाषेत). SAGE Publishing India. ISBN 978-93-5388-517-5.

बाह्य दुवे

संपादन
  • व्रत विदागारातील आवृत्ती