अष्टमी

चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस
अष्टिमी (bho); অষ্টমী (bn); આઠમ (gu); Аштами (ru); अष्टमी (mr); ଅଷ୍ଟମୀ (or); Ashtami (en-gb); अष्टमि (new); अष्टमी (ne); ಅಸ್ಟೆಮಿ (tcy); अष्टमी (sa); अष्टमी (hi); అష్టమి (te); ašamti (sl); Ashtami (en); Ashtami (en-ca); ಅಷ್ಟಮಿ (kn); அட்டமி (ta) eighth day of the lunar fortnight (en); चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस (mr); 8-е лунные сутки в индийской астрологии (ru); osmi dan luninega štirinajstdnevja (sl) आठें (hi); அஷ்டமி (ta); Ashtami (or)

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासूनचे चंद्रापर्यंतचे कोनांतर (पृथ्वी-सूर्य सरळ रेषेने पृथ्वी-चंद्र रेषेशी पृथ्वीजवळ केलेल्या कोनाचे मोजमाप) जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी (First Quarter Phase), आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी (Third Quarter Phase) असते.[ संदर्भ हवा ]

अष्टमी 
चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतिथी
ह्याचा भागहिंदू दिनदर्शिका
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अष्टम्यांची काही खास नावे

संपादन
  • अशोकाष्टमी - चैत्र शुक्ल अष्टमी
  • कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
  • कालभैरव जयंती/भैरवाष्टमी - कार्तिक वद्य अष्टमी, कालभैरव जयंती
  • कालाष्टमी - कोणत्याही महिन्यातली वद्य अष्टमी
  • गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
  • जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
  • जानकी जयंती (सीता अष्टमी) - माघ वद्य अष्टमी
  • त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
  • दुर्गाष्टमी - कोणत्याही महिन्यात येणारी शुक्ल अष्टमी
  • बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमी
  • भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
  • भैरवाष्टमी/कालभैरव अष्टमी - कार्तिक कृष्ण अष्टमी
  • महाअष्टमी - आश्विन शुक्ल अष्टमी
  • राधाष्टमी - भाद्रपद शुक्ल अष्टमी
  • रुक्मिणी अष्टमी - मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी
  • शीतलाष्टमी/शाकाष्टका - फाल्गुन वद्य अष्टमी. या दिवशी आठ शाकभाज्या ब्राह्मणाला दान करतात.[ संदर्भ हवा ]