मनमाड

महाराष्ट्रातील गाव, भारत

मनमाड हे महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मनमाड नगरपालिकेची स्थापना १९२८ साली झाली.

  ?मनमाड

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२०° १५′ ००″ N, ७४° २७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
वर्षाव

• २४८ मिमी (९.८ इंच)
जवळचे शहर मालेगाव
जिल्हा नाशिक
तालुका/के नांदगाव
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
८०,०५८ (२०११)
१.०४ /
८९.८१ %
• ९४.४६ %
• ८४.९६ %
भाषा मराठी
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२३१०४
• +०२५९१
• एमएच१५,एमएच४१

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ८०,०५८ होय, यात पुरुष ४०८१६ तर महिला ३९२४२. एकूण लोकसंख्येत शुन्य ते सहा वयोगटातील बालकांचे प्रमाण हे १२% आहे.

दळणवळण संपादन

मनमाड हे भारताच्या महत्त्वाच्या १०० रेल्वे जंक्शनांपैकी एक आहे. हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडते. या ठिकाणहून भुसावळ, नागपूर, औरंगाबाद, दौंड-पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी जवळपास १५० पेक्षा जास्त गाड्या आहेत. मनमाडहून मुंबईकरिता दररोज गोदावरी एक्स्प्रेस, राज्यरानी एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस या गाड्या सुटतात. मनमाड शहर हे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १०वर आहे त्यामुळे ते उत्तरेला मालेगाव, धुळे व दक्षिणेला कोपरगाव, शिर्डी व नगर सारख्या शहरांशी जोडले गेले आहे. तसेच मनमाडच्या पश्चिमेला चांदवड व लासलगाव ही शहरे आहेत आणि पूर्वेला नांदगाव हे तालुक्याचे शहर आहे.

प्रशासन संपादन

मनमाड शहराचे व्यवस्थापन मनमाड नगरपरिषद पाहते. हे शहर नांदगाव विधानसभा व दिंडोरी लोकसभा मतदार संघात आहे. मनमाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी होता न्यायालय आहे.

उद्योगधंदे संपादन

मनमाड येथे भारतीय अन्नधान्य महामंडळाचे कोठार आहे तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे केंद्रीय अभियंता कार्यशाळेच्या दोन शाखा आहेत. आणि इंडियन आईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडेन आईलचे प्लांट्स आहेत त्यामुळे शहरातील अनेक लोक या कंपन्यांमध्ये काम करतात. त्याशिवाय मध्य रेल्वे, शिक्षण संस्था व व्यापार हे येथील लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.

शिक्षण संपादन

मनमाड हे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघरच आहे. येथे अनेक मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. येथे मविप्र व महात्मा गांधी विद्यामंदिरचे महाविद्यालय आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिक्षण पदविका महाविद्यालय, अभियांत्रिकीकीमधील पदविका अभ्यासक्रमासाठी शेजवळ पॉलिटेक्निक महाविद्यालय आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाकरिता संत झेवियर्स हायस्कूल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय यासारख्या मोठ्या शाळा आहेत

पर्यटन संपादन

मनमाड जवळ मनमाड-नगर राज्य मार्गावर अंकाई-टंकाई किल्ले आहे. अंकाई या किल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. मनमाड जवळ एक अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे याला लोक "हडबीची शेंडी" असे म्हणतात. मनमाड-नांदगाव रस्त्यावर असलेल्या नागापूर या गावी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे याठिकाणी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी जत्रा असते तसेच महाशिवरात्रीला मोठो उत्सव असतो. शिर्डी साठी बाहेरील राज्यातील लोक मनमाड येथेच रेल्वे मार्गाने येतात.

शेती संपादन

वाढत्या शहरीकरणामुळे पंचक्रोशीतील लोक मनमाड येथे स्थलांतर झालेले आहेत. परंतु त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. मनमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याच ठिकाणी पंच क्रोशीतील शेतीमाल विकला जातो. मनमाड येथे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नंतरचे मोठे कांदा बाझार आहे.

बँकिंग व्यवसाय संपादन

मनमाड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, सेन्ट्रल बँक, महाराष्ट्र बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रगती को. ऑपरेटीव बँक, बि.एच.आर. इ. बँकांच्या शाखा आहेत. तसेच इतर सहकारी बँकांच्या शाखा ही आहेत.