इ.स. २०१३
(इ.स.२०१३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
- फेब्रुवारी १५ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
- एप्रिल २४ - बांगलादेशची राजधानी ढाकाच्या उपनगरातील इमारत कोसळून १,१२७ व्यक्ती ठार. २,५००पेक्षा अधिक जखमी.
- जून ३ - चीनच्या जिलिन प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.
- जुलै १८ - अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.
- सप्टेंबर १५ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.
- सप्टेंबर २१ - केन्याच्या नैरोबी शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी वेस्टगेट मॉलवर हल्ला करून ७२ पेक्षा अधिक लोकांना ठार केले. सुमारे १७५ जखमी.
- सप्टेंबर २२ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले.
- सप्टेंबर २४ - पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.७ तीव्रतेचा धरणीकंप. ३७०पेक्षा जास्त ठार.
- ऑक्टोबर ३ - लिब्यातून निघालेल्या निर्वासितांची नाव इटलीजवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
- ऑक्टोबर १३ - मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.
- ऑक्टोबर ३० - आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जिल्ह्यातील पालेम गावाजवळील पुलाच्या कठड्याला धडकून बसगाडीला लागलेल्या आगीत ४५ ठार, ७ जखमी.
- नोव्हेंबर ९ - सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- डिसेंबर ५ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.