स्कँडिनेव्हियन एरलाइन्स

(स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

स्कँडिनेव्हियन एरलाइन्स (स्वीडिश, डॅनिशनॉर्वेजियन: Scandinavian Airlines) ही स्वीडन, डेन्मार्कनॉर्वे ह्या देशांची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीस्कँडिनेव्हिया भौगोलिक प्रदेशामधील सर्वात मोठी विमानकंपनी आहे. १ ऑगस्ट १९४६ रोजी स्वीडिश एरलाइन्स, डॅनिश एरलाइन्स व नॉर्वेजियन एरलाइन्स ह्या तीन विमानकंपन्यांनी एकत्र येऊन स्कँडिनेव्हियन एरलाइन्सची निर्मिती केली. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सध्या प्रवाशांच्या संख्येच्या दृष्टीने युरोपातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचे मुख्यालय स्टॉकहोम महानगरामध्ये असून कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ तर ओस्लो विमानतळावर दुसरा व स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर तिसरा मोठा वाहतूकतळ आहे.

स्कँडिनेव्हियन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
SK
आय.सी.ए.ओ.
SAS
कॉलसाईन
SCANDINAVIAN
स्थापना १ ऑगस्ट १९४६
हब कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन)
स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्टॉकहोम)
ओस्लो विमानतळ (ओस्लो)
मुख्य शहरे बार्गन
योहतेबोर्य
स्टावांग्यिर
ट्रोनहाइम
फ्रिक्वेंट फ्लायर युरोबोनस
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या १३४
ब्रीदवाक्य "We are trsvellers"
मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडन
संकेतस्थळ http://www.flysas.com/
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे निघालेले स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचे एअरबस ए३४० विमान

विमान ताफा

संपादन
स्कँडिनेव्हियन एरलाइन्स विमानताफा
विमान वापरात ऑर्डरी तरतूद प्रवासी क्षमता
C Y M एकूण
एअरबस ए३१९-१०० 4 0 0 141 141
एअरबस ए३२०-२०० 13 0 0 168 168
एअरबस ए३२० 30 11 0 0 168 168
एअरबस ए३२१-२०० 8 0 0 198 198
एअरबस ए३३०-३०० 4 4[] 34
32
35
56
195
178
264
266
एअरबस ए३४०-३०० 8 46
42
34
28
32
35
171
172
195
245
246
264
एअरबस ए३५०-९०० 8[] 6 36 32 240 308
बोइंग ७३७-६०० 27 0 0 120 120
बोइंग ७३७-७०० 29 1 0 0 141 141
बोइंग ७३७-८०० 29 0 0 181 181
बोंबार्डिये सी.आर.जे.९०० 12 0 0 88 88
एकूण 134 43 17

संदर्भ

संपादन
  1. ^ a b 25 June 2013. "SAS selects eight A350 XWBs and four A330s | Airbus News & Events". Airbus..com. 2016-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: