सातमाळा-अजिंठा डोंगररांगा
सातमाळा-अजिंठा डोंगररांगा ही सह्याद्री पर्वतरांगेच्या तीन प्रमुख डोंगररांगांपैकी एक आहे. ही डोंगररांग तुटक तुटक असून तिची साधारण दिशा पश्चिम-पूर्व आहे. ही डोगररांग गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करते. हिची सुरुवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्येकडील सुरगाणा तालुक्यात होते. या डोंगररांगेच्या पश्चिम भागाला सातमाळा डोंगर तर नाशिक जिल्ह्यातीलच मनमाडपासून पुढे अंकाई-टंकाईपासून या रांगांनाच अजिंठा डोंगर म्हणून ओळखतात. या डोंगररांगांचा उतार उत्तरेकडे तीव्र असून दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे मंद उतार आहे. देवगिरीचा किल्ला व अजिंठा-वेरूळची लेणी याच डोंगरात आहेत.
सातमाळा डोंगररांग सातमाळा डोंगररांग | ||
देश | भारत | |
राज्य | महाराष्ट्र | |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |