बर्किना फासो

(अपर व्होल्टा या पानावरून पुनर्निर्देशित)


बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घानाआयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी इतकी होती.

बर्किना फासो
Burkina Faso
बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unité–Progrès–Justice" (फ्रेंच)
(एकात्मता, प्रगती, न्याय)
राष्ट्रगीत: "Une Seule Nuit / Ditanyè"
बर्किना फासोचे स्थान
बर्किना फासोचे स्थान
बर्किना फासोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
वागाडुगू
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख ब्लेस कोंपाओरे
 - पंतप्रधान लुक-अदोल्फे त्याओ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ५ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २,७४,२०० किमी (७४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,५७,३०,९७७ (६४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ५७.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २४.२९३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,३९९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.३८८ (कमी) (१८१ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी±००:००
आय.एस.ओ. ३१६६-१ BF
आंतरजाल प्रत्यय .bf
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २२६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९व्या शतकापासून फ्रेंच पश्चिम आफ्रिका ह्या फ्रान्सच्या वसाहतीचा भाग असलेल्या बर्किना फासोला १९६० साली स्वातंत्र्य मिळाले व १९८४ सालापर्यंत तो अप्पर व्होल्टाचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९८४ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस संकराने देशाचे नाव बदलून बर्किना फासो असे ठेवले. १९८७ सालच्या एका लष्करी बंडामध्ये संकाराची सत्ता उलथवून ब्लेस कोंपाओरे राष्ट्राध्यक्षपदावर आला व तो आजवर ह्या पदावर आहे.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे बर्किना फासो गरीब व अविकसित आहे. दरडोई उत्पनामध्ये बर्किना फासो जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. बर्किना फासोचा मानवी विकास सूचक जगात खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: