मुसलमान धर्माच्या लोकांना रमजान या पवित्र महिन्यामध्ये दरदिवशी रोजा (उपवास) करण्याचा आदेश दिला गेला आहे. उपवासाच्या कालावधीमध्ये (सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत) अन्नग्रहण करण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.


उद्देशसंपादन करा

अन्नग्रहण न करणे, पाणी न पिणे, दिवसातून वेळा नमाज 'अदा' करणे, अपशब्द तोंडातून न काढणे, कुणालाहीहि न दुखावणे, खोटे न बोलणे इत्यादी. थोडक्यात 'रोजा' च्या कळात परमेश्वराच्या एकाही आज्ञेचा भंग न करणे आणि सर्व आज्ञांचे सक्तीने पालन करणे. हा एक महिन्याचा सराव आहे पुढील ११ महिन्यात अश्याच तऱ्हेने जीवन व्यतीत करून एक चांगले समाज घडविण्यासाठी.

'रोजा'च्या अवस्थेत फक्त उपाशी राहणे अपेक्षित नाही. तर त्या योगे संपूर्ण आज्ञा पालनाचे आणि ईशमय होणे अपेक्षित आहे.