हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध

(बुद्ध अवतार या पानावरून पुनर्निर्देशित)


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अनेक हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार असे मानतात. काही हिंदू जणांच्या मते, हा विरोधी अवतार असून सनातन वैदिक धर्माच्या विसंगत अशी शिकवण या अवताराद्वारे करण्यात आली. मात्र याचा मूळ हेतू हा अनाधिकारांच्या हाती गेलेला वैदिक धर्म त्यांच्यापासून निराळा करणे आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र शाखा प्रस्थापित करणे, हा होता. इतर जणांच्या मते, गौतम बुद्ध हा विष्णूचा नववा अवतार नसून कलियुगात संतांच्या माध्यमातून वेळोवेळी होत असलेली धर्मसंस्थापना हाच विष्णूचा निर्गुण अवतार आहे. त्यांच्या मते, कलियुगात सर्व सामान्यांची बुद्धी सनातन वैदिक धर्मापासून भ्रष्ट झालेली आहे. ती सन्मार्गाला लावून कलियुगातील आर्त, दु:खी जीवांना साधनेच्या मार्गाला लावणे, त्यांना मुमुक्षू, नंतर साधक व शेवटी मोक्षास नेणे, हे संतांचे कार्य आहे. यात समाजात वेळोवेळी होणारे रज-तमाचे प्रदूषण दूर करणे, हा या अवताराचा क्षात्रधर्म आहे. हे कार्य संतांच्या हातूनच होईल आणि हाच बौद्धावतार असेल.

बौद्ध अनुयायांच्या मते, हा बौद्धावतार बौद्ध तत्त्वज्ञानाला धरून नाही व बौद्ध धर्माशी सुसंगतही नाही. कुठल्याही बौद्ध ग्रंथात बुद्धांना विष्णूचा अवतार मानले वा म्हटले गेले नाही. हा एक लादलेला प्रकार आहे असे बौद्ध अनुयायी मानतात. चवथ्या शतकात वैदिक धर्मियांनी बौद्ध आणि शैवांना शह देण्यासाठी एक जबरदस्त युक्ती शोधली. त्यांनी ऋग्वेदातील एक दुय्यम देवता शोधून काढली. त्या देवतेचं नाव विष्णू. त्यांनी अवैदिक वासुदेवभक्तिच्या पांचरात्र संप्रदायातून भक्तिची संकल्पना उचलली. कृष्ण, रामादि अवैदिक देवतांना विष्णुचे अवतार बनवून टाकलंच, पण गौतम बुद्धालाही नववा अवतार बनवून टाकलं. बौद्ध धर्मातील मांसाहार-निषेध, अहिंसादि तत्त्वं उचलली गेली. ‘हर’ या पुरातन शिववाचक शब्दाला गाडण्यासाठी ‘हरी’ हा नवाच शब्द शोधला गेला. वैदिकजनांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते बौद्ध धर्माला शह देण्यात यशस्वी झाले. [१] तसेच गौतम बुद्ध अवतार नसण्याचे कारण म्हणजे त्याची अवैदिक शिकवण सर्व अवतार हे वेदसंस्कृतीला धरून कार्य करणारे होते, तर बुद्ध हा आचार धर्माला मानणारा होता. आचार धर्माला आत्म्याचे अधिष्ठान लागत नाही. `आत्म्याचे अस्तित्व मानणे हे सर्व अनर्थांचे मूळ आहे’, अशी त्याची धारणा असल्याने तो ईश्वर या संकल्पनेच्या विरुद्ध होता. याला अनीश्वरवादी प्रवृत्ती, असे म्हणतात.[२]


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा