विविध दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या विनोदी कथा संग्रह रुपाने प्रसिद्ध व्हाव्यात असा मानस बाळगून होतो. तो योग आता येतोय.

  विनोदी कथा म्हणजे मनोरंजन असा सर्वसाधारण वाचकांचा समज. भरपूर हसायला मिळावं ही अपेक्षा ती खात्रीने पुरी व्हावी ही माझीही अपेक्षा. आता घोडा मैदान जवळच आहे. या कथासंग्रहातील विनोदी कथांनी वाचकांचा मनमुराद हसवलं तर तो त्यांचा आनंद....आणि समाधान माझं....
  भ्रमाचा भोपळा हा माझा दुसरा विनोदी कथासंग्रह. पहिला विनोदी कथासंग्रह मी चिंतामणी बोलतोय. या संग्रहातील विनोदी कथा प्रायोगिक स्वरुपातील होत्या. आत्मकथनात्मक आकृतीबंधातल्या विनोदी कथा विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. वेगळे विषय वेगळी प्रकृती असलेल्या य़ा विनोदी कथा वाचताना वाचकांना मनसोक्त आनंद मिळेल अशी आशा करतो.
 -बाळ सप्रे