कऱ्हेगड
कऱ्हेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुका आहे. हा भाग पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकदा याचा उल्लेख बागलाण असा केला जातो.
कऱ्हेगड | |
नाव | कऱ्हेगड |
उंची | |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भौगोलिक स्थान
संपादनसटाणा या तालुक्याच्या गावाच्या ईशान्येकडे नामपूर हे गाव आहे. या नामपूरच्या वाटेवर कऱ्हे नावाचे लहानसे गाव आहे. या गावाजवळच कऱ्हेगडाचा किल्ला आहे. हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित आहे. स्थानिक लोक याला भवानीचा डोंगर म्हणून ओळखतात. १९८७ साली नाशिकमधील ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्री. गिरीश टकले यांनी घेतलेल्या एका शोध मोहिमेमध्ये कऱ्हेगडाचे स्थान निश्चित करण्यात यश मिळाले. याच मोहिमेदरम्यान या भागात दुंधागड आणि अजमेर हे सुद्धा किल्ले असल्याचे समजले.
कसे जाल ?
संपादनसटाणाहून मुलाणेमार्गे दोधेश्वर येथील मंदिराजवळ पोहोचता येते. सटाणापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावर दोधेश्वराचे मंदिर डोंगराच्या सानिध्यात उभे आहे. या निसर्गरम्य परिसरापासून २-३ किलोमीटरवर कऱ्हेगडाचा पायथा आहे. कऱ्हेगडाच्या उत्तरेकडे उतरलेल्या डोंगरदांड्यावरूनच किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
संपादनकऱ्हेगडाच्या माथ्याखाली कातळामध्ये खोदलेल्या काही पायऱ्यांवरून आपण माथ्यावर दाखल होतो. कऱ्हेगडाचा माथा लहानसा आहे. माथ्यावर घरांच्या जोत्याचे अवशेष आढळतात. कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. काही वेळेस या टाक्यांमध्ये शेवाळे वाढलेले असते तर काही वेळेस ती कोरडीही पडलेली असतात. माथ्याच्या पश्चिम अंगाला कातळात गुहा आहेत. कऱ्हेगडाच्या माथ्यावरून साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी -तुंगीचे सुळके, सिष्ठा, देरमाळ, पिसोळ, अजमेर तसेच दुंधागड दिसतात. स्वच्छ हवेत अंजठा-सातमाळा रांगेचेही येथून दर्शन होते. कऱ्हेगडाच्या पायथ्यापासून देवळाणे हे गाव सात-आठ कि.मी. अंतरावर आहे. देवळाणे गावामध्ये प्राचीन असे शिवमंदिर आहे. या शिवमंदिरावरील काही शिल्पे प्रेक्षणीय आहेत.