गेटिसबर्गचे भाषण हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दिलेले भाषण आहे. अमेरिकन यादवी युद्धा दरम्यान दिलेले हे भाषण अमेरिकेतील सगळ्यात प्रसिद्ध भाषणांपैकी एक आहे.

लिंकन यांनी हे भाषण पेनसिल्व्हेनियामधील गेटिसबर्ग या गावातील सैनिकांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटन समारंभात १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी दिले. फक्त दोन मिनिटांच्या या भाषणातून लिंकन यांनी अमेरिकेच्या स्वांतंत्र्याच्या जाहीरनाम्यातील समतेच्या तत्त्वाला दुजोरा दिला आणि तेव्हा सुरू असलेले यादवी युद्ध हे राष्ट्राची अखंडितता अबाधित ठेवण्यासाठीचा लढा असल्याचे सांगितले. त्यांनी युद्धाच्या अंती राष्ट्रातील सगळ्या नागरिकांना समानता मिळेल असे भाकित केले. लिंकन यांनी ते यादवी युद्ध फक्त अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगातील मनुष्यमात्रांमधील समतेच्या तत्त्वाची लढाई असल्याचे म्हणले.

या भाषणातील सुरुवातीचे फोर स्कोर अँड सेव्हेन इयर्स अगो... (चार वीसे आणि सात वर्षांपूर्वी....) हे शब्द अमेरिकेतील वाक्प्रचार झाला आहे.