सदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा १०
मिडियाविकी:मराठी मित्रांनो, मराठी वापरा
संपादनमिडियाविकी:मराठी मित्रांनो, मराठी वापरा हा दुसऱ्या टप्प्यातील संदेश मुख्यत्वे संपादन गाळणी ५८ सोबत म्हणजे पहिल्या टप्प्यात विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी वर मराठी लिहिणे न जमलेल्या/अथवा न लिहिलेल्या नवागतांना दिसतो.संपादन गाळणी ४,७,८,५६ इत्यादी करिता थोड्या फार फरकाने अशाच प्रकारचे संदेश आहेत.तेथे पोहोचणारा क्वचीत विभीन्न प्रकारचा ऑडीअन्स लक्षात घेऊन संदेश बनवला आहे त्यामुळे काही मिसमॅच शील्लक आहे.संदेशाचा अपेक्षीत परिणाम अद्याप पूर्ण मिळालेला नाही म्हणजे उणीवा निश्चित आहेत,म्हणून आपण कोणत्या गोष्टीस सरमिसळ असा उल्लेख केला ते अधिक नेमके स्पष्ट केलेत तर सुयोग्य सुधारणां करणे सोपे जाईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:०५, १६ डिसेंबर २०१३ (IST)
तो उघडून बघावा म्हणजे दिसेलच.त्यातील फोटोवर ईतर मजकूर/पट्ट्या आलेल्या आहेत.इंग्रजी अक्षरांवर इतर मजकूर दिसतो आहे.मला वाटते कि पान छोटे आहे व मजकूर जास्त झाला आहे.--वि. नरसीकर ११:११, १६ डिसेंबर २०१३ (IST)
- प्रथमत: महत्वपूर्ण माहिती देण्या बद्दल धन्यवाद. माझ्या संगणकावर छायाचित्रच केवळ थोडेसे दाखवा लपवा पट्टीवर सरकले आहे.पण मजकुर पूर्ण व्यव्स्थीत दिसतो आहे. बहुधा संगणाकांचे स्क्रीन रिझोल्यूशन्सचा वेगवेगळे असल्यामुळे वेगवेगळे दिसते. हे ऑप्टीमायझेशन करता आपापसात संवाद साधत दोघांच्याही स्क्रीन रिझोल्यूशन ला मॅचकरत आपण दोघांनीही संपादावे लागेल.काही टेस्ट आपल्याला सदस्य:V.narsikar/common.css common.css ठेऊन तर काही रिकाम्या टेऊनही कराव्या लागतील जेणे करून common.cssमुळे काही तफावत येत असेल तर माहिती राहील.अर्थात common.css सहीत सुद्धा व्यवस्थीत दिसणे हि आदर्श गोष्ट असेल.
- मजकूर अजून कुठे कमी करता येतो का तेही पहातो.पण सर्वात महत्वाचे छायाचित्रातच सुधारणा साहाय्य करून हवी आहे. त्या बद्दल मध्यवर्ती चावडीवर संदेश टाकला आहे. छायाचित्राचा आकार फाँट साईजकरता फारही लहान करता येत नाही ही सुद्धा एक अडचण आहे.
- थोडा बाहेर जातो आहे साहाय्या करता धन्यवाद.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१४, १६ डिसेंबर २०१३ (IST)
- माझ्या पसंतीत सदस्य:Mahitgar/common.css येथे सदस्य:V.narsikar/common.css येथून common.css आयात केली आपण म्हणता तसे सरमिसळ (विस्कळीत) दिसत आहे. तेव्हा बहुधा common.css इश्यू आहे. अंकपत्त्यावरची नवागत मंडळीं common.css वापरण्याची शक्यता कमी आहे. आपली common.css वापरणाऱ्या इतर भाषी विकिपीडियावरून येणाऱ्या ऑडीअन्स करता तपासून दोन चार दिवसात सुयोग्य बदल करेन.
- तरीपण रिझोल्य्यूशनचा इश्यू सुद्धा शिल्लक नाही याची एकदा खात्री करून घेण्याकरता आपण आपली common.css तात्पुरती रिकामी करून,मग न्याहाळकाची कॅश (सय) रिकामी करून,संदेश कसा दिसतो ते तपासून फिडबॅक देऊ शकल्यास स्वागत असेल.
- पुनश्च धन्यवाद
विवेकसिंधु
संपादन- हा दुवा अभ्यासावा दुव्यावरील माहिती १९७७ सालची आहे त्यानंतर गेल्या ३० वर्षात काय संशोधन पुढे आले आहे ते पहावे लागेल. मूळ विवेकसिंधु ग्रंथातील उल्लेख अंबानगरी असा आहे.तर मुख्य उल्लेख अंबानगरी असाच ठेऊन इतर मुख्य दाव्यांचा उल्लेखकरून सर्वात अलिकडील संशोधनाची माहिती देणे प्रशस्त होईल असे वाटते.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१०, ३ जानेवारी २०१४ (IST)
बहुदा एकच
संपादनकऱ्हेगड आणि कण्हेरगड बहुदा एकच आहेत. जरा विचारपूस करून पाहतो. आपला निनाद ११:०३, ८ जानेवारी २०१४ (IST) कऱ्हेगड आणि कण्हेरगड हे स्वतंत्र गड आहेत असे आढळले आहे. त्यामुळे दोन वेगवेगळी पाने बनवण्यात आली आहेत. आपला निनाद ०६:१३, ९ जानेवारी २०१४ (IST)
hi ! I would like to contribute. (Marathi)
संपादनRead your appeal on your talk page on mr.wiki,here I am an ordinary wikipedian on mr.wiki.My user page at Marathi wikipedia is here and that on the Translatewiki is here I am not a professionalist.
Pl. see whether I could be of any help to you.Awaiting your reply.
--V.narsikar (talk) 05:18, 11 January 2014 (UTC)
- We would love help. So far we have one article in Marathi as seen here [१]. There are a few words that still need translation. Could you help with that? James Heilman, MD (talk · contribs · email)(please leave replies on my talk page) १९:३७, ११ जानेवारी २०१४ (IST)
Vivekananda quote
संपादनDear Mr Narsikar, The particular transliteration you are asking is thus:
- বহুরূপে সম্মুখে তোমার, ছাড়ি কোথা খুঁজিছ ঈশ্বর?
- জীবে প্রেম করে যেই জন, সেই জন সেবিছে ঈশ্বর।
The name of the poem is "Sakhar Prati" (সখার প্রতি, English: "To a Friend"). My name is Arnab, and please let me know if you have any question on this subject. I'll do my best to help you. Thanks a lot. --Jonoikobangali (चर्चा) १४:१६, १२ जानेवारी २०१४ (IST)
भूमि पुनःप्रापण
संपादननमस्कार,
आपण भूमि पुनःप्रापण या विषयावर ज्ञानकोशीय लेखन करण्यास चांगला न्याय देऊ शकाल असे वाटते.आपल्या सवडीनुसार अनुवादांच्या यादीत en:Land reclamation हा लेखही घेता आला तर पहावे अशी विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:०७, १३ जानेवारी २०१४ (IST)
@Mahitgar: नोंद घेतली. पण प्रापण हा शब्द ऐकण्यास तेवढा बरा वाटत नाही भूमि पुनर्संधारण हा शब्द कसा राहील?कृपया कळवावे ही विनंती.--वि. नरसीकर १४:३७, १३ जानेवारी २०१४ (IST)
पुनःसंधारण
संपादनविसर्गापूर्वी इ-उ खेरीज अन्य स्वर आणि पुढे कठोर व्यंजन आल्यास विसर्ग तसाच राहतो, त्याचा ’र’, ’स’, ’श’ किंवा ’ष’ होत नाही. ’पुन:’मध्ये विसर्गापूर्वी ’अ’ आहे आणि विसर्गानंतर ’स’ आहे म्हणून विसर्गाचा ’र’ होणार नाही. अर्थात् पुनः+संधारण=पुन:संधारण. ....J (चर्चा) १५:३७, १७ जानेवारी २०१४ (IST)
रासायनिक फॉर्म्यूला
संपादनतुरटीचा किंवा अन्य कोणताही रासायनिक फॉर्म्यूला साचा वापरून कसा टंकित करायचा ते सांगितल्याबद्दल धन्यवाद!...J (चर्चा) १५:३७, १७ जानेवारी २०१४ (IST)
अशुद्धलेखन
संपादन" दुसरे असे कि,आपल्यास उत्तर देतांना अंमळ भितीच वाटते.'शुद्धलेखन' कच्चे आहे म्हणून.पुन्हा मनःपूर्वक आभार.
"एक शंका विचारायची आहे. कोणतेही दुसऱ्या भाषेतील लिखाण अथवा 'quote' (जसे-वऱ्हाडी,देवनागरी,हिंदी संस्कृत इत्यादी.-थोडक्यात म्हणजे मराठीशी साधर्म्य असणाऱ्या भाषा, बहुतेक सारखी लिपी असणाऱ्या भाषा) हे शुद्धलेखनाचे दृष्टीने मराठीत कसे लिहावे? ते जसेच्या तसे उतरवावे कि त्यावर मराठी शुद्धलेखनाचे संस्कार करून. आपल्या सवडीनुसार कळवावे ही नम्र विनंती."
१. तुमचे लेखन अशुद्ध आहे असा आरोप तुमचा शत्र्रूही करणार नाही.
२. एखाद्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे लिहावयाचे असतील तर ते अवतरणचिन्हांत बंदिस्त करता येतात. संपूर्ण लेख जर कोणाचेतरी वक्तव्य कथित करणारा किंवा संवादयुक्त असेल तर (उदाहरणार्थ नाटकाचे पुस्तक) तर अवतरण चिन्हांची गरज नसते.
जर इंग्रजी आदी भाषेतला शब्द मराठी लिखाणात वापरायचा असेल तर तो शब्द, त्याचा मराठी माणूस जसा उच्चार करील तसाच, पण देवनागरी लिपीत लिहितात. उदा० इंग्रजीतला Of हा शब्द. त्यातील ’f’चा उच्चार voiceless consonants (k, ch, t, th, p, f, s, sh) म्हणजे मराठीत ज्यांना आपण कठोर व्यंजने म्हणतो त्यांच्यापूर्वी (क, च, ट, थ, प, फ़, स, श) ’व्ह’ असा होतो. म्हणजे ofनंतर कठोर व्यंजनाने सुरू होणारा शब्द आला की ofचा उच्चार ऑव्ह् करतात. एरवी ऑफ़्. हे संकेत पाळणे मराठी माणसाला शक्य आहे का? तो ऑफ़् असा उच्चार करणार आणि ऑफ असे लिहिणार. (मराठीत नुक्ता द्यायची पद्धत नाही आणि, न् आणि अन् या शब्दांतले सोडून, अन्य शब्दातील अंत्याक्षराचा पाय मोडायला परवानगी नाही; म्हणून ऑफ, ऑफ़् नाही!) म्हणजे इंग्रजी शब्द आपण मराठी उच्चारानुसार आणि मराठी शुद्धलेखनाचे नियम पाळूनच लिहितो. पण जर एखाद्याला ऑफ़् किंवा ऑव्ह् असेच लिहावयाचे असेल तर त्याने तसे शब्द अवतरणचिन्हांत लिहिल्यास हरकत नसते.
बंगाली माणूस ’v' या अक्षराचे लिखाण ’भ’ असे करतो. मराठी माणूस ’व्ह’असे आणि अन्य भारतीय ’व’असे. त्यामुळे बंगालीतली भिक्टरी ही मराठी व्हिक्टरी असते आणि अन्य भारतीय भाषांत विक्टरी! (ब्रिटिश इंग्रजीत ’v’ चा उच्चार ’व़’, म्हणजे दन्त्य व-ओठावर दात रोवू्न उच्चारलेल्या व प्रमाणे आहे, असे म्हणतात.) परकीय शब्दांचे आपण आधीच भारतीयीकरण केले आहे, ते तसे रहावे. मराठीत पोर्तुगाल, हिंदीत पु्र्तगाल, अन्य भाषांत आणखी काहीतरी; पोर्तुगीज भाषेत काय असेल कोणास ठाऊक?
रूढ संस्कृत वाक्ये मराठीत जशीच्या तशी लिहिण्यास बहुधा हरकत नसते. उदा० वन्दे मातरम्, कुर्यात् सदा मङ्गलम् वगैरे. बाकीच्या संस्कृत शब्दांचे लिखाण आपण आधीच ’मराठी’ केले आहे. म्हणून पती (पति नाही!), विवेकसिंधू (सिंधु नाही!) हे शब्द आपण असे दीर्घान्त लिहितो.
हिंदी शब्द लिहिताना तो ’तसाच’ वापरायचा असेल, तर हिंदी शुद्धलेखनाप्रमाणे, अन्यथा मराठी लेखनपद्धतीनुसार. उदा० ’क़ीमत’ हा हिंदीत लिहायचा असेल तर तसाच पण अवतरणचिन्हांत, मराठीत मात्र किंमत. (मराठीत प्रत्ययरहित शब्दातले अनुस्वारयुक्त अक्षर नेहमी ऱ्हस्व असते. किंमत, चिंच, भुंगा, निवडुंग वगैरे. शिवाय ’कि’ हे उपान्त्यपूर्व अक्षर, म्हणूनही ऱ्हस्व!)हँसी, मराठीत हसणे. चित्रपटाचे नाव लिहिताना शक्यतो फूल और काँटे असेच लिहावे ’फूल और काटे’ असे न लिहिल्यास बरे. डोक्यावर चंद्रबिंदू असेल तर मराठी उच्चारापेक्षा हिंदी उच्चार वेगळा होतो. ’अँड’चा हिंदी उच्चार अंऽड असा होईल, तसा होऊ नये म्हणून आपण and हा शब्द ॲन्ड असा लिहितो.....J (चर्चा) २१:४३, १७ जानेवारी २०१४ (IST)
ृृृृ==१५,००५+== नरसीकरजी,
मराठी विकिपीडियावर १५,०००० संपादने पार पाडल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील १५,०००पेक्षा अधिक संपादनांसाठी शुभेच्छा. तुमच्या संपादनांबरोबरच तुमचे इतर सदस्यांशी होत असलेले सुसंवाद मराठी विकिपीडियाच्या विकासात मोलाची भर घालीत/घालवीत आहेत हे निश्चितच.
धन्यवाद
संपादननरसीकर, मनापासून धन्यवाद!! आता सारे सुरळीत झाले. - अभिजीत साठे (चर्चा) ११:५०, २२ जानेवारी २०१४ (IST) ---
अबबबब!
संपादननरसीकर, आपली एकूण २४६७० संपादने झालीत? खरोखर कमाल आहे! नुसतेच अभिनंदन आणि कौतुक नाही, तर धन्यवादही...J (चर्चा) ११:५६, २२ जानेवारी २०१४ (IST)
मराठी अक्षरे
संपादनकालपर्यंत (२१ जानेवारी २०१४पर्यंत) विकीवर ॲ (’अ’वर चंद्र), आणि ऱ्य, ऱ्ह (चंद्रकोरीसारख्या अर्ध्या ’र’ला जोडलेले ’य’ किंवा ’ह’) ही अक्षरे टंकित करता येत होती. आज ती करता येत नाहीत, किंवा कुणी तसे टंकित केले असले तरी ते ’तसे’ माझ्या संगणकावर दिसत नाहीत. कालच्या रात्रीत काहीतरी गडबड झाली आहे. अभय नातूंनी स्थानांतरित केलेल्या ऍक्टिनियम यालेखाचा नाव मला चौकोनात 972क्टिनियम असे दिसते आहे....J (चर्चा) ११:४५, २२ जानेवारी २०१४ (IST). ---
फॉन्ट्स आणि आर्काइव्ह
संपादनमाझ्या संगणकावर अजूनही ’बरहा’ फॉन्ट्स आहेत. जे बरहामध्ये नाही त्यासाठी मी संगणकावरील एका फायलीत अक्षरे साठवून ठेवली आहेत. बरहा वापरून योग्य ते अक्षर उमटवता आले नाही तर मला ठेवणीतून अक्षरे उचल-डकव करावी लागतात. जेव्हा ’मनोगत’ चालू होते, तेव्हा मी मनोगतावर लिखाण करून ते विकीवर डकवत असे. मनोगतावर टंकलेखन जितके मनाजोगते होई, तितके ते कुठेच होत नाही. तिथे शुद्धलेखन तपासावे लागत नसे. नुक्ता देणे, ’अ’ची बाराखडी काढणे, सावरकरी ’र’ लिहिणे, स्वरावर रफार देणे, पाऊण ’य’ वापरून जोडाक्षरे लिहिणे, हवी तशी उभ्या वा आडव्या मांडणीची जोडाक्षरे लिहिणे वगैरे सहज शक्य होते. मनोगत कसे बंद पडले माहीत नाही!
माझ्या चर्चापानावरील मजकुराची आर्काइव्ह पद्धतीने अनुक्रमणिका करायला माझी हरकत नक्कीच नाही. तो मजकूर ’सर्वात अलीकडचा तो सर्वात वरती’ अशा पद्धतीने रचायचा माझा विचार होता. तसे केले असते तर आर्काइव्हची तातडीची गरज पडली नसती. पण सहजासहजी आर्काइव्ह होत असेल, तर जरूर करावे.....J (चर्चा) १४:२४, २२ जानेवारी २०१४ (IST)
कृपया माझे चर्चापान बघा. त्यात पानाकडे बघतांना, उजव्या कोपऱ्यात असलेली त्यासदृष्य सारणी.काहीनाही.फक्त नकल-डकव करावयाचे आहे.
’सर्वात अलीकडचा तो सर्वात वरती’ साठी आपल्या चर्चापानावर येणाऱ्या सदस्यांना विनंती करावी लागेल कि आपला मजकूर सर्वात वर टाकावा.अनायासे नविन वर्ष सुरू झाले आहे.त्यात असे करता येईल.बघा आपले काय मत आहे ते.
पण मग इतर सदस्यांना, चर्चा पानावर असलेली 'विषय जोडा' टॅब वापरता येणार नाही.कारण ती वापरण्याने मजकूर सर्वात शेवटी जातो. अशी अडचण आहे.
--वि. नरसीकर १८:४३, २२ जानेवारी २०१४ (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
संपादन- @V.narsikar: असे तांत्रिक शब्द समजण्यास सोपे जावेत म्हणून ते संदर्भात टाकणे बरोबर नाही. त्याने संदर्भाऐवजी नाहकच नुसतीच यादी वाढेल. त्यासाठी संदर्भ विभागाच्या खाली पारिभाषिक शब्दसूची किंवा शब्दसूची म्हणून एक विभाग करावा व त्यात हे शब्द टाकावेत. असा प्रयोग मी पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा या पानावर केलेला आहे तो पाहावा व अधिक सहाय्यासाठी त्याचा आधार घ्यावा . त्यासाठी <ref group="श"></ref> वापरावे व पारिभाषिक शब्दसूची विभागात {{संदर्भयादी|group="श"}} जोडावे यामुळे लेखातील शब्दाजवळ टिचकवल्यावर पारिभाषिक शब्दात जाता येते व परत तिथे दिसणार्या मजकूराच्या आधी असलेला वरच्या दिशा दाखविणारा बाण टिचकल्यावर आपण पूर्ववत मूळ मजकूरावर पोहोचू शकतो. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:१६, २२ जानेवारी २०१४ (IST)
- ता.क. अशीच तळटीपा देण्याचीही पद्धत पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा पानावर बघता येईल. त्यासाठी <ref group="टीप"></ref> वापरावे व तळटीपा विभागात {{संदर्भयादी|group="टीप"}} जोडावे -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२२, २२ जानेवारी २०१४ (IST)
मनोगत Search
संपादनIE->Google Search for Manogat हे सर्व केव्हाच करून झाले. मनोगत उघडत नाही. Internet Files, cookies, address memories, सर्व पुसून टाकले, काही फायदा नाही.माझ्या संगणकावर मनोगत गेल्या दोनाहून अधिक महिने बंद आहे. .’उपक्रम’ वर वाचता येते, पण लिहिता येत नाही..बाकी मिसळपाव, मायबोली छान चालतात..J (चर्चा) १३:०३, २३ जानेवारी २०१४ (IST)
IEची आवृत्ती
संपादनI.E.> Tools >Internet options >Internet zone> Restricted sites मध्ये मनोगत (www.manogat.com) असल्यास ते काढा. बाय द वे आपल्या आय ई ची व्हर्शन काय आहे?-
आठवत नाही पण बहुधा IEचे अगदी जुने म्हणजे 6.0 हे व्हर्शन असावे. कोणते व्हर्शन आहे ते कसे शोधायचे ते माझ्या आता लक्षात नाही. "काही सोपी युक्ती असेल तर सांगावे. माझ्याकडे Windows XP आहे.)" पण जेव्हा 7.0 बाजारात आले त्याच्या आधीच मी मोझिला वापरायला सुरुवात केली होती असे अंदाजे आठवते. सध्या IE10 हे चालू व्हर्शन आहे हेही मला माहीत आहे, ते मला सहज उतरवून घेता येईल, पण आजपर्यंत त्याची गरज पडली नव्हती. IE6 वर मला मनोगत मिळत असे. आत्ताच का मिळत नाही ते समजत नाही.
IE6वर Internet Zone हा ऑप्शन नाही. त्याऐवजी Security आहे. म्हणजे I.E.> Tools >Internet options >Security> Restricted sites असा मार्ग आहे. मी मनोगतची साईट रिस्ट्रिक्टेडमध्ये टाकलेली नाही. फ़ायरवॉलनेही अडविलेली नाही, हे नक्की. आणि असे की, दोन महिन्यांपूर्वी मनोगत मिळत होते, त्यानंतरच्या कालावधीत संगणकात काहीच बदल झालेला नाही. ...J (चर्चा) १२:४८, २४ जानेवारी २०१४ (IST)
Start->Programmes->Accessories->System Tools->System Information करून पाहिले आणि खात्री करून घेतली. माझ्या संगणकावर IE6च आहे. ....J (चर्चा) १४:५८, २४ जानेवारी २०१४ (IST) माफ करा. एकुण हे माझ्या आवाक्याबहेरचे दिसत आहे.आता माझ्याकडे पुढे काहीच इलाज नाही.--वि. नरसीकर (चर्चा) २०:३४, २४ जानेवारी २०१४ (IST)
कसले संपादन? दोन चार शब्द इकडे तिकडे केले. आवर्जून आभार मानण्या इतपत नक्कीच नाकी. खरे तर ’मनोगत’ संबंधी आपण आणि इतरांनी दिलेल्या सूचनांबद्दल मीच मनापासून आभारी आहे. सूचनांचा उपयोग झाला नाही, हे माझे दुर्दैव.
मनोगतबाबत माझे एक निरीक्षण आहे. मनोगत हा शब्द शोध बारवरती टाईप केला आणि एंटर-की दाबली की माझ्या बॉडबँडचे रिसेप्शन थांबते. शब्द पुसला की परत चालू होते. मोडेममध्ये काही दोष असेल? व्हायरस वगैरे? हे प्रश्न वेडेपणाचे आहेत हे माहीत असूनही मनात आले म्हणून विचारले....J (चर्चा) ११:२०, ३१ जानेवारी २०१४ (IST)
@J:
- नमस्कार J मी आपल्या वतीने आपणास मनोगत उपलब्ध होत नसल्याचे मनोगतवरील या धाग्यात निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.काही माहिती मिळाल्यास जरूर कळवेन.शुभेच्छा आणि धन्यवाद
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२०, ३१ जानेवारी २०१४ (IST)
पुनर्निर्देशने व निःसंदिग्धीकरण
संपादननमस्कार,
निःसंदिग्धीकरण पानांचा वर्ग आहेच वर्ग:निःसंदिग्धीकरण येथे. पाने लेख नसल्याने पुनर्निर्देशन पानांचे वर्गीकरण करता येत नाही.
लेख लिहितानाच लेखाचे वर्गीकरण करण्यास आपल्या संपादकांना उद्युक्त करणे हा यावर एक उपाय आहे. :-)
अभय नातू (चर्चा) १२:०८, २ फेब्रुवारी २०१४ (IST)
- आपण दिलेला दुवा पाहून Disambiguation साच्यात खूणपताका घातल्यामुळे हा साचा वापरणारी सगळी पाने त्या पानावर दिसतील.
- अभय नातू (चर्चा) ०३:११, १८ फेब्रुवारी २०१४ (IST)
@अभय नातू:
- होय! तेथे खूणपताका आहेच.कालपर्यंत फक्त २७ पानेच यात होती.आज बहुतेक सर्वच दिसत आहेत.
- दुसरे असे कि,'नि:संदिग्धीकरण पानांशी जुळलेली पाने' येथे, 'नि:संदिग्धीकरण पाने' यात असलेल्या लेखांपेक्षा किमान दुप्पट तरी लेख असावेत.(नि:संदिग्धीकरण पानांत किमान २ लेख तरी असतील असे गृहित धरुन). पण, तसे प्रत्यक्षात नाही.'साचा हालेख' यात Disamb ही खूणपताका टाकावी काय? मी आपणास बोअर तर करीन नाहीना?
वि. नरसीकर (चर्चा) १०:५३, १८ फेब्रुवारी २०१४ (IST)
नमस्कार नरसीकरजी,
तुम्ही मला बोर वगैरे करण्याची कदापि काळजी करू नका! सध्या कामात जरा व्यस्त असल्याने येथे येणे थोडे कमी झाले आहे म्हणून पटकन उत्तर देता येत नाही.
असो. पाने कमी असण्याचे कारण सगळ्याच निःसंदिग्धीकरण पानांवर Disambiguation साचा असेलच असे नाही. ते सांगकाम्याकरवी करता येईल. हालेख मध्ये खूणपताका घालू नये कारण हालेख साचा गोंधळ होण्यासारख्या पानांवर लावला जातो, एकाच नावाच्या नाही, उदा. आचरे, आजरे किंवा लव, लव्ह, इ.
अभय नातू (चर्चा) ०७:०१, २० फेब्रुवारी २०१४ (IST)
@अभय नातू: पटले. कधीकधी मी निर्णय घेण्यासाठी धजावत नाही कारण, संगणक तंत्रज्ञानाचे 'निम-हकिम,खतरे जान' असलेले ज्ञान आहे.असे सारखे वाटत राहते कि आपण काही करावयास जावे व लोकांना मनस्ताप व्हावा.मी ते टाळतो.म्हणून आपणास तसदी दिली.पठडीतलेच काम करत रहावे म्हणजे जमते.असो.'Grey hair only speaks of old age,not of experiance.' हेही तेवढेच खरे आहे असे मी कायम मानत राहतो.याचे उत्तर नको आहे.फक्त एकदा वाचून घ्या.--वि. नरसीकर (चर्चा) ११:४५, २० फेब्रुवारी २०१४ (IST)
विकिस्रोतावरील अनुवाद साहाय्या करीता धन्यवाद
संपादननमस्कार २ ऑक्टो २०१३ ला आपणास मराठी विकिस्रोतावर लोकमान्यांच्या एका अग्रलेखाच्या संबंधाने विनंती केली होती आणि आपण हातोहात अनुवाद करण्यात साहाय्य दिले होते. अर्थात लोकमान्यांचे जुन्याकाळातील आणि पल्लेदार इंग्रजीचा अनुवाद व्यवस्थीत व्हावा म्हणून बऱ्याचदा पुर्नलेखनही करावे लागले. माझ्याकरताही अशी पहिलीच वेळ होती त्यामुळे आपल्याच लेखनावर पुर्नलेखन केल्याबद्दल क्षमस्व. पण एकुण तो अनुवाद या शिवजयंती पुर्वी पूर्ण आहे याचे समाधान आहे. अर्थात जाणकारांची प्रगत शुद्धलेखन चिकित्सा आणि अनुवाद समीक्षा बाकी आहे पण ते काळाच्या ओघात होईल असे धरून चालू. आपणही त्या अनुवादाची पुन्हा एकदा आपल्या सवडीनुसार समीक्षा केल्यास स्वागत असेल
आपल्या अमूल्य अनुवाद लेखन साहाय्या बद्दल पुनश्च धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०५, १० फेब्रुवारी २०१४ (IST)
नमस्कार
संपादननरसीकरजी,
बरेच दिवसांनी आपणास येथे पाहून आनंद झाला. आशा करतो सगळे काही व्यवस्थितच आहे.
धन्यवाद
संपादनटंकनदोष काढल्याबद्दल धन्यवाद. आम्ही पुण्यात नुकताच मराठी विकिपेडीयन्स चा एक संघ सुरू केलाय. आपणांस रूचि असल्यास कलवावे.
संघ जरी पुण्यात तयार झालेला असला तरीही यात बाहेरचे लोक देखिल सहभागि आहेत. आपण सहभागि होण्यास काहीच समस्या नसावि.
चित्र समाविष्ट करणे
संपादनएका लेखात चित्र समाविष्ट करयचे आहे , आणि ते चित्र एखाद्या दुसर्या वेब साईट वरून घ्यायचे आहे ते कसे घेणार.
प्रचालकपद
संपादननमस्कार,
सर्वप्रथम, आपला हात आता बरा होत आला असणार अशी आशा करतो.
तुम्हाला येथे पूर्वीसारखा वेळ देता आलेला नाही हे मी समजू शकतो. प्रचालकपदाचे म्हणाल तर अधूनमधून प्रचालकाची कामे (पाने वगळणे, सदस्यांवर लक्ष ठेवून प्रसंगी त्यांना मदत व समज देणे, ई.) होणे शक्य असले तर तुम्ही प्रचालकपदावर रहावे असे मला वाटते.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा
संपादननमस्कार,
मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.
मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.
धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) २०:२१, ९ एप्रिल २०१५ (IST)
संचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार V.narsikar/जुनी चर्चा १०,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार V.narsikar/जुनी चर्चा १०,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
नमस्कार
संपादननरसीकरजी,
कसे आहात?!
भाषांतरे
संपादननरसीकरजी,
आपला संदेश मिळाला. आपण केलेल्या भाषांतराबद्दल धन्यवाद. थोडक्यातच मी ती भाषांतरे न्याहाळून पाहेन. त्यासाठीचा दुवा द्याल का?
अभय नातू (चर्चा) ०२:३१, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
[२] हा आहे.
--वि. नरसीकर (चर्चा) ०९:२५, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
- दुवा पाहिला. आपण केलेले भाषांतर मूळ कॉन्टेक्स्टमध्ये कसे पहावे? त्यासाठी काही सोय आहे का?
- अभय नातू (चर्चा) १०:२५, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
- नाही. तशी विकि संचेतनात काहीच सोय दिसत नाही.त्याउलट मात्र सोय आहे. एखादे भाषांतर कोणी केले हे ट्रांसलेटविकिवर नकल-डकवुन तो नेमका दुवा बघता येतो/शोधता येतो.एखादे चुकिचे भाषांतर वाटत असेल तर,तेथील शोध खिडकीत नकल-डकवुन, ते कोणी केले हे बघता येते.हे आपणास ज्ञात असेलच.
तरीपण उदाहरण देतो - बीटा मधील 'स्वयंचलितरित्या सर्व नविन बीटा फिचर्स सक्षम करा' हे भाषातर कोणी केले ते बघावयाचे असेल तर,शोधले असता MediaWiki:Betafeatures-auto-enroll/mr हा दुवा [३] या पानावर मिळतो. त्याचा इतिहास बघता येतो.
बोलचालीबद्दल धन्यवाद. --वि. नरसीकर (चर्चा) १६:०२, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) २१:०४, ३ नोव्हेंबर २०१५ (IST)
ट्रांसलेटविकि
संपादननमस्कार,
काही दिवसांपूर्वी मी तेथे थोडा वेळ घातला होता. पुन्हा एकदा जाउन बघतो.
धन्यवाद.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
चित्र परवाने
संपादननरसीकरजी,
चित्रांवर परवानाविषयक माहिती घातल्याबद्दल धन्यवाद. हे काम सांगकाम्याकरवे करून घेता येईल असे वाटते. यासाठी ठसविण्याचा मजकूर आणि चित्रांची यादी (किंवा वर्ग, इ.) दिल्यास हे लगेचच करून घेतो.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:०६, ४ डिसेंबर २०१५ (IST)
- त्यांच्या स्वत:च्या बॉटनी त्यांनी करण्यास हरकत नाही, पण अन्य कुणी त्यांना तसे करुन देणे वैध पद्धती ठरत नाही. (तसे करावयाचेच असल्यास त्यांना आधी अधिकृतपणे अधिकारांचे हस्तांतरण करावे लागेल.-पण अन्यथा नाही)
- नरसिकरजींना चालू कामा साठी शुभेच्छा.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:१९, ४ डिसेंबर २०१५ (IST)
- माहितगार,
- मूळ लेखकाने लेखी विनंती करून विवरणे दिली असता दुसऱ्याने बदल केली असता त्यात वावगे काही नाही. असो. नरसीकरांनी काम पूर्ण केले आहेच.
- अभय नातू (चर्चा) २१:३४, ४ डिसेंबर २०१५ (IST)
अशा कोणत्याही विनंत्या प्रक्रीयेच्या वैधतेसाठी तपासणे गरजे असावे. फॉर्म 'आय'चा उपयोग करून तसे कदाचित करता येईल परंतु त्याचा मेटावर रिव्ह्यू मिळे पर्यंत तसे करणे उचित वाटत नाही इन एनी केस आपल्याकडे कॉपीराइट कायद्या बाबत एकुण बेफिकीरी एवढी आहे की लोक कॉपीराइटेड छायाचित्रांवरही तुमच्या बॉट कडून परवाने लावून घेण्यास मागे पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे माझा या गोष्टीस मनमोकळा पाठींबा असू शकत नाही. असो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:४५, ४ डिसेंबर २०१५ (IST)
- काळजी करु नका. ते काम पूर्ण झाले. आता फक्त इथून तिथून(इंग्रजी/कॉमन्स वगैरे) आयात केलेल्या संचिकांचेच थोडेसे (जवळपास १०%) बाकी आहे. आपल्या शुभेच्छांबद्दलही आभार. आपल्या सर्वांचे सहकार्य आहेच् त्यामुळे ठाकूरकी आहे बरे!
--वि. नरसीकर (चर्चा) २०:२७, ४ डिसेंबर २०१५ (IST)
- @अभय नातू आणि Mahitgar:
- माझ्या चित्रात परवाने टाकता टाकता हे लक्षात आले कि [[वर्ग:Files with no machine-readable license]] यामध्ये काही सन्माननीय सदस्यांनी जोडलेली अशी चित्रे आहेत जी कोणत्याही लेखात जोडल्या गेली नाहीत.ती फक्त याच विकिवर चढविल्या गेली आहेत. त्यांचे काय करावयाचे? याचापण विचार करावयास हवा असे सूचवावेसे वाटते. ती सर्व चित्रे अप्रतीम आहेतच यात वाद नाही.
त्या वर्गात दिलेल्या माहितीनूसार अश्या सुमारे १०२७० संचिका आहेत. फक्त माहितीस्तव व विचारास्तव हे लेखन प्रयोजन.
--वि. नरसीकर (चर्चा) २०:४४, ४ डिसेंबर २०१५ (IST)
प्रत्यक्षात हि संख्या दुप्पटतरी आहे कारण इतर जवळपास तेवढ्याच संचिकांना सुयोग्य परवान्यांचा अभाव आहे. आधी एक एक करून परवान्यांचे काम करवून घ्यावे लागेल. प्रत्येकी १० पेक्षा कमी संचिका चढवणारे १२४ सदस्य आहेत. १० ते ७५०० संचिका चढवणारे ६३ सदस्य आहेत. ज्या संचिकांना सुयोग्य परवानेच नाहीत त्यांना वापरण्याचे आवाहन करण्यात सध्याच पॉइंट नाही. तुम्ही , कोल्हापुरी ज्यांनी परवाने पूर्ण केले आहेत त्यांची छायाचित्रे वापरण्याचे आवाहन साइट नोटीसला जोडता येऊ शकेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:३७, ४ डिसेंबर २०१५ (IST)
नमस्कार ! आपल्या प्रतिसादाबद्दल आभार ! असेच मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा आर्या जोशी (चर्चा)
रानभाज्यांसाठी धन्यवाद
संपादनरानभाज्या लेखात्त भरपूर भर टाकल्याबद्दल धन्यवाद. मीही थोडीफार माहिती गोळा करून ठेवली होती, ती आता आवश्यकतेनुसार लेखात समाविष्ट करीन.... ज (चर्चा) १२:४६, १ ऑगस्ट २०१६ (IST)
देवलापार
संपादनआवश्यक तो बदल केल्याबद्दल धन्यवाद!
अभय नातू (चर्चा) २२:१६, २ ऑगस्ट २०१६ (IST)
स्रोत? संपादित करा
संपादनयांतले स्रोत म्हणजे काय? त्यापेक्षा ‘मजकूर संपादित करा’ लिहिले असते तर चालले नसते? किंवा नुसतेच ‘संपादित करा’? आणि आज्ञार्थ का? म्हणजे हुकूमशाही झाली. ‘आवश्यक असेल तर/आवश्यक वाटले तर/आवश्यक वाटल्यास/आवश्यकतेनुसार मजकूर संपादित करावा’ सगळ्यात आदर्श!...ज (चर्चा) १६:१८, ४ सप्टेंबर २०१६ (IST)
@ज:
- मुळात हे इंग्रजीतून मराठीत करण्यात आलेले भाषांतर आहे. 'edit the source' या वाक्याचे. आता मूळ वाक्य जसे असेल तसेच त्याबरहुकुम भाषांतर करण्यात येते. कारण आपल्यापैकी बहुतेक सदस्य इंग्रजी विकिवरही काम करतात.त्यांनाही ते वाचन करुन समजणे सोयीचे जाते तसेच, मूळ वाक्यास भाषांतराचे साधर्म्य हवे, असे माझे मत आहे.
- एखादी tab/कळ टिचकण्याने आपण विकिसंचेतनास आज्ञा करीत असतो.'असे करा' 'तसे करा' याप्रमाणे. ते त्यानुसार काम करते व आपली आज्ञा राबविते. हा एक आज्ञावलीचाच भाग आहे त्यामुळे यात काही गैर आहे असे मलातरी वाटत नाही. असो.
- बरेच दिवसांनी आपणाशी काहीतरी चर्चा झाली, मलापण छान वाटले.
सादर. --वि. नरसीकर (चर्चा) १६:३५, ४ सप्टेंबर २०१६ (IST)
"बहुतेक सदस्य इंग्रजी विकिवरही काम करतात.त्यांनाही ते वाचन करुन समजणे सोयीचे जाते तसेच, मूळ वाक्यास भाषांतराचे साधर्म्य हवे, असे तुमचे मत पटण्यासाखे नाही.
पहिली गोष्ट मराठी विकिपीडिया हा स्वतंत्र विकिपीडिया आहे, त्यात इंग्रजीचे भ्रष्ट असणे उचित नाही. आता स्रोत या शब्दाचा येथे काय उपयोग आहे हे तुम्ही स्पष्ट केलेले नाही. स्रोत म्हणजे मूळ किंवा उगम. स्रोत संपादित करा म्हणजे मूळ संपादित करा. कुणाकुणाचे मूळ? कुणाकुणाचे उगम? ... ज (चर्चा) १६:१०, ७ सप्टेंबर २०१६ (IST)
अश्याच प्रकारचे
संपादन‘अश्याच प्रकारचे दोष’ हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून अश्याच हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही.
स्त्रीलिंगी : अशी स्त्री->अश्या स्त्रिया
नपुंसकलिंगी : असे पुस्तक->अशी पुस्तके->अशा पुस्तकाने->अश्या पुस्तकांनी ..
@ज:
आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शतशः आभारी आहे. व्यक्तिगत कार्यबाहुल्यामूळे प्रतिसाद देण्यात उशीर झाला. क्षमस्व.
--वि. नरसीकर (चर्चा) १०:१४, १२ सप्टेंबर २०१६ (IST)