नोव्हेंबर १९
दिनांक
(१९ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२३ वा किंवा लीप वर्षात ३२४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
पंधरावे शतकसंपादन करा
- १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९४१ - दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
- १९४२ - स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
- १९४३ - ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
- १९४६ - अफगाणिस्तान, आइसलॅंड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
- १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
- १९७७ - त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
- १९७९ - इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
- १९८४ - मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
- १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
- १९९८ - फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
- १९९९ - चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
- १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
मृत्यूसंपादन करा
- १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)